वोडाफोन देत आहे दुप्पट फायदा, 84 दिवसांसाठी मिळेल 235.2जीबी 4जी डेटा

वोडाफोन ने याच आठवड्यात जियो व एयरटेल ला टक्कर देत आपला 199 रुपयांचा प्लान अपडेट केला होता. या प्लान मध्ये मिळणारा डेटा डबल करत वोडाफोन 1.4जीबी डेटा ऐवजी आता 2.8जीबी 4जी डेटा देत आहे. टेलीकॉम बाजारावर आपली पकड मजबूत व्हावी यासाठी वोडाफोन ने आता अजून एक प्लान अपडेट केला आहे. वोडाफोन ने 458 रुपयांच्या प्लान मध्ये बदल केला आहे आणि त्यामुळे कंपनी पुन्हा एकदा जियो च्या 449 रुपये आणि एयरटेल च्या 448 रुपयांच्या प्लान ला टक्कर देत आहे.

वोडाफोन चा 458 रुपयांचा प्लान प्रीपेड पॅक आहे. हा प्लान 84​ दिवसांच्या वॅलिडिटी सह येतो. वोडाफोन या प्लान मध्ये आता पर्यंत रोज 1.4जीबी 4जी डेटा देत होती. पण नवीन बदला नंतर एका दिवसात 2.8जीबी 4जी डेटा दिला जात आहे. वोडाफोन ने आपल्या या प्लान मध्ये मिळणारा इंटरनेट डेटा दुप्पट केला आहे पण पॅक ची किंमत तीच ठेवली आहे.

वोडाफोन 458 रुपयांच्या प्लान मध्ये आता पर्यंत एकूण 117.6जीबी 4जी डेटा मिळत होता पण आता झालेल्या नवीन बदलामुळे त्याच किंमतीत 235.2जीबी 4जी इंटरनेट डेटा मिळेल. वोडाफोन ने आधीच्या किंमतीत आपले बेनिफिट दुप्पट केले आहेत. प्लान मधील इतर फायदे पाहता यात अनलिमिटेड लोकल व एसटीडी वॉयस कॉल मिळत आहेत जे रोमिंग मध्ये पण फ्री असतील. त्याचबरोबर या प्लान मध्ये रोज 100 एसएमएस मिळतील.

महत्वाची बाब म्हणजे वोडाफोन कडून हा अपडेट सध्या फक्त काही निवडक ग्राहकांना देण्यात आला आहे. हा प्लान त्या सर्कल्स मध्ये अपडेट करण्यात आला आहे जिथे वोडाफोन आपली 4जी सर्विस देत आहे. त्यामुळे वोडाफोन कडून मिळणारे डबल डाटा बेनिफिट पण सर्व यूजर्स साठी उपलब्ध नाहीत. वोडाफोन प्रीपेड ग्राहक माय वोडाफोन अॅप वर जाऊन याची माहिती मिळवू शकतात की त्यांना दुप्पट डेटा मिळेल की नाही.

जियो चा 448 रुपयांचा प्लान पाहता या प्लान मध्ये यूजर्सना 84 दिवसांसाठी 2जीबी डाटा प्रतिदिन मिळतो. तर एयरटेल च्या 448 रुपयांच्या प्लान मध्ये यूजर्सना 82 दिवसांसाठी रोज 1.4 जीबी 4जी डेटा मिळत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here