Vivo Y3s - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 23 Oct 2020 13:54:31 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 5,000एमएएच बॅटरी आणि 4 जीबी रॅम सह लो बजेट मध्ये लॉन्च झाला Vivo Y3s स्मार्टफोन https://www.91mobiles.com/marathi/vivo-y3s-launched-with-5000mah-battery-4gb-ram-specs-price-sale/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-y3s-launched-with-5000mah-battery-4gb-ram-specs-price-sale/#respond Fri, 23 Oct 2020 13:54:31 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8654 Vivo Y3s कंपनीने वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले वर लॉन्च केला आहे. Vivo Y3s च्या बॅक पॅनल वर फोटोग्राफीसाठी डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे.

The post 5,000एमएएच बॅटरी आणि 4 जीबी रॅम सह लो बजेट मध्ये लॉन्च झाला Vivo Y3s स्मार्टफोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Vivo ने आंतरराष्ट्रीय बाजारात आपल्या स्मार्टफोन मॉडेल्सची संख्या वाढवत नवीन डिवायस Vivo Y3s सादर केला आहे. कंपनीने हा फोन वीवोच्या होम मार्केट म्हणजे चीन मध्ये लॉन्च केला आहे जो लो बजेट मध्ये आला आहे. पावरफुल बॅटरी, लार्ज डिस्प्ले आणि ट्रिपल रियर कॅमेरा असलेला वीवो वाय3एस चायना मध्ये 1198 युआन मध्ये बाजारात आला आहे आणि हि किंमत इंडियन करंसीनुसार 13,000 रुपयांच्या आसपास आहे.

लुक व डिजाईन

Vivo Y3s कंपनीने वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले वर लॉन्च केला आहे. डिस्प्लेच्या तीन कडा बेजल लेस आहेत तर खालच्या बाजूला थोडा रुंद चिन पार्ट देण्यात आला आहे. स्क्रीनच्या भागात ‘वी’ शेप नॉच देण्यात आली आहे आणि या फोनचा सेल्फी कॅमेरा आहे. फोनच्या बॅक पॅनल वर डावीकडे डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जो वर्टिकल शेप मध्ये आहे. या कॅमेरा सेटअपच्या खाली फ्लॅश लाईट आहे. फोनच्या बॅक पॅनल वरच फिंगरप्रिंट सेंसर दिला जाईल. तसेच खालच्या नीचले पॅनल वर यूएसबी टाईपी सी पोर्ट असेल.

फीचर्स व स्पेसिफिकेशन्स

Vivo Y3s कंपनीने 19.3:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला आहे जो 1560 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन असेलल्या 6.35 इंचाच्या एलसीडी एचडी+ वॉटरड्रॉप नॉच डिस्प्लेला सपोर्ट करतो. या फोनचा स्क्रीन-टू-बॉडी रेशियो 89.04 सांगण्यात आला आहे तसेच फोनची स्क्रीन 1500:1 कॉन्ट्रास्ट रेशियोला सपोर्ट करते. वीवो वाय3एस अँड्रॉइड 9 पाई वर लॉन्च केला गेला आहे जो फनटच ओएस9 सह चालतो.

तसेच प्रोसेसिंगसाठी या फोन मध्ये 2.3गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसर सह मीडियाटेकचा हीलियो पी35 चिपसेट देण्यात आला आहे. ग्राफिक्ससाठी हा फोन पावरवीआर आईएमजी जीई8320 जीपीयूला सपोर्ट करतो. चीनी मार्केट मध्ये हा फोन 4 जीबी रॅम वर लॉन्च झाला आहे जो 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. फोनची मेमरी माइक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून वाढवता येईल. हा फोन LPDDR4X रॅम आणि eMMC 5.1 स्टोरेजला सपोर्ट करतो.

हे देखील वाचा : VIVO V20 सीरीजची भारतात एंट्री, 44MP सेल्फी आणि 64MP ट्रिपल रियर कॅमेऱ्यासह लॉन्च झाला हा शानदार फोन

Vivo Y3s च्या बॅक पॅनल वर फोटोग्राफीसाठी डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या सेटअप मध्ये एलईडी फ्लॅश सह एफ/2.2 अपर्चर असलेला 13 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे. तसेच हा फोन एफ/2.4 अपर्चर असलेल्या 2 मेगापिक्सलच्या डेफ्थ सेंसरला सपोर्ट करतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिगसाठी वीवो वाय3एस मध्ये एफ/1.8 अपर्चर असलेला 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.

वीवो वाय3एस एक डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीईला सपोर्ट करतो. 3.5एमएम जॅक, ओटीजी आणि इतर बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबतच सिक्योरिटीसाठी फोनच्या बॅक पॅनल वर रियर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच हा फोन फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी Vivo Y3s 5,000एमएएच च्या मोठ्या बॅटरी सह बाजारात आला आहे.

The post 5,000एमएएच बॅटरी आणि 4 जीबी रॅम सह लो बजेट मध्ये लॉन्च झाला Vivo Y3s स्मार्टफोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-y3s-launched-with-5000mah-battery-4gb-ram-specs-price-sale/feed/ 0