Xiaomi 5G Phone - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 29 Nov 2019 13:41:55 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Xiaomi घेऊन येणार आहे 5जी स्मार्टफोन, येईल 66W फास्ट चार्जिंग सपोर्ट सह https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-to-bring-5g-smartphone-will-be-equipped-with-66w-fast-charging-support/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-to-bring-5g-smartphone-will-be-equipped-with-66w-fast-charging-support/#respond Fri, 29 Nov 2019 13:41:55 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=5922 कंपनी Redmi K30 5G व्यतिरिक्त 5जी नेटवर्क वर चालणारे अनेक स्मार्टफोन सादर करू शकते.

The post Xiaomi घेऊन येणार आहे 5जी स्मार्टफोन, येईल 66W फास्ट चार्जिंग सपोर्ट सह first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
काही दिवसांपूर्वी स्मार्टफोन बाजारात Samsung आणि Huawei सारख्या कंपन्यांनी 5जी कनेक्टिविटी असलेले फोन सादर केले आहेत. आता या शर्यतीत सामील होत शाओमीने पण कंबर कसली आहे. कंपनी Redmi K30 5G व्यतिरिक्त 5जी नेटवर्क वर चालणारे अनेक स्मार्टफोन सादर करू शकते. याचा एक रिपोर्ट समोर आला आहे, ज्यात शाओमीच्या 5जी डिवाइसेजना चीन मध्ये 3सी सर्टिफिकेशन मिळाल्याची माहिती आहे.

3C सर्टिफिकेशन नुसार शओमी फोन्स M2001J1E आणि M2001J1C मॉडेल नंबर सह दिसले आहेत. हे फोन्स 5जी कनेक्टिविटी सह सादर केले जातील. तसेच दोन्ही फोन फास्ट चार्जिंग फीचरला सपोर्ट पण करतील. विशेष म्हणजे कंपनी 10 डिसेंबरला रेडमी के30 5जी फोन लॉन्च करणार आहे.

सूत्रांनुसार कंपनी नवीन वर्षात 5जी कनेक्टिविटी असलेले मोबाईल्स ग्लोबल मार्केट मध्ये सादर करण्याची योजना बनवत आहे. रिपोर्टनुसार शाओमीचे हे स्मार्टफोन 3सी च्या डेटाबेस वर दिसले आहेत. यात समजले आहे कि फोन 66 वॉट फास्ट चार्जिंग फीचर सह येईल.

काही दिवसांपूवी शाओमीने 100W सुपर चार्ज टर्बो चार्जिंग टेक्नोलॉजी सादर केली होती, त्यावेळी कंपनीने दावा केला होता कि या टेक्नॉलॉजी द्वारे 4,000एमएएच बॅटरी असलेला स्मार्टफोन फक्त 17 मिनिटांत फुल चार्ज करता येईल. तर Vivo च्या 120W charging technology पाहता हि शाओमीपेक्षा काही पाऊले पुढे आहे आणि 4000एमएएच बॅटरी असलेला स्मार्टफोन फक्त 13 मिनिटांत फुल चार्ज करते.

Xiaomi ने 100W Super Charge Turbo charging technology टेक विश्वासमोर ठेवताना हि टेक्नोलॉजी कोणत्या कॅटेगरीत आणि कोणत्या बजेट रेंजच्या स्मार्टफोन्सना सपोर्ट करेल याची माहिती दिली नाही. पण रिपोर्ट्स मध्ये असे समोर आले आहे कि हि टेक्नॉलॉजी असलेले Xiaomi स्मार्टफोन पुढच्यावर्षी म्हणजे 2020 च्या सुरवातीला किंवा मध्यात बाजारात येतील.

The post Xiaomi घेऊन येणार आहे 5जी स्मार्टफोन, येईल 66W फास्ट चार्जिंग सपोर्ट सह first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-to-bring-5g-smartphone-will-be-equipped-with-66w-fast-charging-support/feed/ 0
शाओमीची नवी चाल, लॉन्च झाला मी मिक्स 3 5जी फोन ! सॅमसंग-वीवोला देईल का टक्कर ? https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-mix-5g-smartphone-launched-in-mwc-2019-after-samsung-vivo-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-mix-5g-smartphone-launched-in-mwc-2019-after-samsung-vivo-in-marathi/#respond Mon, 25 Feb 2019 14:23:02 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3709 ग्लोबल मंचावर हा फोन मे महिन्यापासून सेल साठी उपलब्ध होईल

The post शाओमीची नवी चाल, लॉन्च झाला मी मिक्स 3 5जी फोन ! सॅमसंग-वीवोला देईल का टक्कर ? first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
मोबाईल वर्ल्ड कांग्रेस 2019 सुरु झाला आहे. अनेक टेक कंपन्यांनी आपल्या टेक्नॉलॉजीचे प्रदर्शन करण्यासाठी कंबर कसली आहे. टेक दिग्गज सॅमसंग आणि वीवो ने जागतिक मंचावर आपले 5जी स्मार्टफोन सादर केले आहेत, ज्यांच्या पहिल्या झलकीने टेक प्रेमी दिवाने झाले आहेत. आता चीन मधील ऍप्पल म्हणून ओळखील जाणारी टेक कंपनी शाओमी ने पण जगासोमर आपला 5जी फोन सादर केला आहे. कंपनीने पहिला 5जी फोन सादर करत शाओमी ने मी मिक्स 3 अंर्तराष्ट्रीय मंचावर लॉन्च केला आहे.

शाओमी ने एमडब्ल्यूसी 2019 च्या मंचावरून आपला पहिला 5जी फोन सादर केला आहे. शाओमी ने या फोनला मी मिक्स 3 असे नाव दिले आहे. सर्वात आधी फोनच्या 5जी कनेक्टिविटी बद्दल बोलायचे झाले तर हा फोन क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 855 चिपसेट वर सादर केला गेला आहे. क्वालकॉमचा हा चिपसेट 5जी नेटवर्क सपोर्ट सह येतो. तसेच या फोन मध्ये एक्स50 मॉडेम पण देण्यात आला आहे जो मी मिक्स 3 च्या या वेरिएंटला 5जी सपोर्ट देतो. हैराणीची बाब म्हणजे शाओमी मी मिक्स 3 5जी फोन 2जीबीपीएस चा डाउनलोड स्पीड देऊ शकतो.

शाओमी ने आपल्या 5जी फोन बद्दल म्हटले आहे कि त्यांचा फोन 3 क्षेत्रांत सर्वात पुढे असेल. शाओमीचा 5जी फोन इंटरनेटचा वापर फास्ट करेल. कंटेंट अपलोड असो वा डाउनलोड, दोन्ही परिस्थितीत 5जी इंटरनेट वेगाने चालेल. दुसरा फायदा म्हणजे फोनला सर्वरशी कनेक्ट होण्यास खूपच कमी वेळ लागेल. म्हणेज कोणत्याही वेबसाइट वर वेबपेज वर क्लिक करताच वेगाने शाओमी फोनचा नेटवर्क त्या वेबपेजच्या सर्वरशी कनेक्ट होईल आणि त्या क्लिकचा रिजल्ट समोर आणेल. शाओमी 5जी फोन मध्ये प्रत्येक ऍप आणि त्याचा डेटा क्लाउड मेमरी वर सेव करता येईल.

किंमत
किंमत पाहता शाओमी ने मी मिक्स 3 5जी फोन 599 यूरो मध्ये लॉन्च केला आहे. हि किंमत भारतीय करंसीनुसार जवळपास 48,000 रुपये आहे. ग्लोबल मंचावर हा फोन मे महिन्यापासून सेल साठी उपलब्ध होईल. पण भारतात यायला या फोनला थोडा जास्त वेळ लागू शकतो. अशा आहे कि भारतात हा फोन वोडाफोन नेटवर्क सह उपलब्ध होईल. तसेच रिलायंस जियो पण शाओमी मी मिक्स 3 5जी ला येत्या काळात आपल्या नेटवर्क वर उपलब्ध करू शकते.

मी मिक्स 3 5जी
शाओमीचा हा फोन सेरॉमिक बॉडी वर बनला आहे. फोनच्या चारही बाजूंना बारीक बॉडी पार्ट देण्यात आले आहेत. मी मिक्स 3 5जी फोनच्या फ्रंट पॅनल वर कोणतेही फिजिकल बटण देण्यात आलेले नाही. तसेच फोनच्या डिस्प्ले वर बेजल्स किंवा नॉच पण नाही. नॉच नसल्यमुळे फोनच्या फ्रंट पॅनल वर सेल्फी कॅमेरा पण दिसणार नाही. सेल्फी कॅमेऱ्यासाठी मी मिक्स 3 5जी मॉडेल मध्ये स्लाईडर पॅनल देण्यात आला आहे.

फोनचा सेल्फी कॅमेरा वापरण्यासाठी फोनचा बॅक पॅनल वर ढकलावा लागतो ज्यामुळे फोनच्या बॉडी मधील सेल्फी कॅमेरा फोनच्या टॉप पॅनल वरून वर येतो आणि यूजर सेल्फी क्लिक करतो. मी मिक्स 3 मध्ये 19.5:9 आस्पेक्ट रेशियो असलेला डिस्प्ले आहे. या फोन मध्ये 2340 X 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेला 6.39-इंचाचा फुलएचडी+ एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता मी मिक्स 3 ​डुअल रियर आणि डुअल सेल्फी कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर एफ/1.8 आणि एफ/2.4 अपर्चर वाले 12-मेगापिक्सलचे दोन कॅमेरा सेंसर देण्यात आले आहेत जे एआई क्षमतेसह येतात. फोनचा कारियर कॅमेरा वर्टिकल शेप मध्ये देण्यात आला आहे जो एलईडी फ्लॅश सह येतो. तसेच सेल्फी साठी या फोनचा एक कॅमेरा सेंसर 24-मेगापिक्सलचा आहे तर दुसरा कॅमेरा सेंसर 2-मेगापिक्सलचा आहे. तसेच पावर बॅकअप साठी हा फोन 3,800एमएएच च्या बॅटरीला सपोर्ट करतो.

The post शाओमीची नवी चाल, लॉन्च झाला मी मिक्स 3 5जी फोन ! सॅमसंग-वीवोला देईल का टक्कर ? first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-mix-5g-smartphone-launched-in-mwc-2019-after-samsung-vivo-in-marathi/feed/ 0