शाओमीची नवी चाल, लॉन्च झाला मी मिक्स 3 5जी फोन ! सॅमसंग-वीवोला देईल का टक्कर ?

मोबाईल वर्ल्ड कांग्रेस 2019 सुरु झाला आहे. अनेक टेक कंपन्यांनी आपल्या टेक्नॉलॉजीचे प्रदर्शन करण्यासाठी कंबर कसली आहे. टेक दिग्गज सॅमसंग आणि वीवो ने जागतिक मंचावर आपले 5जी स्मार्टफोन सादर केले आहेत, ज्यांच्या पहिल्या झलकीने टेक प्रेमी दिवाने झाले आहेत. आता चीन मधील ऍप्पल म्हणून ओळखील जाणारी टेक कंपनी शाओमी ने पण जगासोमर आपला 5जी फोन सादर केला आहे. कंपनीने पहिला 5जी फोन सादर करत शाओमी ने मी मिक्स 3 अंर्तराष्ट्रीय मंचावर लॉन्च केला आहे.

शाओमी ने एमडब्ल्यूसी 2019 च्या मंचावरून आपला पहिला 5जी फोन सादर केला आहे. शाओमी ने या फोनला मी मिक्स 3 असे नाव दिले आहे. सर्वात आधी फोनच्या 5जी कनेक्टिविटी बद्दल बोलायचे झाले तर हा फोन क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 855 चिपसेट वर सादर केला गेला आहे. क्वालकॉमचा हा चिपसेट 5जी नेटवर्क सपोर्ट सह येतो. तसेच या फोन मध्ये एक्स50 मॉडेम पण देण्यात आला आहे जो मी मिक्स 3 च्या या वेरिएंटला 5जी सपोर्ट देतो. हैराणीची बाब म्हणजे शाओमी मी मिक्स 3 5जी फोन 2जीबीपीएस चा डाउनलोड स्पीड देऊ शकतो.

शाओमी ने आपल्या 5जी फोन बद्दल म्हटले आहे कि त्यांचा फोन 3 क्षेत्रांत सर्वात पुढे असेल. शाओमीचा 5जी फोन इंटरनेटचा वापर फास्ट करेल. कंटेंट अपलोड असो वा डाउनलोड, दोन्ही परिस्थितीत 5जी इंटरनेट वेगाने चालेल. दुसरा फायदा म्हणजे फोनला सर्वरशी कनेक्ट होण्यास खूपच कमी वेळ लागेल. म्हणेज कोणत्याही वेबसाइट वर वेबपेज वर क्लिक करताच वेगाने शाओमी फोनचा नेटवर्क त्या वेबपेजच्या सर्वरशी कनेक्ट होईल आणि त्या क्लिकचा रिजल्ट समोर आणेल. शाओमी 5जी फोन मध्ये प्रत्येक ऍप आणि त्याचा डेटा क्लाउड मेमरी वर सेव करता येईल.

किंमत
किंमत पाहता शाओमी ने मी मिक्स 3 5जी फोन 599 यूरो मध्ये लॉन्च केला आहे. हि किंमत भारतीय करंसीनुसार जवळपास 48,000 रुपये आहे. ग्लोबल मंचावर हा फोन मे महिन्यापासून सेल साठी उपलब्ध होईल. पण भारतात यायला या फोनला थोडा जास्त वेळ लागू शकतो. अशा आहे कि भारतात हा फोन वोडाफोन नेटवर्क सह उपलब्ध होईल. तसेच रिलायंस जियो पण शाओमी मी मिक्स 3 5जी ला येत्या काळात आपल्या नेटवर्क वर उपलब्ध करू शकते.

मी मिक्स 3 5जी
शाओमीचा हा फोन सेरॉमिक बॉडी वर बनला आहे. फोनच्या चारही बाजूंना बारीक बॉडी पार्ट देण्यात आले आहेत. मी मिक्स 3 5जी फोनच्या फ्रंट पॅनल वर कोणतेही फिजिकल बटण देण्यात आलेले नाही. तसेच फोनच्या डिस्प्ले वर बेजल्स किंवा नॉच पण नाही. नॉच नसल्यमुळे फोनच्या फ्रंट पॅनल वर सेल्फी कॅमेरा पण दिसणार नाही. सेल्फी कॅमेऱ्यासाठी मी मिक्स 3 5जी मॉडेल मध्ये स्लाईडर पॅनल देण्यात आला आहे.

फोनचा सेल्फी कॅमेरा वापरण्यासाठी फोनचा बॅक पॅनल वर ढकलावा लागतो ज्यामुळे फोनच्या बॉडी मधील सेल्फी कॅमेरा फोनच्या टॉप पॅनल वरून वर येतो आणि यूजर सेल्फी क्लिक करतो. मी मिक्स 3 मध्ये 19.5:9 आस्पेक्ट रेशियो असलेला डिस्प्ले आहे. या फोन मध्ये 2340 X 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेला 6.39-इंचाचा फुलएचडी+ एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता मी मिक्स 3 ​डुअल रियर आणि डुअल सेल्फी कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर एफ/1.8 आणि एफ/2.4 अपर्चर वाले 12-मेगापिक्सलचे दोन कॅमेरा सेंसर देण्यात आले आहेत जे एआई क्षमतेसह येतात. फोनचा कारियर कॅमेरा वर्टिकल शेप मध्ये देण्यात आला आहे जो एलईडी फ्लॅश सह येतो. तसेच सेल्फी साठी या फोनचा एक कॅमेरा सेंसर 24-मेगापिक्सलचा आहे तर दुसरा कॅमेरा सेंसर 2-मेगापिक्सलचा आहे. तसेच पावर बॅकअप साठी हा फोन 3,800एमएएच च्या बॅटरीला सपोर्ट करतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here