Vivo V9 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Wed, 26 Sep 2018 07:52:52 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 6जीबी रॅम आणि 6.3-इंचाच्या नॉच डिस्प्ले सह लॉन्च झाला डुअल कॅमेरा असलेला वीवो वी9 प्रो https://www.91mobiles.com/marathi/vivo-v9-pro-launched-in-india-feature-specifications-price-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-v9-pro-launched-in-india-feature-specifications-price-in-marathi/#respond Wed, 26 Sep 2018 07:52:52 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=2266 सिक्योरिटी साठी फोनच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच हा फोन फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो.

The post 6जीबी रॅम आणि 6.3-इंचाच्या नॉच डिस्प्ले सह लॉन्च झाला डुअल कॅमेरा असलेला वीवो वी9 प्रो first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
वीवो कंपनी ने या महिन्यात भारतात आपली वी स्मार्टफोन सीरीज वाढवत वी11 आणि वी11 प्रो लॉन्च केला आहे. हे दोन्ही स्मार्टफोन वी शेप वाल्या हेलो नॉच डिस्प्ले सह सादर करण्यात आले आहेत. आज आपल्या या वी सीरीज मध्ये अनुज एक नवीन फोन जोडत वीवो ने वी9 प्रो पण भारतात लॉन्च केला आहे. वीवो ने वी9 प्रो 17,990 रुपयांमध्ये लॉन्च केला आहे जो शॉपिंग साइट अमेझॉन इंडिया वर एक्सक्लूसिव सेल साठी उपलब्ध होईल.

वीवो वी9 प्रो कंपनी ने मार्च मध्ये लॉन्च केलेल्या स्मार्टफोन वी9 चा अपडेटेड व्हर्जन आहे. वीवो वी9 कपंनीचा पहिला असा फोन होता जो भारतात नॉच डिस्प्ले सह लॉन्च झाला होता. वीवी वी9 प्रो अमेझॉन इंडिया वर लिस्ट करण्यात आला आहे तिथे हा आज पासून सेल साठी उपलब्ध झाला आहे. फोनचे फीचर्स व स्पेसिफिकेशन्स पाहता वीवो वी9 प्रो 19:9 आस्पेक्ट रेशियो सह सादर करण्यात आला आहे जो नॉच डिस्प्लेला सपोर्ट करतो.

वीवो वी9 प्रो मध्ये 2280 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन वॉल 6.3-इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे जो 2.5डी कर्व्ड ग्लास ने प्रोटेक्टेड आहे. हा फोन एंडरॉयड 8.1 ओरियो आधारित फनटच ओएस 4.0 सह सादर करण्यात आला आहे तसेच आॅक्टा-कोर प्रोसेसर सह क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 660 चिपसेट वर चालतो . तसेच ग्राफिक्स साठी वी9 प्रो मध्ये एड्रेनो 512जीपीयू देण्यात आला आहे.

कंपनी ने वी9 प्रो 6जीबी रॅम सह सादर केला आहे. फोन मध्ये 64जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात अली आहे जी माइक्रोएसडी कार्ड ने 256जीबी पर्यंत वाढवता येते. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता वीवो चा हा फोन डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर 13-मेगापिक्सलचा प्राइमरी आणि 2-मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. तसेच सेल्फी साठी हा फोन 16-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

वीवो वी9 प्रो डुअल सिम फोन आहे जो 4जी एलटीई ला सपोर्ट करतो. सिक्योरिटी साठी फोनच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच हा फोन फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. त्याचप्रमाणे पावर बॅकअप साठी फोन मध्ये 3260एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. वीवो वी9 प्रो 17,990 रुपयांमध्ये अमेझॉन इंडिया वरून विकत घेता येईल.

The post 6जीबी रॅम आणि 6.3-इंचाच्या नॉच डिस्प्ले सह लॉन्च झाला डुअल कॅमेरा असलेला वीवो वी9 प्रो first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-v9-pro-launched-in-india-feature-specifications-price-in-marathi/feed/ 0
सणासुदीच्या काळात सॅमसंग-वीवो ची भेट, या स्मार्टफोन्स च्या किंमती केल्या कमी https://www.91mobiles.com/marathi/vivo-x21-vivo-v9-vivo-y83-samsung-galaxy-j4-price-drop-india-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-x21-vivo-v9-vivo-y83-samsung-galaxy-j4-price-drop-india-in-marathi/#respond Mon, 27 Aug 2018 12:08:16 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1825 या प्राइस कट च्या लिस्ट मध्ये कंपनी ने हाईएंड डिवाईस पासून स्वस्त लो बजेट वाल्या स्मार्टफोन चा समावेश केला आहे.

The post सणासुदीच्या काळात सॅमसंग-वीवो ची भेट, या स्मार्टफोन्स च्या किंमती केल्या कमी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
देशात सणासुदीचे दिवस सुरू आहेत. हे दिवस लोकांसाठी अजून खास बनवण्यासाठी मोबाईल कंपन्या पण काही ना काही ऑफर्स घेऊन येत असतात. या फेस्टिवल सीजन च्या सुरवातीला दोन मोठे ब्रँड सॅमसंग आणि वीवो ने आपल्या खास स्मार्टफोन्स च्या किंमती कमी करून आपल्या फॅन्सना भेट दिली आहे. या प्राइस कट च्या लिस्ट मध्ये कंपनी ने हाईएंड डिवाईस पासून स्वस्त लो बजेट वाल्या स्मार्टफोन चा समावेश केला आहे. जर तुम्ही पण वीवो किंवा सॅमसंग चा नवीन फोन घेण्याचा प्लान करत असाल तर कंपनी ने स्वस्त केलेल्या स्मार्टफोन्सची खालील यादी तुमच्या कमी येईल.

वीवो
वीवो ने आपल्या हाईएंड डिवाईस एक्स21 ची किंमत 4,000 रुपयांनी कमी केली आहे. कंपनी ने मे महिन्यात हा स्मार्टफोन भारतात 35,990 रुपयांमध्ये लॉन्च केला होता. विशेष म्हणजे वीवो एक्स21 जगातील पहिला फोन आहे ज्यात ​स्क्रीन खाली फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आला आहे. फोन मध्ये 6.28-इंचाचा फुल एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन 6जीबी रॅम आणि क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 660 चिपसेट वर चालतो. किंमत कमी झाल्यानंतर हा फोन 31,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

तसेच वीवो इंडिया ने देशात लॉन्च केलेल्या पहिल्या नॉच डिस्प्ले वाल्या स्मार्टफोन वीवो वी9 ची किंमत 2,000 रुपयांनी कमी केली आहे. या प्राइस कट नंतर आता पर्यंत 20,990 रुपयांमध्ये मिळणार शानदार फोन 18,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल. त्याचबरोबर कंपनी च्या सर्वात स्वस्त नॉच डिस्प्ले वाल्या स्मार्टफोन्स पैकी एक वीवो वाय83 ची किंमत पण 1,000 रुपयांनी कमी करण्यात आली आहे. 14,990 रुपयांमध्ये लॉन्च झालेला हा फोन आता 13,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

सॅमसंग
आपल्या फॅन्सना भेट देत सॅमसंग इंडिया ने कंपनी द्वारा लो बजेट मध्ये लॉन्च केलेल्या गॅलेक्सी जे4 ची किंमत कमी केली आहे. सॅमसंग चा हा 4जी फोन 2जीबी रॅम आणि 3,000एमएएच ची बॅटरी सह बाजारात आला होता. कंपनी ने या फोनची किंमत 9,999 रुपये ठेवली होती पण आता सॅमसंग ने या फोन ची किंमत पण 1,000 रुपयानी कमी केली आहे. म्हणजे 9,999 रुपयांमध्ये लॉन्च झालेला गॅलेक्सी जे4 आता फक्त 8,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

The post सणासुदीच्या काळात सॅमसंग-वीवो ची भेट, या स्मार्टफोन्स च्या किंमती केल्या कमी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-x21-vivo-v9-vivo-y83-samsung-galaxy-j4-price-drop-india-in-marathi/feed/ 0
नॉच डिस्प्ले असलेले 5 सर्वात स्वस्त एंडरॉयड स्मार्टफोन https://www.91mobiles.com/marathi/notch-display-smartphone-in-india-under-budget-vivo-y81-oppo-a3s-vivo-v9-honor-9n-honor-play-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/notch-display-smartphone-in-india-under-budget-vivo-y81-oppo-a3s-vivo-v9-honor-9n-honor-play-in-marathi/#respond Fri, 17 Aug 2018 13:58:08 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1738 आम्ही 5 अशा स्वस्त नॉच डिस्प्ले वाल्या स्मार्टफोनची माहिती दिली आहे जे देशात कमी किंमतीत तुम्हाला आयफोन 10 वाला फील आणि नॉच डिस्प्लेची स्टाईल मारण्याची संधी देतील.

The post नॉच डिस्प्ले असलेले 5 सर्वात स्वस्त एंडरॉयड स्मार्टफोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
टेक दिग्गज कंपनी अॅप्पल ने गेल्या वर्षी आपला 10वा वर्धापनदिन साजरा करताना आयफोन 10 सादर केला होता. हा फोन जगासमोर येताच चर्चेत आला. आयफोन 10 ने स्मार्टफोन जगात नवीन ट्रेंड सुरू केला होता आणि हा ट्रेंड होता ‘नॉच डिस्प्ले’ चा. आयफोन 10 चा नॉच डिस्प्ले टेक विश्वा सोबतच स्मार्टफोन यूजर्स साठी पण अगदीच नवीन होता. अॅप्पल आयफोन 10 तर कंपनी ने हाईरेंज मध्ये आणला होता, पण नॉच डिस्प्ले कॉपी करून आजकाल सर्वच ब्रँड आपले फोन लॉन्च करत आहेत. भारतात पण असे अनेक स्मार्टफोन आहे जे आयफोन 10 प्रमाणे नॉच डिस्प्लेला सपोर्ट करतात. देशात हे नॉच डिस्प्ले वाले स्मार्टफोन वेगवेगळ्या बजेट मध्ये लॉन्च झाले आहेत. खाली आम्ही 5 अशा स्वस्त नॉच डिस्प्ले वाल्या स्मार्टफोनची माहिती दिली आहे जे देशात कमी किंमतीत तुम्हाला आयफोन 10 वाला फील आणि नॉच डिस्प्लेची स्टाईल मारण्याची संधी देतील.

1. वीवो वाय81
नॉच डिस्प्ले सह भारतात लॉन्च झालेला हा लेटेस्ट स्मार्टफोन आहे. या फोन मध्ये 19:9 आस्पेक्ट रेशियो वाला बेजल लेस डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच यात 1440 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन वाला 6.2-इंचाचा एचडी+ डिस्प्ले आहे जो कोर्निंग गोरिल्ला ग्लासने प्रोटेक्टेड आहे. वीवो वाय81 एंडरॉयड 8.1 ओरियो आधारित फनटच ओएस 4.0 वर सादर झाला आहे सोबतच हा 2.0गीगाहर्ट्ज आॅक्टा-कोर प्रोसेसर सह मीडियाटेक एमटी6762 चिपसेट वर चालतो.

वाय81 3जीबी रॅम सह 32जीबी इंटरनल स्टोरेज दिली आहे जी 256जीबी पर्यंत वाढवता येते. वीवो वाय81 च्या बॅक पॅनल वर एलईड फ्लॅश सह एफ/2.2 अपर्चर वाला 13-मेगापिक्सल चा रियर कॅमेरा देण्यात आला तर सेल्फी साठी या फोन मध्ये एफ/2.2 अपर्चर वाला5-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा आहे. हा एक 4जी स्मार्टफोन आहे जो डुअल सिम ला सपोर्ट करतो. बे​सिक कनेक्टिविटी फीचर्स सह या फोन मध्ये फेस अनलॉक फीचर पण देण्यात आला आहे तसेच पावर बॅकअप साठी यात 3,260एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. हा फोन 12,999 रुपयांमध्ये आॅनलाईन व आॅफलाईन दोन्ही प्लॅटफार्म वर सेल साठी उपलब्ध होईल.

2. ओपो ए3एस
ओपो चा हा फोन 6.2-इंचाच्या एचडी+ सुपर फुल स्क्रीन बेजल लेस नॉच डिस्प्ले सह लॉन्च करण्यात आला आहे ज्याच्या वरच्या बाजूला नॉच आहे. हा फोन एंडरॉयड 8.1 ओरियो आधारित कलरओएस 5.1 सह सादर करण्यात आला आहे. सोबतच हा 1.8गीगाहर्ट्ज आॅक्टा-कोर प्रोसेसर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 450 चिपसेट वर चालतो. भारतात हा फोन 2जीबी रॅम/16जीबी मेमरी आणि 3जीबी रॅम/32जीबी स्टोरेज वेरिएंट मध्ये उपलब्ध आहे.

ओपो ए3एस च्या बॅक पॅनल वर डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला जो 13-मेगापिक्सल आणि 2-मेगापिक्सल च्या कॅमेरा सेंसर ला सपोर्ट करतो. तसेच सेल्फी साठी या फोन मध्ये एआई ब्यूटीफाई फीचर असलेला 8-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. डुअल सिम व 4जी वोएलटीई सोबत अन्य बेसिक फीचर्स ला सपोर्ट करतो. कंपनी ने फोन मध्ये फेस अनलॉक फीचर दिला आहे तसेच पावर बॅकअप साठी यात 4,230एमएएच ची पावरफुल बॅटरी आहे. ओपो ए3एस चा 2जीबी/16जीबी वेरिएंट 10,990 रुपयांमध्ये तसेच 3जीबी/32जीबी वेरिएंट 13,990 रुपयांमध्ये फ्लिपकार्ट सह आॅफलाईन स्टोर मधून पण विकत घेता येईल.

3. आॅनर 9एन
हुआवई च्या सब-ब्रांड आॅनर ने लॉन्च केलेला हा स्टाईलिश आणि आर्कषक स्मार्टफोन आहे. हा फोन मेटल फ्रेम वर बनलेला आहे ज्याच्या बॅक पॅनल मिरर फिनिशिंग वाली आहे. हा फोन 2280 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 5.84-इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्ले सह सादर करण्यात आला आहे ज्याच्या वरच्या बाजूला नॉच आहे. एंडरॉयड 8.0 ओरियो आधारित ईएमयूआई 8.0 सोबत आॅनर 9एन हाईसिलिकॉन किरीन 659 चिपसेट वर चालतो.

आॅनर 9एन डुअल रियर कॅमेराला सपोर्ट करतो. याच्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सोबत 13-मेगापिक्सल आणि 2-मेगापिक्सल चे दोन कॅमेरा सेंसर देण्यात आले आहेत सेल्फी साठी फोन मध्ये 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. डुअल सिम व 4जी वोएलटीई सह फोन मध्ये रियर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. हा फोन फेस अनलॉक फीचर ला पण सपोर्ट करतो आणि पावर बॅकअप साठी यात 3,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. भारतीय बाजारात आॅनर 9एन चा 3जीबी/32जीबी वेरिएंट 11,999 रुपये, 4जीबी/64जीबी वेरिएंट 13,999 रुपये तसेच 4जीबी/128जीबी मेमरी वेरिएंट 17,999 रुपयांमध्ये सेल साठी उपलब्ध आहे.

4. वीवो वी9 यूथ
वीवो वी9 यूथ कपंनी च्या वीवो वी9 स्मार्टफोन चा स्वस्त मॉडेल आहे जो नॉच डिस्प्ले ला सपोर्ट करतो. 19:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या या फोन मध्ये 6.3-इंचाची फुल एचडी+ स्क्रीन देण्यात आली आहे जी कोर्निंग गोरिल्ला ग्लास कोटेड आहे. एंडरॉयड 8.1 ओरियो सोबतच हा क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 450 चिपसेट वर चालतो. वीवो ने या फोन मध्ये 4जीबी रॅम दिला आहे तसेच यात 32जीबी इंटरनल स्टोरेज आहे.

वी9 यूथ च्या बॅक पॅनल वर 16-मेगापिक्सल आणि 2-मेगापिक्सल चा डुअल रियर कॅमेरा सेटअप आहे. तसेच फोन च्या फ्रंट पॅनल वर एआई ब्यूटी फीचर वाला 16-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. 4जी वोएलटीई आणि डुअल सिम सोबत वी9 यूथ मध्ये रियर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे आणि पावर बॅकअप साठी या फोन मध्ये 3,260 एमएएच ची बॅटरी आहे. भारतीय बाजारात वीवो वी9 यूथ 18,990 रुपयांमध्ये सेल साठी उपलब्ध आहे.

5. आॅनर प्ले
आॅनर प्ले ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात भारतात लॉन्च झाला आहे. दमदार स्पेसिफिकेशन्स सोबत हा फोन नॉच डिस्प्ले ला सपोर्ट करतो. मेटल डिजाइन वाल्या या फोन मध्ये 6.3-इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. इमोशन यूआई 8.2 आधारित एंडरॉयड 8.1 ओरियो सह हा फोन 2.4गीगाहर्ट्ज आॅक्टा-कोर हाईसिलिकॉन किरीन 970 चिपसेट वर चालतो. या फोन मध्ये एआई आर्टिफिशियल इंटेलिजेंस टेक्नोलॉजी सोबत जीपीयू टर्बो टेक्नोलॉजी आहे.

आॅनर प्ले च्या बॅक पॅनल वर 16-मेगापिक्सल आणि 2-मेगापिक्सलचा डुअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे तसेच सेल्फी साठी फोन मध्ये 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. 4जी वोएलटीई, डुअल सिम व यूएसबी टाइप-सी सोबत हा फोन 3,750 एमएएच बॅटरीला सपोर्ट करतो. रियर फिंगरप्रिंट सेंसर सोबत फोन मध्ये फेस अनलॉक फीचर पण देण्यात आला आहे. इंडियन मार्केट मध्ये हा फोन अमेजॉन इंडिया वरून 4जीबी/64जीबी मेमरी वेरिएंट 19,999 रुपये तसेच 6जीबी रॅम/64जीबी मेमरी वेरिएंट 23,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

बोनस
विशेष म्हणजे काही दिवसांत ओपो कंपनी आपला अजून एक नॉच डिस्प्ले वाला स्मार्टफोन ओपो ए5 भारतात लॉन्च करणार आहे ज्यात 6.2-इंचाचा मोठा डिस्प्ले आणि 4,230एमएएच ची दमदार बॅटरी देण्यात येईल. तसेच आजच रियलमी च्या सेकेंड जेनेरेशन फोन रियलमी 2 ची माहिती समोर आली आहे आणि कंपनी हा स्मार्टफोन पण नॉच डिस्प्ले सह सादर करेल ज्यात डुअल रियर कॅमेरा असेल. हे दोन्ही स्मार्टफोन मीड रेंज व कमी किंमतीत लॉन्च केले जातील.

The post नॉच डिस्प्ले असलेले 5 सर्वात स्वस्त एंडरॉयड स्मार्टफोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/notch-display-smartphone-in-india-under-budget-vivo-y81-oppo-a3s-vivo-v9-honor-9n-honor-play-in-marathi/feed/ 0
4जीबी रॅम सह समोर आला वीवो चा नवीन स्मार्टफोन, चीनी वेबसाइट वर झाला लिस्ट https://www.91mobiles.com/marathi/vivo-1850-listed-on-geekbench-with-4gb-ram-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-1850-listed-on-geekbench-with-4gb-ram-in-marathi/#respond Mon, 30 Jul 2018 14:38:47 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1460 वीवो 1850 ला गीकबेंच च्या या लिस्टिंग मध्ये सिंगल-कोर मध्ये 760 स्कोर देण्यात आला आहे तर मल्टी-कोर मध्ये या फोन ला 3873 स्कोर मिळाला आहे.

The post 4जीबी रॅम सह समोर आला वीवो चा नवीन स्मार्टफोन, चीनी वेबसाइट वर झाला लिस्ट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
वीवो ने भारतीय बाजारात नॉच डिस्प्ले ची सुरवात कंपनी ने हाईएंड स्मार्टफोन वी9 सोबत केली होती. वीवो वी9 नंतर कंपनी ने देशात वी9 यूथ पण लॉन्च केला आहे. तसेच आता नॉच डिस्प्ले स्मार्टफोन सीरीज पुढे नेत कंपनी लवकरच आपला नवीन स्मार्टफोन बाजारात घेऊन येणार आहे. वीवो चा अजून एक नवीन स्मार्टफोन चीनी बेंचमार्किंग साइट गीकबेंच वर लिस्ट करण्यात आला आहे ज्यातून नवीन फोन चे स्पेसिफिकेशन्स आणि यासंबंधी महत्वाची माहिती समोर आली आहे.

वीवो चा नवीन स्मार्टफोन गीकबेंच वर वीवो 1850 मॉडल नंबर सह लिस्ट करण्यात आला आहे. या लिस्टिंग मध्ये फोन च्या रॅम व प्रोसेसर संबधित माहिती देण्यात आली आहे. लिस्टिंग नुसार वीवो च्या या आगामी स्मार्टफोन मध्ये 4जीबी रॅम मेमरी देण्यात येईल. गीकबेंच नुसार हा स्मार्टफोन एंडरॉयड 7.1.2 नुगट आधारित असेल तसेच क्वालकॉम च्या स्नॅपड्रॅगन 625 चिपसेट वर चालेल.

वीवो 1850 ला गीकबेंच च्या या लिस्टिंग मध्ये सिंगल-कोर मध्ये 760 स्कोर देण्यात आला आहे तर मल्टी-कोर मध्ये या फोन ला 3873 स्कोर मिळाला आहे. गीकबेंच ने फोन च्या डिस्प्ले, बॅटरी व अन्य स्पेसिफिकेशन्स ची माहिती दिली नाही पण लिस्टिंग वरून इतके स्पष्ट झाले आहे की कंपनी लवकरच अंर्तराष्ट्रीय मंचावरून आपला हा नवीन फोन सादर करेल. मीडिया रिपोर्ट नुसार हा फोन वीवो वी9 चा नवीन वर्जन असू शकतो.

वीवो वी9 पाहता गेल्या महिन्यात कंपनी ने इं​डोनेशियन मार्केट मध्ये हा स्मार्टफोन 6जीबी रॅम सह लॉन्च केला आहे. वी9 चा बेस वेरिएंट क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 626 चिपसेट सह सादर झाले आहे तर फोन चा 6जीबी रॅम वेरिएंट क्वालकॉम च्या स्नॅपड्रॅगन 660 चिपसेट वर चालतो. सोबतच नवीन वेरिएंट मध्ये फनटच ओएस 4.0 आधारित एंडरॉयड 8.1 ओरियो देण्यात आला आहे.

आशा प्रकारे वीवो वी9 चा जुना मॉडेल 16-मेगापिक्सल आणि 5-मेगापिक्सल चा डुअल रियर कॅमेरा आणि 24-मेगापिक्सल च्या फ्रंट कॅमेरा ला सपोर्ट करतो. तर नवीन 6जीबी रॅम वेरिएंट मध्ये 13-मेगापिक्सल आणि 2-मेगापिक्सल चा ​डुअल रियर कॅमेरा आणि 12-मेगापिक्सल चा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. वीवो वी9 चे स्पेसिफिकेशन्स पाहता मोठया स्क्रीन आणि स्टाइलिश डिजाइन सह सादर करण्यात आलेल्या या वीवो वी9 मध्ये पण 2280×1080 पिक्सल रेजल्यूशन वाली 6.3-इंचाची फुल एचडी+ स्क्रीन देण्यात आली आहे. फोन मध्ये 64जीबी इंटरनल मेमरी तसेच पावर बॅकअप साठी 3,260 एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

The post 4जीबी रॅम सह समोर आला वीवो चा नवीन स्मार्टफोन, चीनी वेबसाइट वर झाला लिस्ट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-1850-listed-on-geekbench-with-4gb-ram-in-marathi/feed/ 0
6.3-इंचाच्या नॉच डिस्प्ले आणि 16-एमपी सेल्फी कॅमेरा वाल्या वीवो वी9 यूथ च्या किंमतीत झाली 1,000 रूपयांची कपात https://www.91mobiles.com/marathi/vivo-v9-youth-price-cut-by-1000-rs-in-india-specifications-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-v9-youth-price-cut-by-1000-rs-in-india-specifications-in-marathi/#respond Fri, 22 Jun 2018 11:35:18 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1022 सिक्योरिटी साठी फोन च्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर आहे तसेच पावर बॅकअप साठी यात 3,260एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

The post 6.3-इंचाच्या नॉच डिस्प्ले आणि 16-एमपी सेल्फी कॅमेरा वाल्या वीवो वी9 यूथ च्या किंमतीत झाली 1,000 रूपयांची कपात first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
टेक कंपनी वीवो ने एप्रिल मध्ये भारतात वी9 यूथ स्मार्टफोन लॉन्च केला होता. हा स्मार्टफोन वी9 चा दुसरा वर्जन आहे जो सेल्फी सेंट्रिक स्मार्टफोन रुपात बाजारात आणला गेला आहे. कंपनी ने हा स्मार्टफोन 18,990 रुपयांमध्ये लॉन्च केला होता. आता आपल्या फॅन्सना भेट देत वीवो इंडिया ने वी9 यूथ ची किंमत 1,000 रुपयांनी कमी केली आहे. या कपाती नंतर वीवो वी9 यूथ 17,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

वीवो वी9 यूथ च्या कमी झालेल्या किंमतीची माहिती आम्हाला रिटेल मार्केट मधील सूत्रांकडून मिळाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार हा फोन आता 1,000 रुपयांच्या कपाती नंतर 17,990 रुपयांमध्ये सेल साठी उपलब्ध होईल. पण हे सांगण्यात आले नाही की वी9 यूथ फक्त आॅफलाईन बाजारात कमी किंमतीत मिळेल की आॅनलाईन शॉपिंग साइट्स पण हा फोन 17,990 रुपयांमध्ये विकतील. पण बातमी देण्या आधी पर्यंत अमेजॉन वर वी9 यूथ जुन्याच किंमतीवर लिस्ट होता.

वीवो च्या या शानदार स्मार्टफोन चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा स्मार्टफोन 19:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या बेजल लेस डिसप्ले सह सादर करण्यात आला आहे ज्यावर नॉच आहे. या फोन मध्ये 2280 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन वाला 6.3-इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन एंडरॉयड 8.1 ओरियो आधारित फनटच 4.0 ओएस सह सादर झाला आहे सोबतच हा क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 450 चिपसेट वर चालतो.

कंपनी ने या फोन मध्ये 4जीबी रॅम दिला आहे. फोन मध्ये 32जीबी इंटरनल स्टोरेज आहे जी माइक्रोएसडी कार्ड ने 256जीबी पर्यंत वाढवता येते. फोटोग्राफी साठी फोन मध्ये एआई टेक्निक वाला 16-मेगापिक्सल चा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे जी फोन ची मुख्य यूएसपी मधील एक आहे. तसेच फोन च्या बॅक पॅनल वर 16-मेगापिक्सल आणि 2-मेगापिक्सल चा डुअल रियर कॅमेरा सेटअप आहे.

वीवो वी9 यूथ 4जी फोन आहे जो बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सह डुअल सिम ला सपोर्ट करतो. सिक्योरिटी साठी फोन च्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर आहे तसेच पावर बॅकअप साठी यात 3,260एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. वी9 यूथ नवीन किंमतीत लवकरच आॅनलाईन व आॅफलाईन बाजारत सेल साठी उपलब्ध होईल.

The post 6.3-इंचाच्या नॉच डिस्प्ले आणि 16-एमपी सेल्फी कॅमेरा वाल्या वीवो वी9 यूथ च्या किंमतीत झाली 1,000 रूपयांची कपात first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-v9-youth-price-cut-by-1000-rs-in-india-specifications-in-marathi/feed/ 0