8जीबी रॅम आणि ‘वी’ नॉच वाल्या वीवो एक्स23 ची प्री-बुकिंग सुरू, लवकरच होईल लॉन्च

वीवो च्या आगामी स्मार्टफोन एक्स23 बद्दल गेल्या आठवड्यात एक लीक समोर आला होता ज्यात फोन च्या स्पेसिफिकेशन्स ची माहिती मिळाली होती. या लीक नंतर स्पष्ट झाले की वीवो एक्स21 चा नेक्स्ट जेनेरेशन स्मार्टफोन एक्स24 नावाने सादर केला जाईल. आता वीवो च्या आॅफिशियल चीनी वेबसाइट वर पण हा फोन लिस्ट करण्यात आला आहे. वीवो एक्स23 कंपनी ची वेबसाइट वर दिसल्यामुळे फक्त फोन च्या लॉन्च ची माहिती समोर आली नाही तर या लिस्टिंग मधून फोन चे स्पेसिफिकेशन्स पण समोर आले आहेत.

वीवो एक्स23 मध्ये पहिल्या मॉडेल प्रमाणे अंडर-डिसप्ले फिंगरप्रिंट सेंसर असेल. या फोनची खासियत म्हणजे फोन मधील ‘वी’ शेप वाली ​नॉच जी डिस्प्ले वर खुप कमी जागा घेईल. वीवो एक्स23 च्या चारही बाजूंनी खुप बारीक बेजल देण्यात येतील. या फोन मध्ये 6.4-इंचाचा एमोलेड फुलएचडी+ डिस्प्ले मिळेल तसेच याचा स्क्रीन-टू-बॉडी रेशियो 91.2 प्रतिशत असेल.

वीवो एक्स23 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन एंडरॉयड 8.1 ओरियो आधारित फनटच 4.0 ओएस वर सादर करण्यात येईल सोबतच हा क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 670 चिपसेट वर चालेल. कंपनी ने या फोन मध्ये 8जीबी चा पावरफुल रॅम देईल. वीवो आपला हा हाईएंड फ्लॅगशिप फोन एका पेक्षा जास्त रॅम वेरिएंट मध्ये लॉन्च करू शकते.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता फोन मध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात येईल. कॅमेरा मेगापिक्सल ची माहिती मात्र अजूनही समोर आली नाही पण असे समजले आहे की एलईडी फ्लॅश असलेला हा कॅमेरा सेटअप एआई टेक्नोलॉजीला सपोर्ट करेल तसेच वाईड-एंगल फोटोग्राफी मध्ये पण सक्षम असेल. तसेच फोन च्या फ्रंट पॅनल वरील सेल्फी कॅमेरा मध्ये पण 3डी फेशिअल रेक्ग्नेशन टेक्नोलॉजी असेल.

वीवो एक्स23 साठी कंपनी ने वीवो चाइना च्या आॅफिशियल वेबसाइट वर प्री-बुकिंग सुरू केली आहे. पण कंपनी ने अजूनही फोन ची लॉन्च तारीख सांगितली नाही. लक्षात असू दे उद्या ओपो भारतात ‘वी’ नॉच वाला फोन एफ9 प्रो लॉन्च करणार आहे. त्यामुळे कदाचित वीवो पण लवकरच आपला हा फोन अंर्तराष्ट्रीय बाजारात लॉन्च करू शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here