जीबी नव्हे 1TB मेमरी आणि शक्तिशाली प्रोसेसरसह Nubia Z50 5जी फोन लाँच

टेक ब्रँड नुबियानं आपल्या टेक्नॉलॉजीचं प्रदर्शन करत टेक मंचावर नवीन स्मार्टफोन सादर केला आहे. हा मोबाइल ‘झेड’ सीरीजमध्ये जोडण्यात आला आहे जो Nubia Z50 नावानं लाँच झाला आहे. हा फोन भारतीय बाजारात येण्याची शक्यता खूप कमी आहे परंतु टेक प्रेमींना या दमदार स्मार्टफोनची माहिती असणं आवश्यक आहे. हा झेड50 मॉडेल Qualcomm Snapdragon 8 Gen 2 चिपसेटला सपोर्ट करतो तसेच फोनमधील 35mm camera lens याला पोर्ट्रेट फोटोजसाठी बेस्ट आहे. कंपनीनं फोनचा 1TB व्हेरिएंट देखील सादर केला आहे.

नुबीया झेड50 चे स्पेसिफिकेशन्स

नुबिया झेड50 स्मार्टफोन 2400 × 1080 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.67 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. पंच-होल स्टाईलसह येणारी ही स्क्रीन कर्व्ड अ‍ॅमोलेड पॅनलवर बनली आहे जी 144हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि 360हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करते. कंपनीनं फोन डिस्प्ले यूएल प्लेटिनम लो ब्लू लाईट टेक्नॉलॉजीसह सादर केला आहे जी डोळ्यांना सुरक्षित ठेवते. हे देखील वाचा: फक्त 520 रुपयांमध्ये घरी आणा रियलमीचा 5G Phone! Realme 9i 5G मोठ्या डिस्काउंटसह उपलब्ध

अँड्रॉइड 13 आधारित हा फोन मायओएस 13.0 वर चालतो. या स्मार्टफोनमध्ये 3.2गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या ऑक्टाकोर प्रोसेसरसह 4नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेला शक्तिशाली क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन 2 चिपसेट देण्यात आला आहे. नुबिया झेड50 16GB LPDDR5X RAM आणि 1TB UFS 4.0 storage ला सपोर्ट करतो.

फोटोग्राफीसाठी नुबिया झेड50 च्या बॅक कॅमेरा सेटअपमध्ये एफ/1.6 अपर्चर असलेला 64MP IMX787 सेन्सर देण्यात आला आहे जो 35mm focal length आणि OIS फीचरसह येतो. जोडीला रियर पॅनलवर 50 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेन्स देण्यात आली आहे जी मॅक्रो लेन्स म्हणून देखील वापरता येते. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.

Nubia Z50 5G ला सपोर्टसह मार्केटमध्ये आला आहे. हा फोन DTS:X Ultra आणि Snapdragon Sound ट्यून्ड आहे. पावर बॅकअपसाठी या स्मार्टफोनमध्ये 5,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे जी 80वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह येते. हा नुबिया फोन Black Lagoon, Lantau आणि White Island कलरमध्ये लाँच झाला आहे. हे देखील वाचा: HP Smart Tank 580 Printer Review: छोट्या उद्योजकांसाठी बेस्ट प्रिंटर; प्रिंटिंग कॉस्ट कमी करण्यासाठी नवा पर्याय

नुबीया झेड50 ची प्राइस

नुबिया झेड50 5जी फोन 5 व्हेरिएंट्समध्ये लाँच झाला आहे जो चीनमध्ये सेलसाठी उपलब्ध होईल. या फोनचा 8GB RAM व 128GB Storage असलेला बेस मॉडेल 999 yuan (जवळपास 35,560 रुपये) मध्ये उपलब्ध होईल. तर 8GB RAM व 256GB Storage व्हेरिएंट 3399 yuan (जवळपास 40,305 रुपये), 12GB RAM व 256GB Storage मॉडेल 3699 yuan (जवळपास 43,860 रुपये), 12GB RAM व 512GB Storage व्हेरिएंट 3999 yuan (जवळपास 47,415 रुपये) आणि 16GB RAM व 1TB Storage व्हेरिएंट 5999 yuan (जवळपास 71,130 रुपये) मध्ये विकत घेता येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here