Vivo X70 सीरीजचे स्पेसिफिकेशन्स झाले लीक, Snapdragon 888 चिपसेट आणि Zeiss optics सह होईल लॉन्च

Vivo ने भारतात अलीकडेच Vivo X60 सीरीजचे तीन स्मार्टफोन Vivo X60, Vivo X60 Pro, आणि Vivo X60 Pro+ लॉन्च केले आहेत. आता कंपनी Vivo X70 सीरीजवर काम करत आहे. चायनीज सोशल मीडिया साइट Weibo वर एका टिपस्टरने सांगितले आहे कि Vivo X70 सीरीजमध्ये 1/1.28-इंचापेक्षा मोठा कॅमेरा सेंसर, 4,500mAh बॅटरी, Zeiss ऑप्टिक्स, 66W फास्ट चार्जिंग सपोर्ट आणि Samsung E4 AMOLED डिस्प्लेसह सादर केला जाऊ शकतो. Vivo X70 Pro+ स्मार्टफोनबद्दल बोलले जात आहे कि Snapdragon 888 चिपसेटसह सादर केला जाऊ शकतो. टिपस्टरने या पोस्टमध्ये असा दावा केला आहे कि Vivo X70 सीरीज यावर्षी जूनमध्ये लॉन्च केला जाऊ शकतो. (Vivo X70 series specifications leaked may comes with Snapdragon 888 chipset expected to launced in June 2021)

Vivo X60 Pro+, X60 Pro, आणि X60 स्पेसिफिकेशन्स

Vivo X60 Pro+ स्मार्टफोनमध्ये 6.56-इंचाचा FHD+ AMOLED डिस्प्ले दिला जाऊ शकतो, ज्याचे रेजलूशन 2,376 × 1,080 पिक्सल, रिफ्रेश रेट 120Hz आणि टच सॅम्पलिंग रेट 240Hz सह सादर केला आहे. वीवोचा हा स्मार्टफोन Qualcomm Snapdragon 888 SoC सह 12GB LPDDR5 RAM आणि 256GB UFS 3.1 इंटरनल स्टोरेज सादर केला गेला होता. हा फोन Android 11 वर आधारित Funtouch OS 11.1 वर चालतो. हा फोन 4,200mAh च्या बॅटरीसह 55W फास्ट चार्जिंग सपोर्टसह सादर केला गेला आहे. Vivo X60 Pro+ स्मार्टफोनमध्ये इन–डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर दिला आहे. कनेक्टिविटीसाठी या फोनमध्ये 5G, 4G LTE, Wi–Fi 6, Bluetooth 5.2, NFC, GPS, आणि USB Type–C पोर्ट देण्यात आला आहे.

हे देखील वाचा : IPL 2021: असे केल्यास Jio युजर बघू शकतील प्रत्येक मॅच मोफत

Vivo X60 Pro+ स्मार्टफोनमध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप दिला आहे ज्याचा प्राइमेरी कॅमेरा 50MP Samsung GN1 सेंसर आहे. तसेच 48MP Sony IMX598 सेंसर, आणि Gimbal Stabilization, 32MP पोर्टेट लेंस आणि 8MP चा पेरिस्कोप सेंसर दिला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये 32MP चा कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे.

Vivo X60 आणि X60 Pro दोन्ही स्मार्टफोनमध्ये 6.56-इंचाचा FHD+ AMOLED डिस्प्ले दिला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. तसेच सेल्फी कॅमेरा सेंसरसाठी पंच होल कटआउट आणि Corning Gorilla Glass 6 चे प्रोटेक्शन देण्यात आले आहे. वीवोचे दोन्ही स्मार्टफोन Qualcomm Snapdragon 870 SoC सह 12GB पर्यंतच्या रॅम आणि 256GB पर्यंतच्या स्टोरेजसह सादर केला गेले आहेत. दोन्ही स्मार्टफोन Android 11 वर आधारित Funtouch OS 11.1 वर चालतात. सिक्योरिटीसाठी या फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे.

हे देखील वाचा : Samsung Galaxy A32 वर मिळत आहे 11,000 रुपयांचा फायदा, अश्याप्रकारे घ्या लाभ

Vivo X60 आणि X60 Pro दोन्ही फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, ज्यात प्राइमेरी कॅमेरा 48MP Sony IMX598 आहे, तसेच 13MP चे दोन कॅमेरा सेंसर देण्यात आले आहेत. या दोन्ही स्मार्टफोनमध्ये 32MP चा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. बॅटरी पाहता Vivo X60 स्मार्टफोनमध्ये 4,300mAh च्या बॅटरीसह 33W फास्ट चार्ज आणि Vivo X60 Pro मध्ये 4,200mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here