Vodafone Offer - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Tue, 13 Nov 2018 12:53:01 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 फक्त 189 रुपयांत वोडाफोन नंबर वरून करता येतील 56 दिवस मोफत गप्पा, सोबत मिळेल 2जीबी 4जी डेटा https://www.91mobiles.com/marathi/vodafone-rs189-prepaid-plan-56-days-unlimited-voice-call-offer-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/vodafone-rs189-prepaid-plan-56-days-unlimited-voice-call-offer-in-marathi/#respond Tue, 13 Nov 2018 12:53:01 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=2837 वोडाफोनचा हा नवीन प्लान 56 दिवसांच्या वॅलिडिटी सह येतो. वर सांगितल्याप्रमाणे हा प्लान खासकरून वॉयस कॉलिंग बेनिफिट देतो.

The post फक्त 189 रुपयांत वोडाफोन नंबर वरून करता येतील 56 दिवस मोफत गप्पा, सोबत मिळेल 2जीबी 4जी डेटा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
टेलीकॉम कंपनी वोडाफोन ने गेल्या महिन्यात तीन शानदार प्रीपेड प्लान सादर केले होते. या प्लान्स मध्ये 511 रुपये तसेच 569 रुपयांचे दोन प्लान होते जे 84 दिवसांच्या वॅलिडिटी सह येतात तसेच कंपनी यात क्रमश: रोज 2जीबी तसेच 3जीबी डेटा देते. या दोन प्लान्स व्यतिरिक्त एक 159 रुपयांचा प्लान पण यात होता जो 28 दिवस रोज 1जीबी इंटरनेट डेटा देतो. तर आज पुन्हा एकदा वोडाफोन ने आपल्या यूजर्स साठी शानदार 189 रुपयांचा प्लान सादर केला आहे.

वोडाफोन ने सादर केलेला 189 रुपयांचा प्लान पण प्रीपेड ग्राहकांसाठी आहे. कंपनी ने हा प्लान वॉयस प्लान म्हणून सादर केला आहे. वोडाफोनचा हा नवीन प्लान 56 दिवसांच्या वॅलिडिटी सह येतो. वर सांगितल्याप्रमाणे हा प्लान खासकरून वॉयस कॉलिंग बेनिफिट देतो. वोडाफोन यूजर्स 189 रुपयांच्या रिचार्ज वर 56 दिवस म्हणजे जवळपास दोन महीने तुम्ही मोफत कॉल करू शकाल.

Vodafone

वोडाफोन प्लान मध्ये मिळणारे हे कॉल्स पूर्णपणे फ्री असतील यांचा वापर लोकल व एसटीडी नंबर सोबतच रोमिंग मध्ये पण मोफत राहील. पण हे वॉयस कॉल्स एफयूपी लिमिट सह येतील. वोडाफोन यूजर एका दिवसात अधिकतम 250 मिनिटे बोलू शकतील. तसेच एका आठवड्यात अधिकतम 1000 मिनिटेच फ्री वॉयस कॉलस करता येतील. विशेष म्हणजे कंपनी या प्लान मध्ये एसएमएस ची सुविधा देत नाही.

इंटरनेट डेटा बद्दल बोलायचे तर वोडाफोनच्या 189 रुपयांच्या प्लान मध्ये यूजर्सना 2जीबी इंटरनेट डेटा पण मिळेल. या 2जीबी डेटाचा वापर 4जी सोबतच 3जी व 2जी स्पीड वर पण करता येईल. फक्त 189 रुपयांमध्ये 56 दिवस फ्री कॉलिंग वोडाफोनच्या या प्लानला इतरांपेक्षा खास बनवतात. आपल्या सर्कल मध्ये या प्लानची उपलब्धता जाणून घेण्यासाठी (इथे क्लिक करा)

The post फक्त 189 रुपयांत वोडाफोन नंबर वरून करता येतील 56 दिवस मोफत गप्पा, सोबत मिळेल 2जीबी 4जी डेटा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vodafone-rs189-prepaid-plan-56-days-unlimited-voice-call-offer-in-marathi/feed/ 0
वोडाफोनचा धमाका : 279 रुपयांमध्ये मिळेल 84 दिवस अनलिमिटेड कॉल आणि मिळेल 4जी इंटरनेट डेटा https://www.91mobiles.com/marathi/vodafone-rs-279-plan-unlimited-voice-calling-4gb-data-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/vodafone-rs-279-plan-unlimited-voice-calling-4gb-data-in-marathi/#respond Fri, 05 Oct 2018 13:17:01 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=2386 वोडाफोन ने आणलेला 279 रु[रुपयांचा हा प्लान प्रीपेड ग्राहकांसाठी सादर करण्यात आला आहे जो 84 दिवसांच्या वैधते सह येतो.

The post वोडाफोनचा धमाका : 279 रुपयांमध्ये मिळेल 84 दिवस अनलिमिटेड कॉल आणि मिळेल 4जी इंटरनेट डेटा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
वोडाफोन ने नुकतेच आपल्या यूजर्स साठी 99 रुपये तसेच 109 रुपयांचे दोन प्लान सादर केले आहेत. हे दोन्ही प्लान वॉयस प्लान म्हणून सादर करण्यात आले आहेत जे 28 दिवस ग्राहकांना बेनिफिट देतात. तसेच आता वोडाफोन ने अजून एक नवीन प्लान सादर केला आहे जो जास्त वैधते साठी फायदे देतो. या टेलीकॉम कंपनी ने 279 रुपयांचा नवीन प्लान सादर केला आहे जो 84 दिवस अनलिमिटेड कॉलिंग आणि इंटरनेट डेटाची सुविधा देतो.

वोडाफोन ने आणलेला 279 रु[रुपयांचा हा प्लान प्रीपेड ग्राहकांसाठी सादर करण्यात आला आहे जो 84 दिवसांच्या वैधते सह येतो. वोडाफोन ने हा प्लान वॉयस पॅक महान सादर केला आहे जो अनलिमिटेड वॉयस कॉलिंग सह येतो. वोडाफोन च्या या प्लान मध्ये 84 दिवसांसाठी अनलिमिटेड वॉयस कॉल मिळत आहेत ज्यांचा वापर लोकल व एसटीडी नंबर सोबत नॅशनल रोमिंग मध्ये पण केला जाऊ शकतो.

पण हे अनलिमिटेड वॉयस कॉल एफयूपी लिमिट सह मिळतील. म्हणजे यूजर्स एका दिवसात जास्तीत जास्त 250 मिनिटे बोलू शकतात. एफयूपी लिमिट अंतर्गत यूजर एका आठवड्यात जास्तीत जास्त 1000 मिनिटे बोलू शकतो. या वॉयस कॉलचा वापर संपूर्ण महिन्यात 100 वेगवेगळ्या नंबर्स वर करता येईल. विशेष म्हणजे 300 रुपयांपेक्षा कमी किंमतीती वोडाफोन व्यतिरिक्त कोणतीही कंपनी 84 दिवसांसाठी वॉयस कॉल देत नाही.

इंटरनेट डेटा पाहता या प्लान मध्ये वोडाफोन 84 दिवसांसाठी 4जीबी इंटरनेट डेटा देत आहे जो 4जी सोबतच 3जी स्पीड वर पण चालेल. वोडाफोन ने आपला हा प्लान सध्या काही निवडक सर्कल्स मध्ये लॉन्च केला आहे जो येत्या काही दिवसांत संपूर्ण देशात उपलब्ध होईल. जाता जाता वोडाफोन च्या 109 रुपयांच्या प्लान बद्दल पण सांगतो, यात तुम्हाला 28 दिवसांसाठी अनलिमिटेड वॉयस कॉलिंगची सुविधा मिळेल तसेच कंपनी संपूर्ण महिन्यासाठी 1जीबी 4जी इंटरनेट डेटा देत आहे.

The post वोडाफोनचा धमाका : 279 रुपयांमध्ये मिळेल 84 दिवस अनलिमिटेड कॉल आणि मिळेल 4जी इंटरनेट डेटा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vodafone-rs-279-plan-unlimited-voice-calling-4gb-data-in-marathi/feed/ 0
वोडाफोन देत आहे दुप्पट फायदा, 84 दिवसांसाठी मिळेल 235.2जीबी 4जी डेटा https://www.91mobiles.com/marathi/vodafone-rs-458-prepaid-plan-data-benefits-double-235-gb-4g-data-for-84-days-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/vodafone-rs-458-prepaid-plan-data-benefits-double-235-gb-4g-data-for-84-days-in-marathi/#respond Fri, 20 Jul 2018 11:58:12 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1354 महत्वाची बाब म्हणजे वोडाफोन कडून हा अपडेट सध्या फक्त काही निवडक ग्राहकांना देण्यात आला आहे. हा प्लान त्या सर्कल्स मध्ये अपडेट करण्यात आला आहे जिथे वोडाफोन आपली 4जी सर्विस देत आहे.

The post वोडाफोन देत आहे दुप्पट फायदा, 84 दिवसांसाठी मिळेल 235.2जीबी 4जी डेटा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
वोडाफोन ने याच आठवड्यात जियो व एयरटेल ला टक्कर देत आपला 199 रुपयांचा प्लान अपडेट केला होता. या प्लान मध्ये मिळणारा डेटा डबल करत वोडाफोन 1.4जीबी डेटा ऐवजी आता 2.8जीबी 4जी डेटा देत आहे. टेलीकॉम बाजारावर आपली पकड मजबूत व्हावी यासाठी वोडाफोन ने आता अजून एक प्लान अपडेट केला आहे. वोडाफोन ने 458 रुपयांच्या प्लान मध्ये बदल केला आहे आणि त्यामुळे कंपनी पुन्हा एकदा जियो च्या 449 रुपये आणि एयरटेल च्या 448 रुपयांच्या प्लान ला टक्कर देत आहे.

वोडाफोन चा 458 रुपयांचा प्लान प्रीपेड पॅक आहे. हा प्लान 84​ दिवसांच्या वॅलिडिटी सह येतो. वोडाफोन या प्लान मध्ये आता पर्यंत रोज 1.4जीबी 4जी डेटा देत होती. पण नवीन बदला नंतर एका दिवसात 2.8जीबी 4जी डेटा दिला जात आहे. वोडाफोन ने आपल्या या प्लान मध्ये मिळणारा इंटरनेट डेटा दुप्पट केला आहे पण पॅक ची किंमत तीच ठेवली आहे.

वोडाफोन 458 रुपयांच्या प्लान मध्ये आता पर्यंत एकूण 117.6जीबी 4जी डेटा मिळत होता पण आता झालेल्या नवीन बदलामुळे त्याच किंमतीत 235.2जीबी 4जी इंटरनेट डेटा मिळेल. वोडाफोन ने आधीच्या किंमतीत आपले बेनिफिट दुप्पट केले आहेत. प्लान मधील इतर फायदे पाहता यात अनलिमिटेड लोकल व एसटीडी वॉयस कॉल मिळत आहेत जे रोमिंग मध्ये पण फ्री असतील. त्याचबरोबर या प्लान मध्ये रोज 100 एसएमएस मिळतील.

महत्वाची बाब म्हणजे वोडाफोन कडून हा अपडेट सध्या फक्त काही निवडक ग्राहकांना देण्यात आला आहे. हा प्लान त्या सर्कल्स मध्ये अपडेट करण्यात आला आहे जिथे वोडाफोन आपली 4जी सर्विस देत आहे. त्यामुळे वोडाफोन कडून मिळणारे डबल डाटा बेनिफिट पण सर्व यूजर्स साठी उपलब्ध नाहीत. वोडाफोन प्रीपेड ग्राहक माय वोडाफोन अॅप वर जाऊन याची माहिती मिळवू शकतात की त्यांना दुप्पट डेटा मिळेल की नाही.

जियो चा 448 रुपयांचा प्लान पाहता या प्लान मध्ये यूजर्सना 84 दिवसांसाठी 2जीबी डाटा प्रतिदिन मिळतो. तर एयरटेल च्या 448 रुपयांच्या प्लान मध्ये यूजर्सना 82 दिवसांसाठी रोज 1.4 जीबी 4जी डेटा मिळत आहे.

The post वोडाफोन देत आहे दुप्पट फायदा, 84 दिवसांसाठी मिळेल 235.2जीबी 4जी डेटा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vodafone-rs-458-prepaid-plan-data-benefits-double-235-gb-4g-data-for-84-days-in-marathi/feed/ 0