‘या’ कंपनीच्या युजर्ससाठी खुशखबर! मोफत मिळतोय 75GB पर्यंत डेटा, आत्ताच करा रिचार्ज

Vodafone Idea (Vi) नं काही दिवसांपूर्वी आपली फेस्टिव ऑफर सादर करून कंपनीच्या तीन प्रीपेड प्लॅनवर 75GB पर्यंत डेटा मोफत देण्याची घोषणा केली होती. ही ऑफर 31 ऑक्टोबर, 2022 पर्यंत वैध होती. परंतु, आता कोणत्याही लास्ट डेटविना ही ऑफर पुन्हा सादर करण्यात आली आहे. जर तुम्ही देखील वोडाफोन आयडिया युजर्स असाल आणि मोफत 75GB पर्यंत डेटा हवा असेल तर तुम्ही 1449 रुपये, 2899 रुपये आणि 3099 रुपयांच्या प्लॅन पैकी एक निवडू शकता. पुढे तुम्हाला या ऑफरची संपूर्ण माहिती देण्यात आली आहे.

या प्लॅनवर मिळत आहे ऑफर

वोडाफोन आयडियाच्या तीन प्रीपेड प्लॅनवर ही ऑफर गुपचूप सादर करण्यात आली आहे. युजर्सनी या प्लॅनचा रिचार्ज केल्यास त्यांना बोनस डेटा म्हणून 75GB पर्यंत डेटा मोफत दिला जाईल. कंपनी 1449 रुपयांच्या प्लॅनमध्ये 50GB बोनस डेटा देत आहे. तर, 2899 रुपये आणि 3099 रुपयांच्या प्लॅनसह 75GB बोनस डेटा मिळत आहे. ही ऑफर त्या ग्राहकांसाठी चांगली आहे ज्यांना डेली डेटा वापरून देखील जास्त डेटाची आवश्यकता असते. हे देखील वाचा: OLA Scooter बुक करण्याआधी ही बातमी जरूर वाचा, हजारो रुपये वाचतील

जाणून घ्या कोणत्या प्लॅनमध्ये मिळतायत कोणते बेनिफिट्स

1) Vi चा 1449 रुपयांचा प्लॅन

Vi च्या 1449 रुपयांच्या रिचार्ज प्लॅन बद्दल बोलायचं तर यात ग्राहकांना 50जीबी एक्स्ट्रा डेटा व्यतिरिक्त डेली 1.5जीबी Data, अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग आणि डेली 100 एसएमएस मिळतील. तसेच, रिचार्जमध्ये 180 दिवसांच्या वॅलिडिटीसह विआय मूव्ही आणि टीव्ही विआयपीचा अ‍ॅक्सेस देखील मिळत आहे.

2) Vi चा 2899 रुपयांचा प्लॅन

या रिचार्जमध्ये ग्राहकांना फ्री अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग, डेली 1.5GB डेटा आणि 100 एसएमएससह 365 दिवसांची वॅलिडिटी मिळत आहे. या प्लॅनमध्ये 75GB अ‍ॅडिशनल डेटा ऑफर केला जात आहे. इतकेच नव्हे तर यात विआय हीरो अनलिमिटेड बेनिफिट्स आणि विआय मुव्हीज आणि टीव्ही विआयपी अ‍ॅक्सेस मिळेल. हे देखील वाचा: चुटकीसरशी फुल चार्ज! 200W Fast Charging च्या शक्तीसह iQOO 11 Pro येतोय भारतात, लाँच डेट लीक

3) Vi चा 3099 रुपयांचा प्लॅन

जर तुम्हाला दीर्घ वैधता असलेला प्लॅन हवा असेल तर वोडाफोन आयडियाचा 3099 रुपयांच्या रिचार्ज तुमच्यासाठी बेस्ट आहे. यात युजर्सना 365 दिवसांच्या वॅलिडिटीसह 2GB डेली डेटा, रोज 100 एसएमएस आणि अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग मिळते. तसेच रिचार्जमध्ये 75GB एक्स्ट्रा डेटासह विआय हीरो अनलिमिटेड बेनिफिट्स, विआय मुव्हीज आणि टीव्ही विआयपी, एक वर्षाचे डिज्नी+ हॉटस्टार मोबाइल सब्सस्क्रिप्शन आणि 75GB बोनस डेटा मिळतो.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here