नॉच डिस्प्ले असलेले 5 सर्वात स्वस्त एंडरॉयड स्मार्टफोन

टेक दिग्गज कंपनी अॅप्पल ने गेल्या वर्षी आपला 10वा वर्धापनदिन साजरा करताना आयफोन 10 सादर केला होता. हा फोन जगासमोर येताच चर्चेत आला. आयफोन 10 ने स्मार्टफोन जगात नवीन ट्रेंड सुरू केला होता आणि हा ट्रेंड होता ‘नॉच डिस्प्ले’ चा. आयफोन 10 चा नॉच डिस्प्ले टेक विश्वा सोबतच स्मार्टफोन यूजर्स साठी पण अगदीच नवीन होता. अॅप्पल आयफोन 10 तर कंपनी ने हाईरेंज मध्ये आणला होता, पण नॉच डिस्प्ले कॉपी करून आजकाल सर्वच ब्रँड आपले फोन लॉन्च करत आहेत. भारतात पण असे अनेक स्मार्टफोन आहे जे आयफोन 10 प्रमाणे नॉच डिस्प्लेला सपोर्ट करतात. देशात हे नॉच डिस्प्ले वाले स्मार्टफोन वेगवेगळ्या बजेट मध्ये लॉन्च झाले आहेत. खाली आम्ही 5 अशा स्वस्त नॉच डिस्प्ले वाल्या स्मार्टफोनची माहिती दिली आहे जे देशात कमी किंमतीत तुम्हाला आयफोन 10 वाला फील आणि नॉच डिस्प्लेची स्टाईल मारण्याची संधी देतील.

1. वीवो वाय81
नॉच डिस्प्ले सह भारतात लॉन्च झालेला हा लेटेस्ट स्मार्टफोन आहे. या फोन मध्ये 19:9 आस्पेक्ट रेशियो वाला बेजल लेस डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच यात 1440 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन वाला 6.2-इंचाचा एचडी+ डिस्प्ले आहे जो कोर्निंग गोरिल्ला ग्लासने प्रोटेक्टेड आहे. वीवो वाय81 एंडरॉयड 8.1 ओरियो आधारित फनटच ओएस 4.0 वर सादर झाला आहे सोबतच हा 2.0गीगाहर्ट्ज आॅक्टा-कोर प्रोसेसर सह मीडियाटेक एमटी6762 चिपसेट वर चालतो.

वाय81 3जीबी रॅम सह 32जीबी इंटरनल स्टोरेज दिली आहे जी 256जीबी पर्यंत वाढवता येते. वीवो वाय81 च्या बॅक पॅनल वर एलईड फ्लॅश सह एफ/2.2 अपर्चर वाला 13-मेगापिक्सल चा रियर कॅमेरा देण्यात आला तर सेल्फी साठी या फोन मध्ये एफ/2.2 अपर्चर वाला5-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा आहे. हा एक 4जी स्मार्टफोन आहे जो डुअल सिम ला सपोर्ट करतो. बे​सिक कनेक्टिविटी फीचर्स सह या फोन मध्ये फेस अनलॉक फीचर पण देण्यात आला आहे तसेच पावर बॅकअप साठी यात 3,260एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. हा फोन 12,999 रुपयांमध्ये आॅनलाईन व आॅफलाईन दोन्ही प्लॅटफार्म वर सेल साठी उपलब्ध होईल.

2. ओपो ए3एस
ओपो चा हा फोन 6.2-इंचाच्या एचडी+ सुपर फुल स्क्रीन बेजल लेस नॉच डिस्प्ले सह लॉन्च करण्यात आला आहे ज्याच्या वरच्या बाजूला नॉच आहे. हा फोन एंडरॉयड 8.1 ओरियो आधारित कलरओएस 5.1 सह सादर करण्यात आला आहे. सोबतच हा 1.8गीगाहर्ट्ज आॅक्टा-कोर प्रोसेसर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 450 चिपसेट वर चालतो. भारतात हा फोन 2जीबी रॅम/16जीबी मेमरी आणि 3जीबी रॅम/32जीबी स्टोरेज वेरिएंट मध्ये उपलब्ध आहे.

ओपो ए3एस च्या बॅक पॅनल वर डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला जो 13-मेगापिक्सल आणि 2-मेगापिक्सल च्या कॅमेरा सेंसर ला सपोर्ट करतो. तसेच सेल्फी साठी या फोन मध्ये एआई ब्यूटीफाई फीचर असलेला 8-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. डुअल सिम व 4जी वोएलटीई सोबत अन्य बेसिक फीचर्स ला सपोर्ट करतो. कंपनी ने फोन मध्ये फेस अनलॉक फीचर दिला आहे तसेच पावर बॅकअप साठी यात 4,230एमएएच ची पावरफुल बॅटरी आहे. ओपो ए3एस चा 2जीबी/16जीबी वेरिएंट 10,990 रुपयांमध्ये तसेच 3जीबी/32जीबी वेरिएंट 13,990 रुपयांमध्ये फ्लिपकार्ट सह आॅफलाईन स्टोर मधून पण विकत घेता येईल.

3. आॅनर 9एन
हुआवई च्या सब-ब्रांड आॅनर ने लॉन्च केलेला हा स्टाईलिश आणि आर्कषक स्मार्टफोन आहे. हा फोन मेटल फ्रेम वर बनलेला आहे ज्याच्या बॅक पॅनल मिरर फिनिशिंग वाली आहे. हा फोन 2280 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 5.84-इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्ले सह सादर करण्यात आला आहे ज्याच्या वरच्या बाजूला नॉच आहे. एंडरॉयड 8.0 ओरियो आधारित ईएमयूआई 8.0 सोबत आॅनर 9एन हाईसिलिकॉन किरीन 659 चिपसेट वर चालतो.

आॅनर 9एन डुअल रियर कॅमेराला सपोर्ट करतो. याच्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सोबत 13-मेगापिक्सल आणि 2-मेगापिक्सल चे दोन कॅमेरा सेंसर देण्यात आले आहेत सेल्फी साठी फोन मध्ये 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. डुअल सिम व 4जी वोएलटीई सह फोन मध्ये रियर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. हा फोन फेस अनलॉक फीचर ला पण सपोर्ट करतो आणि पावर बॅकअप साठी यात 3,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. भारतीय बाजारात आॅनर 9एन चा 3जीबी/32जीबी वेरिएंट 11,999 रुपये, 4जीबी/64जीबी वेरिएंट 13,999 रुपये तसेच 4जीबी/128जीबी मेमरी वेरिएंट 17,999 रुपयांमध्ये सेल साठी उपलब्ध आहे.

4. वीवो वी9 यूथ
वीवो वी9 यूथ कपंनी च्या वीवो वी9 स्मार्टफोन चा स्वस्त मॉडेल आहे जो नॉच डिस्प्ले ला सपोर्ट करतो. 19:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या या फोन मध्ये 6.3-इंचाची फुल एचडी+ स्क्रीन देण्यात आली आहे जी कोर्निंग गोरिल्ला ग्लास कोटेड आहे. एंडरॉयड 8.1 ओरियो सोबतच हा क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 450 चिपसेट वर चालतो. वीवो ने या फोन मध्ये 4जीबी रॅम दिला आहे तसेच यात 32जीबी इंटरनल स्टोरेज आहे.

वी9 यूथ च्या बॅक पॅनल वर 16-मेगापिक्सल आणि 2-मेगापिक्सल चा डुअल रियर कॅमेरा सेटअप आहे. तसेच फोन च्या फ्रंट पॅनल वर एआई ब्यूटी फीचर वाला 16-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. 4जी वोएलटीई आणि डुअल सिम सोबत वी9 यूथ मध्ये रियर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे आणि पावर बॅकअप साठी या फोन मध्ये 3,260 एमएएच ची बॅटरी आहे. भारतीय बाजारात वीवो वी9 यूथ 18,990 रुपयांमध्ये सेल साठी उपलब्ध आहे.

5. आॅनर प्ले
आॅनर प्ले ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात भारतात लॉन्च झाला आहे. दमदार स्पेसिफिकेशन्स सोबत हा फोन नॉच डिस्प्ले ला सपोर्ट करतो. मेटल डिजाइन वाल्या या फोन मध्ये 6.3-इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. इमोशन यूआई 8.2 आधारित एंडरॉयड 8.1 ओरियो सह हा फोन 2.4गीगाहर्ट्ज आॅक्टा-कोर हाईसिलिकॉन किरीन 970 चिपसेट वर चालतो. या फोन मध्ये एआई आर्टिफिशियल इंटेलिजेंस टेक्नोलॉजी सोबत जीपीयू टर्बो टेक्नोलॉजी आहे.

आॅनर प्ले च्या बॅक पॅनल वर 16-मेगापिक्सल आणि 2-मेगापिक्सलचा डुअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे तसेच सेल्फी साठी फोन मध्ये 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. 4जी वोएलटीई, डुअल सिम व यूएसबी टाइप-सी सोबत हा फोन 3,750 एमएएच बॅटरीला सपोर्ट करतो. रियर फिंगरप्रिंट सेंसर सोबत फोन मध्ये फेस अनलॉक फीचर पण देण्यात आला आहे. इंडियन मार्केट मध्ये हा फोन अमेजॉन इंडिया वरून 4जीबी/64जीबी मेमरी वेरिएंट 19,999 रुपये तसेच 6जीबी रॅम/64जीबी मेमरी वेरिएंट 23,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

बोनस
विशेष म्हणजे काही दिवसांत ओपो कंपनी आपला अजून एक नॉच डिस्प्ले वाला स्मार्टफोन ओपो ए5 भारतात लॉन्च करणार आहे ज्यात 6.2-इंचाचा मोठा डिस्प्ले आणि 4,230एमएएच ची दमदार बॅटरी देण्यात येईल. तसेच आजच रियलमी च्या सेकेंड जेनेरेशन फोन रियलमी 2 ची माहिती समोर आली आहे आणि कंपनी हा स्मार्टफोन पण नॉच डिस्प्ले सह सादर करेल ज्यात डुअल रियर कॅमेरा असेल. हे दोन्ही स्मार्टफोन मीड रेंज व कमी किंमतीत लॉन्च केले जातील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here