VIVO फॅन्सच्या नववर्षची सुरवात खास होत असल्याचे दिसत आहे. कालच कंपनीने भारतात आपला प्रोडक्ट पोर्टफोलियो वाढवत ‘वाय सीरीज’ चा नवीन स्मार्टफोन VIVO Y51A लॉन्च केला होता जो 17,990 रुपयांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होईल. तर आज कंपनीने पुन्हा या सीरीजचा अजून एक नवा स्मार्टफोन VIVO Y12s पण भारतात ऑफिशियल केला आहे. वीवो वाय12एस कंपनीने 9,990 रुपयांमध्ये लॉन्च केला आहे जो या बजेट सेग्मेंट मधील Xiaomi, Realme आणि Samsung स्मार्टफोन्सना आव्हान देतो.
लुक व डिजाईन
VIVO Y12s कंपनीने प्लॉस्टिक बॉडी आणि वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले सह सादर केला आहे ज्यात स्क्रीनच्या तीन कडा बेजल लेस आहेत तर खालच्या बाजूला बारीक चिन पार्ट देण्यात आला आहे. फोनच्या बॅक पॅनल वर डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जो वर डावीकडे चौकोनी आकारता आहे. इथे कॅमेरा सेंसर आणि फ्लॅश वर्टिकल रांगेत आहेत. फोनच्या उजव्या पॅनल वर वाल्यूम रॉकर सोबत फिंगरप्रिंट सेंसर इम्बेडेड पावर बटन देण्यात आला आहे. तसेच लोवर पॅनल वर यूएसबी पोर्ट सह 3.5एमएम जॅक आहे. वीवो वाय12एस भारतात Phantom Black आणि Glacier Blue रंगात लॉन्च झाला आहे.
फीचर्स व स्पेसिफिकेशन्स
VIVO Y12s कंपनीने 1600 × 720 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.51 इंचाच्या एचडी+ फुलव्यू एलसीडी आईपीएस डिस्प्ले वर लॉन्च केला गेला आहे. हा स्मार्टफोन एंडरॉयड 10 आधारित फनटच ओएस 11 वर चालतो ज्यात प्रोसेसिंगसाठी आक्टाकोर प्रोसेसर सह मीडियाटेकचा हीलियो पी34 चिपसेट देण्यात आला आहे. या फोनचे डायमेंशन 164.41×76.32×8.41एमएम आणि वजन 191ग्राम आहे.
फोटोग्राफीसाठी वीवो वाय12एस डुअल रियर कॅमेर्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह एफ/2.2 अपर्चर असलेला 13 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे तसेच वाय12एस एफ/2.4 अपर्चर असलेल्या 2 मेगापिक्सलच्या डेफ्थ सेंसरला सपोर्ट करतो. तसेच सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी या फोन मध्ये एफ/1.8 अपर्चर असलेला 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
VIVO Y12s एक डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सह या फोन मध्ये 3.5एमएम जॅक पण देण्यात आला आहे. सिक्योरिटीसाठी फोनच्या साईड पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर इम्बेडेड पावर बटन देण्यात आला आहे तसेच वीवो वाय12एस फेस अनलॉक फीचरला सपोर्ट करतो. तसेच पावर बॅकअपसाठी या फोन मध्ये 10वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेली 5,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.
किंमत व सेल
वीवो वाय12एस भारतीय बाजारात एकाच वेरिएंट मध्ये लॉन्च केला गेला आहे जो 3 जीबी रॅम मेमरीला सपोर्ट करतो. या फोन मध्ये 32 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे जी माइक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून वाढवता येईल. VIVO Y12s ने 9,990 रुपयांमध्ये बाजारात एंट्री केली आहे जो फ्लिपकार्ट व अमेजॉन सह ऑनलाईन शॉपिंग तसेच ऑफलाईन रिटेल स्टोर्स वर पण विक्रीसाठी उपलब्ध होईल.















