VIVO V20 सीरीजची भारतात एंट्री, 44MP सेल्फी आणि 64MP ट्रिपल रियर कॅमेऱ्यासह लॉन्च झाला हा शानदार फोन

VIVO ने आज भारतीय बाजारात आपला प्रोडक्ट पोर्टफोलियो वाढवत ‘वी सीरीज’ चा नेक्स्ट जेनरेशन सादर केला आहे. कंपनीने वीवो वी20 सीरीजची सुरवात इंडियन मार्केट मध्ये करण्यात आली आहे. शानदार डिजाईन आणि दमदार स्पेसिफिकेशन्स असलेल्या या सीरीज मध्ये VIVO V20 आणि VIVO V20 SE स्मार्टफोन जोडण्यात आले आहेत. वीवो वी20 20 ऑक्टोबर पासून देशातील ऑनलाईन बाजारासह ऑफलाईन रिटेल स्टोर्स वर पण विक्रीसाठी उपलब्ध होईल, पण वीवो वी20 एसई साठी थोडी वाट बघावी लागेल.

दमदार फोटोग्राफी

Vivo V20 ची सर्वात मोठी यूएसपी या फोनचा कॅमेरा सेग्मेंट आहे. प्रथम सेल्फी सेग्मेंट बद्दल बोलायचे झाले तर वीवो वी20 स्मार्टफोन 44 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो जो एफ/2.0 अपर्चर सह चालतो. हि एक आय ऑटोफोकस लेंस आहे जी डिस्प्लेच्या वर देण्यात आलेल्या वॉटरड्रॉप नॉच मध्ये आहे. फोनचा फ्रंट कॅमेरा स्टेडीफेस आणि स्लोमोशन सेल्फी वीडियो सोबतच सुपर नाईट मोड सारख्या फीचर्स सह येतो. तसेच रियर कॅमेरा सेटअप पाहता हा स्मार्टफोन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Vivo V20 चा रियर कॅमेरा सेटअप बॅक पॅनलच्या वरच्या बाजूला उजवीकडे चौकोनी आकारात देण्यात आला आहे ज्यात एक मोठ्या सेंसर सहित तीन सेंसर आहेत. फोनचा रियर कॅमेरा सेटअप एफ/1.89 अपर्चर असलेल्या 64-मेगापिक्सलच्या प्राइमरी सेंसरला सपोर्ट करतो. त्याचबरोबर फोन मध्ये एफ/2.2 अपर्चर असलेली 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेंस देण्यात आली आहे जी बोका इफेक्ट आणि मोनो शॉट घेऊ शकते. वीवो वी20 चा थर्ड रियर कॅमेरा एक 2-मेगापिक्सल असलेली मोनोक्रोम लेंस आहे जी एफ/2.4 अपर्चर सह येते.

Vivo V20

वीवो वी20 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन 20:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर झाला आहे ज्याचा स्क्रीन-टू-बॉडी रेशियो 90.12 टक्के आहे. या फोन मध्ये 1080 x 2400 पिक्सल रेज्ल्यूशन असलेला 6.44 इंचाचा फुलएचडी+ एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे जो इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर टेक्नॉलॉजी सह येतो. स्क्रीनच्या सुरक्षेसाठी हि कोर्निंग गोरिल्ला ग्लास 3 ने प्रोटेक्ट केली गेली आहे. वीवो वी20 फक्त 7.38एमएम जाड आहे तसेच याचे वजन 171 ग्राम आहे.

Vivo V20 को अँड्रॉइड 11 वर लॉन्च केला गेला आहे जो फनटचओएस 11 सह चालतो. प्रोसेसिंगसाठी या फोन मध्ये 2.3गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसर सह 8नॅनोमीटर फॅब्रिकेशन वर चालणारा क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगॉन 720जी चिपसेट देण्यात आला आहे. ग्राफिक्ससाठी वीवो वी20 स्मार्टफोन एड्रेनो 618 जीपीयूला सपोर्ट करतो.

Vivo V20 एक डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीईला सपोर्ट करतो. 3.5एमएम जॅक व इतर बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबतच सिक्योरिटीसाठी वीवो 20 च्या स्क्रीनखाली इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच हा फोन फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. तसेच पावर बॅकअपसाठी वीवो 20 मध्ये 4,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे जी 33वॉट फ्लॅशचार्ज फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी सह येते.

Vivo V20 भारतात दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च झाला आहे. फोनचा बेस वेरिएंट 8 जीबी रॅम सह 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो तर मोठ्या वेरिएंट मध्ये 8 जीबी रॅम मेमरी सह 256 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. फोनचा 8 जीबी + 128 जीबी वेरिएंट 24,990 रुपयांमध्ये लॉन्च झाला आहे तर 8 जीबी + 256 जीबी वेरिएंट 27,990 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे. वीवो वी20 ची विक्री येत्या 20 ऑक्टोबर पासून सुरु होईल. फोन Midnight Jazz, Moonlight Sonata आणि Sunset Melody कलर मध्ये विकत घेता येईल.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here