Vivo Y01A - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 10 Mar 2023 04:40:14 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Vivo Y01A ची थायलंडमध्ये एंट्री; फोनमध्ये MediaTek Helio P35 चिपसेट https://www.91mobiles.com/marathi/low-budget-mobile-phone-vivo-y01-launched-know-cheap-price-features-specifications-sale-details/ https://www.91mobiles.com/marathi/low-budget-mobile-phone-vivo-y01-launched-know-cheap-price-features-specifications-sale-details/#respond Tue, 15 Nov 2022 10:28:37 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=14959 विवोनं टेक मंचावर आपली वाय सीरीजचा विस्तार करत नवीन मोबाइल फोन Vivo Y01A लाँच केला आहे. विवो वाय01ए एक लो बजेट स्मार्टफोन आहे जो सध्या थायलंडमध्ये सेलसाठी उपलब्ध झाला आहे. भारतीय करंसीनुसार विवो वाय01ए ची किंमत 9 हजार रुपयांच्या आसपास आहे. या नव्या विवो मोबाइल फोनमध्ये MediaTek Helio P35 चिपसेट, 8MP Camera आणि 5,000mAh Battery […]

The post Vivo Y01A ची थायलंडमध्ये एंट्री; फोनमध्ये MediaTek Helio P35 चिपसेट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
विवोनं टेक मंचावर आपली वाय सीरीजचा विस्तार करत नवीन मोबाइल फोन Vivo Y01A लाँच केला आहे. विवो वाय01ए एक लो बजेट स्मार्टफोन आहे जो सध्या थायलंडमध्ये सेलसाठी उपलब्ध झाला आहे. भारतीय करंसीनुसार विवो वाय01ए ची किंमत 9 हजार रुपयांच्या आसपास आहे. या नव्या विवो मोबाइल फोनमध्ये MediaTek Helio P35 चिपसेट, 8MP Camera आणि 5,000mAh Battery सारखे स्पेसिफिकेशन्स मिळतात. पुढे विवो वाय01ए प्राइस व स्पेसिफिकेशन्स दोन्हीची सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

Vivo Y01A Price

विवो वाय01ए स्मार्टफोन थायलंडच्या बाजारात सिंगल व्हेरिएंटमध्ये लाँच झाला आहे. हा मोबाइल फोन 2 जीबी रॅम आणि 32 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. Vivo Y01A ची किंमत THB 3,999 आहे जी भारतीय करंसीनुसार 9,100 रुपयांच्या आसपास आहे. हा विवो स्मार्टफोन मार्केटमध्ये Sapphire Blue आणि Elegant Black कलरमध्ये लाँच करण्यात आला आहे.

Vivo Y01A Specifications

विवो वाय01ए स्मार्टफोनचे फीचर्स व स्पेसिफिकेशन्स पाहता हा मोबाइल फोन 20:9 अ‍ॅस्पेक्ट रेशियोवर सादर करण्यात आला आहे जो 720 x 1600 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.51 इंचाच्या एचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. फोनची स्क्रीन आयपीएस एलसीडी पॅनलवर बनली आहे जिच्या तीन कडा बेजल लेस आहेत तर खाली रुंद चिन पार्ट देण्यात आला आहे. स्क्रीनच्या वरच्या बाजूला ‘वी’ शेप नॉच देण्यात आली आहे. या फोनचे डायमेंशन 163.96 × 75.2 × 8.28एमएम आणि वजन 178ग्राम आहे. हे देखील वाचा: ‘या’ कंपनीच्या युजर्ससाठी खुशखबर! मोफत मिळतोय 75GB पर्यंत डेटा, आत्ताच करा रिचार्ज

Vivo Y01A स्मार्टफोन अँड्रॉइड 11 गो एडिशन आधारित फनटच ओएस 11.1 वर चालतो. Android Go edition असल्यामुळे या मोबाइल फोनमध्ये सर्व गुगल गो अ‍ॅप्सचा वापर करता येईल जे कमी रॅम व स्टोरेज वापरतात. तसेच इंटरनेट डेटा आणि बॅटरी देखील कमी वापरली जाते. प्रोसेसिंगसाठी या विवो मोबाइल फोनमध्ये मीडियाटेक हीलियो पी35 चिपसेट देण्यात आला आहे.

फोटोग्राफीसाठी विवो वाय01एस स्मार्टफोन सिंगल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर फ्लॅश लाईटसह 8 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जो एफ/2.0 अपर्चरसह येतो. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी Vivo Y01A स्मार्टफोनमध्ये एफ/2.2 अपर्चर असलेला 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.

Vivo Y01A ड्युअल सिम फोन आहे जो 4जी एलटीईला सपोर्ट करतो. ब्लूटूथ आणि वायफाय सारख्या बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्ससह सिक्योरिटीसाठी या फोनमध्ये फेस अनलॉक फीचर देण्यात आला आहे. पावर बॅकअपसाठी विवो वाय01ए स्मार्टफोन 5,000एमएएच बॅटरीला सपोर्ट करतो जी 10वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह येते. हे देखील वाचा: OLA Scooter बुक करण्याआधी ही बातमी जरूर वाचा, हजारो रुपये वाचतील

The post Vivo Y01A ची थायलंडमध्ये एंट्री; फोनमध्ये MediaTek Helio P35 चिपसेट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/low-budget-mobile-phone-vivo-y01-launched-know-cheap-price-features-specifications-sale-details/feed/ 0