Vivo Y35m - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 10 Mar 2023 04:26:29 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Vivo Y35m स्मार्टफोन चिनी सर्टिफिकेशन साइट लिस्ट; किंमत देखील लीक https://www.91mobiles.com/marathi/vivo-y35m-smartphone-specifications-leaked-might-launch-soon/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-y35m-smartphone-specifications-leaked-might-launch-soon/#respond Wed, 21 Dec 2022 07:32:01 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=16213 Vivo Y35m स्मार्टफोन चिनी सर्टिफिकेशन साइटवर V2230A मॉडेल नंबरसह लिस्ट करण्यात आला आहे. लिस्टिंगमध्ये फोनच्या फोटोज, फीचर्स व स्पेसिफिकेशन्स सोबतच अंदाजे किंमतीचा देखील खुलासा करण्यात आला आहे. चायना टेलीकॉम लिस्टिंगनुसार हा विवो मोबाइल मिडबजेटमध्ये लाँच होऊ शकतो आणि याची किंमत 17 हजारांच्या रेंजमध्ये असू शकते. Vivo Y35m ची किंमत विवो वाय35एम चार व्हेरिएंट्ससह बाजारात येऊ […]

The post Vivo Y35m स्मार्टफोन चिनी सर्टिफिकेशन साइट लिस्ट; किंमत देखील लीक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Vivo Y35m स्मार्टफोन चिनी सर्टिफिकेशन साइटवर V2230A मॉडेल नंबरसह लिस्ट करण्यात आला आहे. लिस्टिंगमध्ये फोनच्या फोटोज, फीचर्स व स्पेसिफिकेशन्स सोबतच अंदाजे किंमतीचा देखील खुलासा करण्यात आला आहे. चायना टेलीकॉम लिस्टिंगनुसार हा विवो मोबाइल मिडबजेटमध्ये लाँच होऊ शकतो आणि याची किंमत 17 हजारांच्या रेंजमध्ये असू शकते.

Vivo Y35m ची किंमत

विवो वाय35एम चार व्हेरिएंट्ससह बाजारात येऊ शकतो. यात 4GB RAM + 128GB storage, 6GB RAM + 128GB storage, 8GB RAM + 128GB storage आणि 8GB RAM + 256GB storage चा समावेश असू शकतो. रिपोर्टनुसार, यांची किंमत अनुक्रमे 1499 Yuan (जवळपास 17,800 रुपये), 1599 Yuan (जवळपास 18,900 रुपये), 1699 Yuan (जवळपास 20,000 रुपये) आणि 1799 Yuan (जवळपास 21,300 रुपये) असू शकते.

Vivo Y35m चे स्पेसिफिकेशन्स

  • 6.51″ HD+ डिस्प्ले
  • 8GB RAM + 256GB Storage
  • MediaTek Dimensity 700 चिपसेट
  • 18W 5,000mAh Battery

विवो वाय35एम बद्दल आलेल्या माहितीनुसार, हा मोबाइल फोन 720 x 1600 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.51 इंचाच्या एचडी+ डिस्प्लेसह लाँच केला जाऊ शकतो जो आयपीएस एलसीडी पॅनलवर बनला असू शकतो. या फोनचे डायमेंशन 164.05 x 75.6 x 8.15एमएम आणि वजन 185ग्राम असू शकतं.

हा विवो मोबाइल नवीन अँड्रॉइड 13 ओएसवर लाँच होऊ शकते. तसेच मीडियाटेक डिमेनसिटी 700 चिपसेटवर चालू शकतो. सर्टिफिकेशन नुसार Vivo Y35m 8जीबी रॅमवर लाँच होऊ शकतो जोडीला 256जीबी की इंटरनल स्टोरेज दिली जाऊ शकते. या फोनमध्ये वचुर्अल रॅम टेक्नॉलॉजी देखील मिळू शकते. हे देखील वाचा: भन्नाट! वनप्लसलाही लाजवेल हा स्मार्टफोन; जीबी नव्हे 1TB मेमरी आणि शक्तिशाली प्रोसेसरसह दणकट 5जी फोन लाँच

फोटोग्राफीसाठी विवो वाय35एम च्या बॅक पॅनलवर 13 मेगापिक्सल + 2 मेगापिक्सलचा ड्युअल रियर कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो. तर फ्रंट पॅनलवर 5 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा मिळू शकतो. या फोनमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आणि 18वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेली 5,000एमएएच ची बॅटरी दिली जाऊ शकते. रिपोर्टनुसार, हा फोन Obsidian Black, Dawn Gold, Starry Night Black, Starlight Orange आणि Ice Cloud Blue कलरमध्ये लाँच होऊ शकतो.

The post Vivo Y35m स्मार्टफोन चिनी सर्टिफिकेशन साइट लिस्ट; किंमत देखील लीक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-y35m-smartphone-specifications-leaked-might-launch-soon/feed/ 0