Vivo Y20s [G] - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Mon, 12 Apr 2021 12:54:03 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 6 जीबी रॅम आणि 5,000एमएएच बॅटरीसह लॉन्च झाला स्वस्त Vivo Y20s [G] स्मार्टफोन https://www.91mobiles.com/marathi/vivo-y20s-g-official-price-specs-sale-offer/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-y20s-g-official-price-specs-sale-offer/#respond Mon, 12 Apr 2021 12:54:03 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10567 Vivo Y20s [G] फिलिपिंसमध्ये एकाच वेरिएंटमध्ये लॉन्च केला गेला आहे जो 6 जीबी रॅमसह 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. या फोनची किंमत PHP 9,999 म्हणजे भारतीय करंसीनुसार 15,300 रुपयांच्या आसपास आहे.

The post 6 जीबी रॅम आणि 5,000एमएएच बॅटरीसह लॉन्च झाला स्वस्त Vivo Y20s [G] स्मार्टफोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Vivo ने जानेवारीमध्ये भारतात आपल्या ‘वाय’ सीरीज अंतगर्त चार नवीन फोन लॉन्च केले होते ज्यात Vivo Y12s, Vivo Y20G, Vivo Y51a आणि Vivo Y31 चा समावेश होता. या स्मार्टफोन्सनंतर कंपनी भारताच्या लो बजेट सेग्मेंटमध्ये काही दिवस शांत असल्याचे दिसून आले आहे पण इंटरनॅशनल मार्केटमध्ये कंपनीने आज अजून एक नवीन डिवायस सादर केला आहे. वीवोने नवीन मोबाईल फोन Vivo Y20s [G] नावाने सादर केला आहे जो फिलिपिंसच्या बाजारात आला आहे. हा फोन मीडियाटेक हीलियो जी80 चिपसेट आणि 13मेगापिक्सल रियर कॅमेरा सारख्या फीचर्ससह येतो. (Vivo Y20s G official price specs sale offer)

Vivo Y20s [G]

थेट फोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता वीवो वाय20एस [जी] 20:9 आस्पेक्ट रेशियोवर सादर केला गेला आहे जो 1600 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.51 इंचाच्या एचडी+ आयपीएस डिस्प्लेला सपोर्ट करतो. हि स्क्रीन एलसीडी पॅनलवर बनली आहे आणि 60हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करते. स्क्रीनच्या तीन कडा बेजल लेस आहेत तसेच खालच्या बाजूला बारीक रुंद चिन पार्ट देण्यात आला आहे. या फोनचे डायमेंशन 164.41×76.32×8.41एमएम आणि वजन 192 ग्राम आहे.

हे देखील वाचा : Vivo X70 सीरीजचे स्पेसिफिकेशन्स झाले लीक, Snapdragon 888 चिपसेट आणि Zeiss optics सह होईल लॉन्च

Vivo Y20s [G] अँड्रॉइड 11 वर सादर केला गेला आहे जो फनटच ओएस 11 सह चालतो. प्रोसेसिंगसाठी या फोनमध्ये मीडियाटेकचा हीलियो जी52 एमपी2 जीपीयू आहे. फिलिपिंसमध्ये वीवोने आपला हा फोन एकाच वेरिएंटमध्ये सादर केला आहे. Vivo Y20s [G] 6 जीबी रॅमवर लॉन्च केला गेला आहे जो 128 जीबी की इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. याची मेमरी माइक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून वाढवता येते.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता वाय20एस [जी] ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह 13 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे ज्याच्यासोबत 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

हे देखील वाचा : Samsung Galaxy F62 स्मार्टफोनवर धमाकेदार डिस्काउंट, जाणून घ्या कशी होईल 10,000 रुपयांची बचत

Vivo Y20s [G] एक डुअल सिम फोन आहे जो 4जी एलटीईला सपोर्ट करतो. 3.5एमएम जॅक आणि इतर बेसिक कनेक्टिविटी फीचर्ससोबतच सिक्योरिटीसाठी फोनच्या साईड पॅनलवर फिंगरप्रिंट सेंसर इम्बेडेड बटण देण्यात आला आहे. तसेच हा फोन फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी वाय20एस [जी] मध्ये 5,000एमएएचची बॅटरी आहे जी 18वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

वेरिएंट व प्राइस

Vivo Y20s [G] फिलिपिंसमध्ये एकाच वेरिएंटमध्ये लॉन्च केला गेला आहे जो 6 जीबी रॅमसह 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. या फोनची किंमत PHP 9,999 म्हणजे भारतीय करंसीनुसार 15,300 रुपयांच्या आसपास आहे. फिलिपिंसमध्ये हा फोन Obsidian Black आणि Purist Blue कलरमध्ये विकत घेता येईल. Vivo Y20s [G] च्या भारतीय लॉन्चची अजूनतरी कोणतीही माहिती समोर आली नाही.

The post 6 जीबी रॅम आणि 5,000एमएएच बॅटरीसह लॉन्च झाला स्वस्त Vivo Y20s [G] स्मार्टफोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-y20s-g-official-price-specs-sale-offer/feed/ 0