Xiaomi Mi 10 Lite - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 01 Oct 2020 13:47:17 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 64MP कॅमेरा आणि 6.67-इंचाच्या पंच-होल डिस्प्ले सह Xiaomi Mi 10T Lite झाला लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/mi-10t-lite-5g-launched-with-snapdragon-750g-120hz-display-64mp-camera/ https://www.91mobiles.com/marathi/mi-10t-lite-5g-launched-with-snapdragon-750g-120hz-display-64mp-camera/#respond Thu, 01 Oct 2020 13:47:17 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8375 Mi 10T Lite 5G 4,820mAh च्या मोठ्या बॅटरी सह लॉन्च केला गेला आहेत.

The post 64MP कॅमेरा आणि 6.67-इंचाच्या पंच-होल डिस्प्ले सह Xiaomi Mi 10T Lite झाला लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Xiaomi ने काल ग्लोबल मार्केट मध्ये एका वर्चुअल इवेंट मध्ये आपली Mi 10T सीरीज सादर केली आहे. या सीरीज मध्ये कंपनीने Mi 10T 5G, Mi 10T Pro 5G आणि Mi 10T Lite 5G आणले आहेत. या सीरीज मध्ये सादर केला गेलेला मी 10 लाइट 5जी नवीन क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 750G प्रोसेसर सह येतो. तसेच लुकच्या बाबतीत हा बऱ्याचअंशी भारतात लॉन्च झालेल्या Poco X3 सारखा वाटतो.

डिस्प्ले

Mi 10T Lite 5G पण कंपनीने Mi 10T 5G आणि Mi 10T Pro 5G प्रमाणेच पंच-होल डिस्प्ले वर लॉन्च केला आहे. फ्रंट पॅनल वर स्क्रीनच्या तीन कडा बेजल लेस आहेत तसेच खालच्या बाजूला बारीक चिन पार्ट देण्यात आला आहे. स्क्रीनच्या वरच्या बाजूला मधोमध सेल्फी कॅमेरा असलेला पंच-होल आहे. मी 10टी लाइट 5जी 20:9 आस्पेक्ट रेशियो वर लॉन्च केला गेला आहे जो 2280 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.67 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. या फोनची स्क्रीन कोर्निंग गोरिल्ला ग्लास 5 प्रोटेक्टेड आहे तसेच 120हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि 240हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करते.

फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Xiaomi Mi 10T Lite 5G अँड्रॉइड 10 ओएस वर लॉन्च केला गेला आहे जो मीयूआई 12 सह चालतो. त्याचप्रमाणे प्रोसेसिंगसाठी या फोन मध्ये क्वॉलकॉमचा सर्वात तेज 5जी चिपसेट असलेला स्नॅपड्रॅगॉन 750G देण्यात आला आहे. तसेच डिवाइस मध्ये 6GB पर्यंत रॅम आणि 128GB पर्यंत स्टोरेज आहे.

Xiaomi Mi 10T Lite 5G मध्ये क्वाड कॅमेरा सेटअप मागे देण्यात आला आहे. या सेटअप मध्ये 64MP प्राइमरी सेंसर, 13MP ची अल्ट्रा-वाइड लेंस, 2MP ची मॅक्रो लेंस आणि 2MP चा डेप्थ सेंसर पोर्टेट शॉट्ससाठी देण्यात आला आहे. तसेच फ्रंटला सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी 16MP चा कॅमेरा आहे.

Mi 10T Lite 5G 4,820mAh च्या मोठ्या बॅटरी सह लॉन्च केला गेला आहेत. हा फोन 33वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो जी फोन वेगाने चार्ज करण्यास सक्षम आहे. चांगली बाब अशी आहे कि 33वॉटचा चार्जर फोन सोबत दिला जाईल. तसेच फोन मध्ये यात थर्मल मॅनेजमेंटसाठी एक लिक्विडकूल टेक्नॉलॉजी पण आहे.

कनेक्टिविटी ऑप्शनसाठी फोन मध्ये 5 जी, 4 जी एलटीई, वाई-फाई, ब्लूटूथ, जीपीएस / ए-जीपीएस, एनएफसी आणि एक यूएसबी टाइप-सी पोर्टचा समावेश आहे. तसेच डिवाइस अँड्रॉइड 10 ओएस वर लॉन्च केला गेला आहे जो मीयूआई 12 सह चालतो.

किंमत

Mi 10T Lite 5G बाजारात दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला गेला आहे. फोनच्या बेस वेरिएंट मध्ये 6 जीबी रॅम सह 64 जीबी इंटरनल स्टोरेज वेरिएंटची किंमत EUR 279 (जवळपास 24,000 रुपये), त्याचप्रमाणे दुसरा वेरिएंट 6 जीबी रॅम सह 128 जीबी स्टोरेज असलेल्या वेरिएंटची किंमत EUR 329 (जवळपास 28,300 रुपये) आहे. तसेच फोनचा बेस वेरिएंट फ्लॅश सेल मध्ये EUR 249 मध्ये मिळेल जो 13 ऑक्टोबरला होईल. फोन Atlantic Blue, Rose Gold Beach आणि Pearl Gray कलर ऑप्शन मध्ये येतो.

The post 64MP कॅमेरा आणि 6.67-इंचाच्या पंच-होल डिस्प्ले सह Xiaomi Mi 10T Lite झाला लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/mi-10t-lite-5g-launched-with-snapdragon-750g-120hz-display-64mp-camera/feed/ 0
48MP कॅमेरा, 4,160 एमएएच बॅटरी आणि 5G सपोर्ट सह लॉन्च झाला Mi 10 Lite, जाणून घ्या किंमत https://www.91mobiles.com/marathi/mi-10-lite-5g-launched-with-quad-rear-camera-amoled-display-price-sale-specification/ https://www.91mobiles.com/marathi/mi-10-lite-5g-launched-with-quad-rear-camera-amoled-display-price-sale-specification/#respond Mon, 30 Mar 2020 12:07:12 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6931 Xiaomi ने आयोजित केलेल्या एका ऑनलाइन इवेंट मध्ये Mi 10 सीरीज मध्ये Mi 10 Lite सोबत Mi 10 आणि Mi 10 Pro लॉन्च केले आहेत.

The post 48MP कॅमेरा, 4,160 एमएएच बॅटरी आणि 5G सपोर्ट सह लॉन्च झाला Mi 10 Lite, जाणून घ्या किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Xiaomi ने आयोजित केलेल्या एका ऑनलाइन इवेंट मध्ये Mi 10 सीरीज मध्ये Mi 10 Lite सोबत Mi 10 आणि Mi 10 Pro लॉन्च केले आहेत. Mi 10 आणि Mi 10 Pro आधी लॉन्च केले गेले होते. यातील मी 10 लाइट 5जी नवीन स्मार्टफोन आहे जो होल-पंच डिस्प्ले डिजाइन सह आला आहे.

Mi 10 Lite ची किंमत आणि उपलब्धता

मी 10 लाइट 5जी कंपनीने 349 यूरो (जवळपास 29,200 रुपये) मध्ये सादर केला आहे. तसेच शाओमीने हा स्मार्टफोन चार वेगवेगळ्या कलर ऑप्शन सह सादर केला आहे. हा हँडसेट यूरोपीय बाजारांत विक्रीसाठी उपलब्ध होईल. भारतातील याच्या उपलब्धतेबाबत अजूनतरी माहिती समोर आली नाही. विशेष म्हणजे मी 10 भारतात 31 मार्चला लॉन्च केला जाणार होता. पण कंपनीने देशातील लॉकडाउनमुळे लॉन्च स्थगित केला आहे.

Mi 10 Lite चे स्पेसिफिकेशन्स

Mi 10 Lie 5जी चे स्पेसिफिकेशन्स पाहता यात 6.57-इंचाचा एमोलेड ट्रू-कलर डिस्प्ले देण्यात आला आहे. जो वाटरड्रॉप नॉच सह येतो. फोन मध्ये ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 765G चिपसेट आहे. रॅम आणि स्टोरेज क्षमतेबाबत सध्यातरी माहिती देण्यात आलेली नाही. पण कंपनीच्या मते यात एलपीडीडीआर4एक्स रॅम आणि यूएफएस 2.1 स्टोरेज असेल.

फोटोग्राफीसाठी Xiaomi Mi 10 Lite मध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप आहे, ज्यात 48-मेगापिक्सलच्या प्राइमरी सेंसरचा समावेश आहे. तसेच कंपनीने इतर सेंसर्सची माहिती दिली नाही. पण हा स्मार्टफोन नाइट मोड 2.0, एआई डायनामिक स्कायस्केपिंग आणि व्लॉग मोड सारख्या फीचर्स सह येतो. तसेच फोन मध्ये वीडियो कॉलिंग आणि सेल्फीसाठी 16-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याचा समावेश करण्यात आला आहे.

स्मार्टफोन शाओमी मी 10 लाइट 5जी मध्ये पावर बॅकअपसाठी 4,160 एमएएच क्षमता असेलेली बॅटरी देण्यात आली आहे, जी 20W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. त्याचबरोबर स्मार्टफोन क्विक चार्ज 3.5 ला पण सपोर्ट करतो. सोबतच यात इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर आहे.

The post 48MP कॅमेरा, 4,160 एमएएच बॅटरी आणि 5G सपोर्ट सह लॉन्च झाला Mi 10 Lite, जाणून घ्या किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/mi-10-lite-5g-launched-with-quad-rear-camera-amoled-display-price-sale-specification/feed/ 0