Vivo X60 Pro 5G - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Wed, 30 Dec 2020 12:25:30 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 सर्वात शानदार कॅमेरा आणि ताकदवान प्रोसेसर सह आला Vivo X60 व X60 Pro, जाणून घ्या किंमत https://www.91mobiles.com/marathi/vivo-x60-pro-launch-price-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-x60-pro-launch-price-specifications/#respond Wed, 30 Dec 2020 12:24:52 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9494 कंपनीने मंगळवारी Vivo X60 आणि X60 Pro आपल्या घरच्या मार्केट मध्ये सादर केले आहेत.

The post सर्वात शानदार कॅमेरा आणि ताकदवान प्रोसेसर सह आला Vivo X60 व X60 Pro, जाणून घ्या किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
अनेक दिवसांपासून माहिती समोर येत होती कि वीवो चीन मध्ये आपली एक्स60 सीरीज लॉन्च करण्याची तयारी करत आहे. तसेच, कंपनीने मंगळवारी Vivo X60 आणि X60 Pro आपल्या घरच्या मार्केट मध्ये सादर केले आहेत.या दोन्ही नवीन स्मार्टफोन मध्ये सॅमसंगचा Exynos 1080 प्रोसेसर देण्यात आला आहे, जो 5G टेक्नॉलॉजीला सपोर्ट करतो. तसेच दोन्ही मध्ये पंच-होल डिस्प्ले आणि ZEISS च्या ऑप्टिकल लेंस सह येतात. नवीन वीवो एक्स60 सीरीज आधीच्या वीवो एक्स50 सीरीजची जागा घेईल.

Vivo X60 Pro+ केला टीज

Vivo X60 आणि Vivo X60 Pro सोबतच कंपनीने Vivo X60 Pro+ टीज केला आहे. हा या सीरीजचा प्रीमियम स्मार्टफोन आहे जो जानेवारी मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 888 SoC सह लॉन्च होईल. पण अजूनही लॉन्च डेट बद्दल कोणतीही माहिती दिली नाही. चीन व्यतिरिक्त हा फोन दुसऱ्या मार्केट्स मध्ये कधी येईल याबाबत पण कोणतीही माहिती समोर आली नाही.

डिजाइन

लुक आणि डिजाइनच्या बाबतीत दोन्ही फोन एक सारखे आहेत. दोन्ही फोन्सच्या फ्रंटला मध्यभागी पंच होल कटआउट देण्यात आली आहे, ज्यात सेल्फी कॅमेरा आहे. सोबतच दोन्ही फोनच्या कडा बेजल लेस आहेत. फोन्सच्या बॉटमला स्पीकर ग्रिल आणि टाइप-सी पोर्ट आहे. रियर लुक पाहता यात क्वाड कॅमेरा सेटअप आणि एलईडी फ्लॅश सह ऑप्टिकल लेंस आहे. फोनच्या उजवीकडे वॉल्यूम रॉकर बटन आणि ऑन-ऑफ बटन आहे.

हे देखील वाचा :

Vivo X60 Pro चे स्पेसिफिकेशन्स

Vivo X60 Pro चे स्पेसिफिकेशन्स पाहता यात 6.56-इंचाचा ऐमोलेड डिस्प्ले FHD+ रिजोल्यूशन आणि 120Hz रिफ्रेश रेट आहे. डिस्प्ले 19.8:9 आस्पेक्ट रेश्यो, HDR10+ आणि P3 कलर गेमूट आहे. त्याचबरोबर फोन मध्ये 5nm Exynos 1080 SoC सह 12GB LPPRD4x रॅम + 256GB UFS 3.1 स्टोरेज देण्यात आली आहे. फोन OriginOS सह अँड्रॉइड 11 वर चालतो. फोन मध्ये पवार बॅकअपसाठी 4,300mAh ची बॅटरी देण्यात आली आहे जी 33W फास्ट चार्जिंग सह येते.

फोटोग्राफीसाठी Vivo X60 प्रो मध्ये क्वाड-कॅमेरा सेटअप, ज्यात 48MP (f / 1.48) Sony IMX598 प्राइमरी सेंसर, 5x ऑप्टिकल झूम सह 8MP पेरिस्कोप टेलीफोटो लेंस आणि 60x डिजिटल झूम, 13GB 120-डिग्री अल्ट्रा-वाइड लेंस, आणि 50mm फोकल लेन्थ सह अजून एक 13MP पोर्ट्रेट लेंस देण्यात आली आहे. हँडसेट दुसऱ्या जेनरेशनच्या माइक्रो-गिंबल ओआईएस टेक्नॉलॉजी सह येतो, फ्रंटला सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 32MP स्नॅपर आहे.

हे देखील वाचा :

Vivo X60 चे स्पेसिफिकेशन्स

Vivo X60 चे स्पेसिफिकेशन्स जवळपास प्रो मॉडेल प्रमाणेच आहे. फक्त वीवो एक्स60 मध्ये पावर बॅकअपसाठी 4,300mAh ची बॅटरी आहे. याव्यतिरिक्त वीवो एक्स60 आणि एक्स60 प्रो मध्ये कोणताही फरक नाही.

Vivo X60 आणि Vivo X60 Pro ची किंमत

Vivo X60 चीन मध्ये तीन वेरिएंट मध्ये सादर केला गेला आहे. हँडसेटच्या 8GB + 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत CNY 3,498 (जवळपास 39,300 रुपये), 8GB + 256GB स्टोरेज वेरिएंटची किंमत CNY 3,798 (जवळपास 42,700 रुपये) आणि 12GB + 256GB स्टोरेज वेरिएंटची किंमत CNY 3,998 (जवळपास 45,000 रुपये) आहे. दुसरीकडे वीवो X60 प्रो फक्त एकाच वेरिएंट मध्ये सादर केला गेला आहे. तसेच 12GB + 256GB स्टोरेज मॉडेलची किंमत CNY 4,498 (जवळपास 50,600 रुपये) आहे.

कलर ऑप्शन पाहता विवो X60 ग्रे, पर्पल आणि व्हाईट रंगात आला आहे, तर विवो X60 प्रो ग्रे आणि पर्पल रंगात सादर केला गेला आहे. दोन्ही फोन चीन मध्ये प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध आहेत, ज्यांची शिपमेंट 8 जानेवारी पासून सुरु होत आहे.

The post सर्वात शानदार कॅमेरा आणि ताकदवान प्रोसेसर सह आला Vivo X60 व X60 Pro, जाणून घ्या किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-x60-pro-launch-price-specifications/feed/ 0
Vivo X60 5G सीरीज 29 डिसेंबरला होईल लॉन्च, Samsung चिपसेट वर करेल काम https://www.91mobiles.com/marathi/vivo-x60-pro-5g-series-to-launch-on-29-december/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-x60-pro-5g-series-to-launch-on-29-december/#respond Mon, 14 Dec 2020 08:39:27 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9296 चर्चा अशी आहे कि 29 डिसेंबरला Vivo X60 5G, Vivo X60 Pro 5G आणि Vivo X60 Pro Plus 5G स्मार्टफोन टेक मंचावर एंट्री घेऊ शकतात.

The post Vivo X60 5G सीरीज 29 डिसेंबरला होईल लॉन्च, Samsung चिपसेट वर करेल काम first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Vivo बद्दल अनेक दिवसांपासून बातमी समोर येत होती कि कंपनी आपल्या ‘एक्स सीरीज’ च्या नवीन जेनरेशन वर काम करत आहे जी एक्स60 नावाने सादर केली जाईल. वेगवेगळ्या लीक्स मध्ये या सीरीज संबंधित अनेक डिटेल्स पण समोर आले आहेत. आता कंपनीने आपल्या फॅन्सची उत्सुकता समजून वीवो एक्स60 सीरीजची लॉन्च डेट सांगितली आहे. वीवोने सांगितले आहे कि कंपनी येत्या 29 डिसेंबरला एक मोठ्या ईवेंटचे आयोजन करणार आहे ज्याच्या मंचावरून Vivo X60 सीरीज टेक मंचावर सादर केली जाईल.

Vivo X60 सीरीजच्या लॉन्च डेट सोबतच कंपनीने टीजर पोस्टर पण प्रसिद्ध केला आहे ज्यात फोनच्या लुक व डिजाईन सोबतच अनेक महत्वाच्या स्पेसिफिकेशन्स आणि आर्कषक फीचर्सचा पण उल्लेख केला गेला आहे. वीवोने हालांकि आतापर्यंत हे स्पष्ट झाले नाही कि एक्स60 सीरीज अंतगर्त किती फोन लॉन्च होतील आणि त्यांची नावे काय असतील. चर्चा अशी आहे कि 29 डिसेंबरला Vivo X60 5G, Vivo X60 Pro 5G आणि Vivo X60 Pro Plus 5G स्मार्टफोन टेक मंचावर एंट्री घेऊ शकतात.

हे डिटेल्स झाले ऑफिशियल

वीवो कंपनीने लॉन्च डेट शेयर करण्यासोबतच असे सांगितले आहे कि एक्स60 सीरीज सॅमसंगच्या लेटेस्ट आणि पावरफुल एक्सनॉस 1080 चिपसेट वर लॉन्च केली जाईल. विशेष म्हणजे हा चिपसेट 5G कनेक्टिविटीला सपोर्ट करतो. बोलले जात आहे कि वीवो एक्स60 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळेल तसेच एक्स60 प्रो क्वॉड रियर कॅमेरा सेटअप वर लॉन्च केला जाईल. सीरीज मध्ये स्मार्टफोन अल्ट्रा स्टेबल माइक्रो हेड कॅमेरा सेंसर सह येईल आणि गिंबल स्टेबलाइजेशन आणि नाईट विजन 2.0 सारखे फीचर्स मिळतील.

हे देखील वाचा : OPPO Reno5 Pro 5G येत आहे भारतात, पुढील महिन्यात होईल हा पावरफुल फोनची एंट्री

असे असू शकतात स्पेसिफिकेशन्स

Vivo X60 सीरीज संबंधित लीक्स पाहता आतापर्यंत समोर आले आहे कि यात समाविष्ट असलेले स्मार्टफोन्स पंच होल डिजाईन वर लॉन्च केले जातील आणि 6.65 इंचाच्या डिस्प्लेला सपोर्ट करतील. फोन डिस्प्लेची स्क्रीन रिजोल्यूशन 1080 × 2340 पिक्सल असू शकते आणि त्याचबरोबर 120 हर्ट्ज रिफ्रेश रेट मिळू शकतो. लीकनुसार वीवो एक्स60 मध्ये पावर बॅकअपसाठी 4,315एमएएचची बॅटरी दिली जाऊ शकते तसेच 33वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट मिळू शकतो.

वीवोच्या हे नवीन फोन्स 8GB RAM सोबतच 128 GB आणि 256 GB वेरियंट मध्ये लॉन्च केला जाऊ शकतात. वीवो एक्स60 सीरीज के स्मार्टफोन्स मध्ये फोटोग्राफीसाठी क्वाड रियर कॅमेरा असेल. कॅमेरा सेटअप मध्ये 48 मेगापिक्सलचा असू शकतो. तसेच 8 मेगापिक्सलची टेलिफोटो लेंस, 8 मेगापिक्सलच्या अल्ट्रावाइड लेंस सोबतच 13 मेगापिक्सलचा डेप्थ सेंसर पण असू शकतात. फोन मध्ये व्हिडीओ कॉलिंग आणि सेल्फीसाठी 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला जाऊ शकतो.

The post Vivo X60 5G सीरीज 29 डिसेंबरला होईल लॉन्च, Samsung चिपसेट वर करेल काम first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-x60-pro-5g-series-to-launch-on-29-december/feed/ 0