Vivo Y20G - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Tue, 19 Jan 2021 12:29:53 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 5000mAh बॅटरी आणि 6GB सह लॉन्च झाला Vivo Y20G, जाणून घ्या किंमत https://www.91mobiles.com/marathi/vivo-y20g-launched-in-india-5000mah-battery-6gb-ram-sale/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-y20g-launched-in-india-5000mah-battery-6gb-ram-sale/#respond Tue, 19 Jan 2021 12:29:53 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9686 Vivo फोन्स प्रेमींसाठी कंपनी अनेक दिवसांपासून आपले नवीन फोन्स सादर करत आहे. अलीकडेच कंपनीने भारतात आपला प्रोडक्ट पोर्टफोलियो वाढवत ‘वाय सीरीज’ मध्ये Vivo Y51A आणि Y12s भारतात ऑफिशियल केला होता. आता चिनी स्मार्टफोन निर्माता कंपनीने नवीन स्मार्टफोन Vivo Y20G भारतात लॉन्च केला आहे. वीवो वाय20जी दोन कलर वेरियंट ऑब्सडियन ब्लॅक आणि प्योरिस्ट ब्लू मध्ये सादर […]

The post 5000mAh बॅटरी आणि 6GB सह लॉन्च झाला Vivo Y20G, जाणून घ्या किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Vivo फोन्स प्रेमींसाठी कंपनी अनेक दिवसांपासून आपले नवीन फोन्स सादर करत आहे. अलीकडेच कंपनीने भारतात आपला प्रोडक्ट पोर्टफोलियो वाढवत ‘वाय सीरीज’ मध्ये Vivo Y51A आणि Y12s भारतात ऑफिशियल केला होता. आता चिनी स्मार्टफोन निर्माता कंपनीने नवीन स्मार्टफोन Vivo Y20G भारतात लॉन्च केला आहे. वीवो वाय20जी दोन कलर वेरियंट ऑब्सडियन ब्लॅक आणि प्योरिस्ट ब्लू मध्ये सादर केला गेला आहे. हा हँडसेट गेल्या महिन्यात मलेशिया मध्ये लॉन्च केल्या गेलेल्या Vivo Y20 (2021) सारखा आहे, फक्त यात प्रेसेसर वेगळा आहे.

Vivo Y20G प्रभावी स्पेसिफिकेशन्स आणि कमी किंमतीत लॉन्च केला गेला आहे जो भारतीय ग्राहकांसाठी खूप चांगला आहे. फोन विशेष हार्डवेयर सह येतो, या डिवाइस मध्ये हीलियो G80 ऑक्टा-कोर प्रोसेसर आहे.

हाइपरजाइन गेम टेक्नोलॉजी

कंपनीचा दावा आहे कि फोन एका ग्राफिक्स प्रोसेसिंग यूनिट (GPU) सह येतो जो “98% अधिक शक्ती, हाय इमेज क्विलिटी आणि मजबूत प्रदर्शन” देतो. प्रोसेसरसाठी, असे म्हटले गेले आहे कि हा चांगले प्रदर्शन करतो कारण यात हाइपरजाइन गेम टेक्नोलॉजी आहे जी “गेम लोड वेळेला गती देते आणि एक सहज गेमिंग अनुभव देते.”

हे देखील वाचा : Vivo Y31 होणार आहे भारतात लॉन्च, 6 जीबी रॅम आणि 48एमपी कॅमेर्‍यासह असेल 5,000एमएएच बॅटरी

Vivo Y20G हाइपरजाइन गेम टेक्नोलॉजीसह येतो.

भारतात Vivo Y20G ची किंमत

नवीन हँडसेट दोन कॉन्फिगरेशन मध्ये उपलब्ध करवण्यात आला आहे. यात 4 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज आणि 6 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेजचा समवेश आहे. हे वेरिएंट क्रमशः 12,990 रुपये आणि 14,990 रुपयांमध्ये उपलब्ध होतील. पण, लॉन्चच्या तारखेची किंवा उपलब्धतेबाबत आतापर्यंत कोणतीही माहिती मिळाली नाही. पण शिपमेंट सुरु झालेली असल्यामुळे लवकरच अधिकृत घोषणा होऊ शकते.

स्पेसिफिकेशन्स

फोन मध्ये एक मोठा डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा आकार 6.51-इंच आहे. हा हेलो फुलव्यू डिस्प्ले 20: 9 आणि एचडी + (1600 × 720) रिजोल्यूशन सह येतो. फोनच्या एका बाजूला फिंगरप्रिंट स्कॅनर पण देण्यात आला आहे ज्या बाबत वीवोचा दावा आहे कि हा फक्त 0.17 मध्ये फोन अनलॉक करतो.

कॅमेरा

Vivo Y20G अँड्रॉइड 11-बेस्ड फनटच ओएस 11 वर चालतो. फोटोग्राफीसाठी Vivo Y20G मध्ये ट्रिपल सेंसर मागे देण्यात आला आहे. या सेटअप मध्ये 13MP (f/1.8) प्रइमरी शूटर, 2MP डेप्थ कॅमेरा आणि 2MP मॅक्रो लेंस आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फोन मध्ये 8MP चा कॅमेरा आहे.

Vivo Y20G मध्ये हीलियो G80 ऑक्टा-कोर प्रोसेसर आहे.

हे देखील वाचा : फक्त 9,990 रुपयांमध्ये लॉन्च झाला 5,000एमएएच बॅटरी आणि 3जीबी रॅम असलेला स्वस्त स्मार्टफोन VIVO Y12s

बॅटरी आणि कनेक्टिविटी

फोन मध्ये 5000mAh ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे जी 18वॉट की फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. तसेच फोन मध्ये जीपीएस, ब्लूटूथ 4.2, 4जी, 3.5एमएम का हेडफोन जॅक आणि माइक्रो यूएसबी पोर्ट आहे.

The post 5000mAh बॅटरी आणि 6GB सह लॉन्च झाला Vivo Y20G, जाणून घ्या किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-y20g-launched-in-india-5000mah-battery-6gb-ram-sale/feed/ 0