अनेक दिवसांपासून माहिती समोर येत होती कि वीवो चीन मध्ये आपली एक्स60 सीरीज लॉन्च करण्याची तयारी करत आहे. तसेच, कंपनीने मंगळवारी Vivo X60 आणि X60 Pro आपल्या घरच्या मार्केट मध्ये सादर केले आहेत.या दोन्ही नवीन स्मार्टफोन मध्ये सॅमसंगचा Exynos 1080 प्रोसेसर देण्यात आला आहे, जो 5G टेक्नॉलॉजीला सपोर्ट करतो. तसेच दोन्ही मध्ये पंच-होल डिस्प्ले आणि ZEISS च्या ऑप्टिकल लेंस सह येतात. नवीन वीवो एक्स60 सीरीज आधीच्या वीवो एक्स50 सीरीजची जागा घेईल.
Vivo X60 Pro+ केला टीज
Vivo X60 आणि Vivo X60 Pro सोबतच कंपनीने Vivo X60 Pro+ टीज केला आहे. हा या सीरीजचा प्रीमियम स्मार्टफोन आहे जो जानेवारी मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 888 SoC सह लॉन्च होईल. पण अजूनही लॉन्च डेट बद्दल कोणतीही माहिती दिली नाही. चीन व्यतिरिक्त हा फोन दुसऱ्या मार्केट्स मध्ये कधी येईल याबाबत पण कोणतीही माहिती समोर आली नाही.
डिजाइन
लुक आणि डिजाइनच्या बाबतीत दोन्ही फोन एक सारखे आहेत. दोन्ही फोन्सच्या फ्रंटला मध्यभागी पंच होल कटआउट देण्यात आली आहे, ज्यात सेल्फी कॅमेरा आहे. सोबतच दोन्ही फोनच्या कडा बेजल लेस आहेत. फोन्सच्या बॉटमला स्पीकर ग्रिल आणि टाइप-सी पोर्ट आहे. रियर लुक पाहता यात क्वाड कॅमेरा सेटअप आणि एलईडी फ्लॅश सह ऑप्टिकल लेंस आहे. फोनच्या उजवीकडे वॉल्यूम रॉकर बटन आणि ऑन-ऑफ बटन आहे.
हे देखील वाचा :
Vivo X60 Pro चे स्पेसिफिकेशन्स
Vivo X60 Pro चे स्पेसिफिकेशन्स पाहता यात 6.56-इंचाचा ऐमोलेड डिस्प्ले FHD+ रिजोल्यूशन आणि 120Hz रिफ्रेश रेट आहे. डिस्प्ले 19.8:9 आस्पेक्ट रेश्यो, HDR10+ आणि P3 कलर गेमूट आहे. त्याचबरोबर फोन मध्ये 5nm Exynos 1080 SoC सह 12GB LPPRD4x रॅम + 256GB UFS 3.1 स्टोरेज देण्यात आली आहे. फोन OriginOS सह अँड्रॉइड 11 वर चालतो. फोन मध्ये पवार बॅकअपसाठी 4,300mAh ची बॅटरी देण्यात आली आहे जी 33W फास्ट चार्जिंग सह येते.
फोटोग्राफीसाठी Vivo X60 प्रो मध्ये क्वाड-कॅमेरा सेटअप, ज्यात 48MP (f / 1.48) Sony IMX598 प्राइमरी सेंसर, 5x ऑप्टिकल झूम सह 8MP पेरिस्कोप टेलीफोटो लेंस आणि 60x डिजिटल झूम, 13GB 120-डिग्री अल्ट्रा-वाइड लेंस, आणि 50mm फोकल लेन्थ सह अजून एक 13MP पोर्ट्रेट लेंस देण्यात आली आहे. हँडसेट दुसऱ्या जेनरेशनच्या माइक्रो-गिंबल ओआईएस टेक्नॉलॉजी सह येतो, फ्रंटला सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 32MP स्नॅपर आहे.
हे देखील वाचा :
Vivo X60 चे स्पेसिफिकेशन्स
Vivo X60 चे स्पेसिफिकेशन्स जवळपास प्रो मॉडेल प्रमाणेच आहे. फक्त वीवो एक्स60 मध्ये पावर बॅकअपसाठी 4,300mAh ची बॅटरी आहे. याव्यतिरिक्त वीवो एक्स60 आणि एक्स60 प्रो मध्ये कोणताही फरक नाही.
Vivo X60 आणि Vivo X60 Pro ची किंमत
Vivo X60 चीन मध्ये तीन वेरिएंट मध्ये सादर केला गेला आहे. हँडसेटच्या 8GB + 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत CNY 3,498 (जवळपास 39,300 रुपये), 8GB + 256GB स्टोरेज वेरिएंटची किंमत CNY 3,798 (जवळपास 42,700 रुपये) आणि 12GB + 256GB स्टोरेज वेरिएंटची किंमत CNY 3,998 (जवळपास 45,000 रुपये) आहे. दुसरीकडे वीवो X60 प्रो फक्त एकाच वेरिएंट मध्ये सादर केला गेला आहे. तसेच 12GB + 256GB स्टोरेज मॉडेलची किंमत CNY 4,498 (जवळपास 50,600 रुपये) आहे.
कलर ऑप्शन पाहता विवो X60 ग्रे, पर्पल आणि व्हाईट रंगात आला आहे, तर विवो X60 प्रो ग्रे आणि पर्पल रंगात सादर केला गेला आहे. दोन्ही फोन चीन मध्ये प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध आहेत, ज्यांची शिपमेंट 8 जानेवारी पासून सुरु होत आहे.
















