Vivo Y83 Pro - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 06 Jul 2023 08:24:47 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 15,990 रुपयांमध्ये लॉन्च झाला नॉच डिस्प्ले आणि डुअल कॅमेरा वाला वीवो वाय83 प्रो, जाणून घ्या या फोन बद्दलची सर्व माहिती https://www.91mobiles.com/marathi/vivo-y83-pro-launched-in-india-price-specifications-and-features-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-y83-pro-launched-in-india-price-specifications-and-features-in-marathi/#respond Mon, 20 Aug 2018 07:54:07 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1742 भारतीय बाजारात वीवो वाय83 प्रो बेस्ट बाय प्राइस 15,990 रुपये आहे.

The post 15,990 रुपयांमध्ये लॉन्च झाला नॉच डिस्प्ले आणि डुअल कॅमेरा वाला वीवो वाय83 प्रो, जाणून घ्या या फोन बद्दलची सर्व माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
काही दिवसांपूर्वी आम्ही बातमी दिली होती की लवकरच वीवो मिड रेंज मध्ये नवीन फोन वाय83 प्रो लॉन्च करू शकता आणि त्यानुसार कंपनीने हा लॉन्च केला आहे. कंपनी ने यासाठी अधिकृत प्रेस रिलीज दिलेली नाही पण हा फोन स्टोर वर उपलब्ध झाला आहे. तसेच काही स्टोर वर फोन ची प्रीबुकिंग सुरू करण्यात आली आहे. भारतीय बाजारात वीवो वाय83 प्रो बेस्ट बाय प्राइस 15,990 रुपये आहे. चांगली बाब म्हणजे कंपनीच्या या फोन मध्ये खुप अडवासं फीचर्स आहेत.

फोन चे स्पेसिफिकेशंस पाहता यात 6.22-इंचाची 2.0 फुलव्यू स्क्रीन देण्यात आली आहे. फोन मध्ये तुम्हाला नॉच डिस्प्ले मिळेल ज्यात सेल्फी कॅमेरा आणि इतर सेंसर्स आहेत. हा फोन नवीन 19:9 आसपेक्ट रेश्यो सह उपलब्ध आहे आणि फोनचे स्क्रीन रेजल्यूशन एचडी+, 1520×720 पिक्सल आहे. पण अजूनतरी स्क्रीन कोटिंग बद्दल कोणतीही माहिती देण्यात आली नाही.

फोटोग्राफी साठी या फोन मध्ये 13-मेगापिक्सल + 2-मेगापिक्सलचा डुअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. तर सेल्फी साठी कंपनी ने यात 8-मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे जो तुम्ही वीडियो कॉलिंग किंवा कॉन्फ्रेंसिंग साठी वापरु शकता.

वीवो वाय83 प्रो मध्ये 4जीबी रॅम आणि 64जीबी इंटरनल स्टोरेज आहे. फोन मध्ये मेमरी कार्ड स्लॉट आहे. हा फोन फनटच ओएस वर चालतो जो एंडरॉयड आॅपरेटिंग सिस्टम 8.1 ओरियो वर आधारित आहे. पावर बॅकअप साठी फोन मध्ये 3,260 एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. आता पर्यंत फोन lच्या प्रोसेसर ची माहिती मिळाली नाही पण आशा आहे की कंपनी याला मीडियाटेक चिपसेट सह सादर करू शकते.

ड्यूअल सिम आधारित या फोन मध्ये तुम्हाला कनेक्टिविटी साठी 4जी वोएलटीई सपोर्ट सोबत वाइफाई आणि ब्लूटूथ मिळेल. तर कंपनी ने यात फेस अनलॉक आणि फिंगरप्रिंट स्कॅनर पण दिला आहे. फोन मध्ये तुम्हाला आई प्रोटेक्शन मोड मिळेल.

8जीबी रॅम आणि ‘वी’ नॉच वाल्या वीवो एक्स23 ची प्री-बुकिंग सुरू, लवकरच होईल लॉन्च

काही दिवसांपूर्वी कंपनी ने मिड रेंज मध्ये नॉच डिस्प्ले सह वीवो वाय81 पण आणला आहे. भारतीय बाजारात या फोनची किंमत 12,990 रुपये आहे आणि हा फोन आॅनलाईन शॉपिंग साइट सोबत आॅफलाईन रिटेल स्टोर्स वर पण सेल साठी उपलब्ध आहे.

वीवो वाय81 19:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या बेजल लेस नॉच डिस्प्ले सह सादर करण्यात आला आहे. फोन मध्ये 6.2-इंचाचा एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे जो कोर्निंग गोरिल्ला ग्लास ने प्रोटेक्टेड आहे. हा फोन मीडियाटेक एमटी6762 चिपसेट वर चालतो आणि यात 3जीबी रॅम मेमरी सोबत 32जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे जी माइक्रोएसडी कार्ड ने 256जीबी पर्यंत वाढवता येईल. फोटोग्राफी साठी एफ/2.2 अपर्चर वाला 13-मेगापिक्सलचा रियर कॅमेरा आणि एफ/2.2 अपर्चर वाला 5-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.

The post 15,990 रुपयांमध्ये लॉन्च झाला नॉच डिस्प्ले आणि डुअल कॅमेरा वाला वीवो वाय83 प्रो, जाणून घ्या या फोन बद्दलची सर्व माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-y83-pro-launched-in-india-price-specifications-and-features-in-marathi/feed/ 0
एक्सक्लूसिव : वीवो वाय83 प्रो होणार आहे भारतात लॉन्च, यात असेल नॉच डिस्प्ले, डुअल कॅमेरा आणि 4जीबी रॅम https://www.91mobiles.com/marathi/vivo-y83-pro-to-launch-in-india-soon-exclusive-feature-specification-price-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-y83-pro-to-launch-in-india-soon-exclusive-feature-specification-price-in-marathi/#respond Fri, 17 Aug 2018 08:30:48 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1734 हा फोन ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात किंवा सप्टेंबरच्या सुरवातीला देशात लॉन्च होईल. वीवो वाय83 प्रो ला कंपनी 16,000 रुपयांमध्ये लॉन्च करू शकते.

The post एक्सक्लूसिव : वीवो वाय83 प्रो होणार आहे भारतात लॉन्च, यात असेल नॉच डिस्प्ले, डुअल कॅमेरा आणि 4जीबी रॅम first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
वीवो ने मे महीन्यात भारतीय बाजारात आपला स्वस्त नॉच डिस्प्ले स्मार्टफोन वाय83 सादर केला होता. वीवो वाय83 मीडियाटेक हेलीयो पी22 चिपसेट सह लॉन्च होणारा जगातील पहिला स्मार्टफोन आहे. फक्त 14,990 रुपयांमध्ये आलेल्या या नॉच डिस्प्ले स्मार्टफोनचा आता अजून एक मॉडेल वीवो घेऊन येत आहे. आम्हाला एक्सक्लूसिव बातमी मिळाली आहे की वीवो इंडियन मार्केट मध्ये एक नॉच डिस्प्ले वाला स्मार्टफोन लॉन्च करण्याची योजना बनवत आहे आणि हा स्मार्टफोन वाय83 चा नवीन वर्जन वाय83 प्रो असेल.

91मोबाईल्सला सूत्रांकडून खबर मिळाली आहे की कंपनी देशात आपली वाय स्मार्टफोन सीरीज वाढवणार आहे आणि या सीरीज मध्ये आता वाय83 प्रो स्मार्टफोन लॉन्च करण्यात येईल. हा फोन पण जुन्या मॉडेल प्रमाणे नॉच डिस्प्ले सह सादर करण्यात येईल आणि यात 6.22-इंचाचा फुलव्यू डिस्प्ले 2.0 देण्यात येईल. फोन मधील नॉच मध्ये एकीकडे सेल्फी कॅमेरा असेल तर दुसरी कडे सेंसर देण्यात येईल. फोनचा फ्रंट कॅमेरा फेस अनलॉक टेक्नोलॉजी सपोर्ट सोबत येईल.

वीवो वाय83 प्रो ला कंपनी एंडरॉयड 8.1 ओरियो आधारित फनटच ओएस 4.0 सह सादर करेल. या फोन मध्ये 4जीबी रॅम देण्यात येईल तसेच फोन मध्ये 64जीबी इंटरनल स्टोरेज मिळेल. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता फोनच्या बॅक पॅनल वर डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे ज्यात 13-मेगापिक्सल आणि 2-मेगापिक्सल चे दोन कॅमेरा सेंसर असतील. तसेच सेल्फी साठी फोनच्या फ्रंट पॅनल वर 8-मेगापिक्सल चा कॅमेरा असेल.

मिळालेल्या माहितीनुसार वाय83 प्रो मध्ये मीडियाटेक चा चिपसेट असू शकतो. तर पावर बॅकअप साठी कंपनी या फोन मध्ये 3,260एमएएचची बॅटरी देईल. कंपनी वाय83 प्रो येत्या काही आठवड्यांत भारतीय बाजारात लॉन्च करेल. हा फोन ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात किंवा सप्टेंबरच्या सुरवातीला देशात लॉन्च होईल. वीवो वाय83 प्रो ला कंपनी 16,000 रुपयांमध्ये लॉन्च करू शकते. फोनची निश्चित लॉन्च डेट व इतर माहिती लवकरच तुम्हाला देण्यात येईल.

The post एक्सक्लूसिव : वीवो वाय83 प्रो होणार आहे भारतात लॉन्च, यात असेल नॉच डिस्प्ले, डुअल कॅमेरा आणि 4जीबी रॅम first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-y83-pro-to-launch-in-india-soon-exclusive-feature-specification-price-in-marathi/feed/ 0