Xiaomi Mi Note 10 Lite - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 11 Jun 2020 11:30:57 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 5260एमएएच बॅटरी, 6 जीबी रॅम आणि 64एमपी क्वॉड कॅमेरा सह लॉन्च झाला Xiaomi चा पावरफुल फोन Mi Note 10 Lite https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-note-10-lite-launched-64mp-quad-camera-snapdragon-730g-30w-5260mah-battery-specs-price-sale/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-note-10-lite-launched-64mp-quad-camera-snapdragon-730g-30w-5260mah-battery-specs-price-sale/#respond Thu, 30 Apr 2020 11:28:34 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=7380 Mi Note 10 Lite कंपनीने वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले वर लॉन्च केला आहे.

The post 5260एमएएच बॅटरी, 6 जीबी रॅम आणि 64एमपी क्वॉड कॅमेरा सह लॉन्च झाला Xiaomi चा पावरफुल फोन Mi Note 10 Lite first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Xiaomi फॅन्ससाठी आजचा दिवस चांगला म्हणता येईल. कंपनीने एकीकडे कमी किंमतीत Redmi Note 9 स्मार्टफोन टेक मंचावर सादर केला आहे तर दुसरीकडे फ्लॅगशिप सेग्मेंट मध्ये अजून एक नोंदणी करत Mi Note 10 Lite पण बाजारात आणला आहे. मी नोट 10 सीरीजचा हा डिवाईस आर्कषक लुक सोबतच शानदार स्पेसिफिकेशन्सना सपोर्ट करतो. सध्या हा फोन यूरोपियन मार्केट मध्ये लॉन्च केला गेला आहे जो येत्या काही दिवसांत भारतात पण येऊ शकतो.

लुक व डिजाईन

Mi Note 10 Lite कंपनीने वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले वर लॉन्च केला आहे. फोनची स्क्रीन दोन्ही बाजूंनी बॅक पॅनलच्या दिशेने वळली आहे, स्क्रीनला कर्व्ड डिस्प्लेचे नाव देण्यात आला आहे. स्क्रीनच्या खाली खूप बारीक चिन पार्ट देण्यात आला आहे तर वरच्या बाजूला ‘यू’ शेप नॉच आहे. फोनच्या बॅक पॅनल वर क्वॉड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जो वर उजवीकडे आहे. हा कॅमेरा सेटअप चौकोनी आकाराचा आहे ज्यात डावीकडे चार कॅमेरा सेंसर वर्टिकल शेप मध्ये आहेत तसेच उजवीकडे फ्लॅश लाईट सह लेंसची माहिती लिहिण्यात आली आहे. शाओमी मी नोट 10 लाइटच्या लोवर पॅनल वर यूएसबी पोर्ट सोबतच स्पीकर आणि 3.5एमएम जॅक देण्यात आला आहे.

स्पेसिफिकेशन्स

Mi Note 10 Lite चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन 19.5:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला गेला आहे जो 2340 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.47 इंचाच्या फुलएचडी+ 3डी कर्व्ड एमोलेड डिस्प्लेला सपोर्ट करतो. शाओमीने आपल्या फोनला फ्रंट आणि बॅक दोन्ही पॅनल्स वर 3डी कर्व्ड ग्लासची सुरक्षा दिली आहे. Xiaomi ने हा फोन एंडरॉयडच्या लेटेस्ट ओएस एंडरॉयड 10 वर सादर केला आहे जो मीयूआई 11 वर चालतो.

Xiaomi ने हा फोन दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला आहे. फोनचा बेस वेरिएंट 6 जीबी रॅम सह 64 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो तर दुसऱ्या वेरिएंट मध्ये 6 जीबी रॅम सोबतच 128 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. कंपनीने फोनचा 8जीबी रॅम वेरिएंट पण सादर केला आहे पण तो बाजारात येण्यास वेळ लागेल. तसेच प्रोसेसिंगसाठी Mi Note 10 Lite आक्टा-कोर प्रोसेसर सह 8एनएम टेक्नॉलॉजी असलेला क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 730जी चिपसेटला सपोर्ट करतो.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Mi Note 10 Lite क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह एफ/1.89 अपर्चर असलेला 64 मेगापिक्सलचा प्राइमरी Sony IMX686 सेंसर देण्यात आला आहे. त्याचबरोबर हा फोन एफ/2.4 अपर्चर असलेल्या 8 मेगापिक्सलच्या अल्ट्रा वाइड अँगल लेंस, 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आणि तेवढाच अपर्चर असलेल्या 5 मेगापिक्सलच्या डेफ्थ सेंसरला सपोर्ट करतो. तसेच सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी या फोन मध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.

Xiaomi Mi Note 10 Lite रियल डुअल सिम फोन आहे जो 3.5एमएम जॅक आणि बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सह येतो. सिक्योरिटीसाठी हा फोन कंपनीने इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट टेक्नॉलॉजी सह बाजारात आणला आहे तर पावर बॅकअपसाठी हा फोन 30वॉट फास्ट चार्जिंग असलेल्या 5,260एमएएच च्या मोठ्या बॅटरीला सपोर्ट करतो. किंमत पाहता मी नोट 10 लाइटचा 6 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज वेरिएंट 349 यूरो (जवळपास 28,000 रुपये) आणि 6 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वेरिएंट 399 यूरो (जवळपास 32,500 रुपये) मध्ये लॉन्च केला गेला आहे.

The post 5260एमएएच बॅटरी, 6 जीबी रॅम आणि 64एमपी क्वॉड कॅमेरा सह लॉन्च झाला Xiaomi चा पावरफुल फोन Mi Note 10 Lite first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-note-10-lite-launched-64mp-quad-camera-snapdragon-730g-30w-5260mah-battery-specs-price-sale/feed/ 0
Xiaomi घेऊन येत आहे 5 रियर कॅमेरे आणि 5260एमएएच बॅटरी असलेला Mi Note 10 Lite, स्पेसिफिकेशन्स झाले लीक https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-note-10-lite-specs-leaked-with-penta-rear-camera-5260mah-battery/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-note-10-lite-specs-leaked-with-penta-rear-camera-5260mah-battery/#respond Mon, 30 Mar 2020 14:06:27 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6943 Xiaomi ने गेल्यावर्षी अंर्तराष्ट्रीय बाजारात आपल्या फ्लॅगशिप अंतर्गत Mi Note 10 आणि Mi Note 10 Pro स्मार्टफोन लॉन्च केले होते. या स्मार्टफोन्स सोबतच शाओमीने टेक मंचावर आपल्या टेक्नॉलॉजीचे प्रदर्शन करत ब्रँडचा 108 मेगापिक्सल कॅमेरा असलेले फोन्स सादर केले होते. शाओमीने अजूनही मी नोट 10 आणि मी नोट 10 प्रो भारतीय बाजारात उतरवले नाहीत, पण या […]

The post Xiaomi घेऊन येत आहे 5 रियर कॅमेरे आणि 5260एमएएच बॅटरी असलेला Mi Note 10 Lite, स्पेसिफिकेशन्स झाले लीक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Xiaomi ने गेल्यावर्षी अंर्तराष्ट्रीय बाजारात आपल्या फ्लॅगशिप अंतर्गत Mi Note 10 आणि Mi Note 10 Pro स्मार्टफोन लॉन्च केले होते. या स्मार्टफोन्स सोबतच शाओमीने टेक मंचावर आपल्या टेक्नॉलॉजीचे प्रदर्शन करत ब्रँडचा 108 मेगापिक्सल कॅमेरा असलेले फोन्स सादर केले होते. शाओमीने अजूनही मी नोट 10 आणि मी नोट 10 प्रो भारतीय बाजारात उतरवले नाहीत, पण या सीरीजच्या भारतातील लॉन्चच्या आधीच अजून एका नवीन फोनची माहिती समोर आली आहे. बातमी आहे कि शाओमी मी नोट 10 सीरीज मध्ये अजून एक नवीन डिवाईस आणणार आहे आणि याचे नाव Mi Note 10 Lite असेल.

Xiaomi Mi Note 10 Lite ची माहिती प्रसिद्ध टिप्सटर सुधांशू याने दिले आहे. या टिपस्टरने आपल्या अधिकृत ट्वीटर हँडल वर ट्वीट करून मी नोट 10 लाइटची माहिती दिली आहे. ट्वीट मध्ये सांगण्यात आले आहे कि Mi Note 10 Lite Xiaomi M2002F4LG मॉडेल नंबर सह बाजारात येईल. या लीक मध्ये फोनच्या मॉडेल नंबर सोबतच स्पेसिफिकेशस पण शेयर केले आहेत. लीकनुसार हा फोन मोठ्या बॅटरी आणि शानदार कॅमेरा सेंसर्स सह लॉन्च केला जाईल.

Mi Note 10 Lite चे स्पेसिफिकेशन्स पाहता लीकनुसार हा स्मार्टफोन 6.47 इंचाच्या मोठ्या डिस्प्ले वर लॉन्च केला जाऊ शकतो. फोन मध्ये एंडरॉयड 10 असल्याचे समोर आले आहे ज्या सोबत प्रोसेसिंगसाठी मी नोट 10 लाइट मध्ये क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगॉन 730जी चिपसेट दिला जाऊ शकतो. फोन मध्ये पावर बॅकअपसाठी 30वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेली 5,260एमएएच ची बॅटरी मिळू शकते. समोर आलेल्या लीकनुसार हा फोन पेंटा रियर कॅमेऱ्यासह लॉन्च केला जाईल. म्हणजे फोनच्या बॅक पॅनल वर 5 कॅमेरा सेंसर असतील.

शाओमी मी नोट 10 लाइट च्या फोटोग्राफी सेग्मेंट बद्दल बोलायचे तर लीकनुसार फोनच्या बॅक पॅनल वर 64 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर मिळेल. त्याचबरोबर 8 मेगापिक्सल + 8 मेगापिक्सल + 5 मेगापिक्सल + 2 मेगापिक्सलचे इतर 4 कॅमेरा सेंसर्स फोन मध्ये दिले जाऊ शकतात. सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी Mi Note 10 Lite मध्ये 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा असल्याचे समोर आले आहे. सध्यातरी Xiaomi Mi Note 10 Lite चे हे स्पेसिफिकेशन्स फक्त लीकच म्हणता येतील.

Mi Note 10

मी नोट 10 मध्ये 6.47 इंचाचा कर्व्ड फुल-एचडी+ (1080×2340 पिक्सल) ओलेड डिस्प्ले आहे. पिक्सल डेनसिटी 398 पीपीआई आहे. स्मार्टफोन मध्ये ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 730जी प्रोसेसर सह 8 जीबी तक रॅम आहे. फोन मध्ये 256 जीबी पर्यंत स्टोरेज आहे. Mi Note 10 ची बॅटरी 5,260 एमएएच ची आहे जी 30 वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. कंपनीने रिटेल बॉक्स मध्ये 30 वॉट चार्जर दिला आहे जो फोन 65 मिनिटांत पूर्ण चार्ज करतो. कनेक्टिविटी फीचर्स मध्ये 4जी एलटीई, वाई-फाई 802.11ए/बी/जी/एन/एसी, ब्लूटूथ 5.0 आणि जीपीएस चा समावेश आहे.

Mi Note 10 बद्दल बोलायचे तर यात एफ/ 1.69 अपर्चर असलेला 108 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा देण्यात आला आहे. जो ऑप्टिकल इमेज स्टेबलाइजेशन सह येतो. सोबत 117 डिग्री फील्ड ऑफ व्यू असलेला 20 मेगापिक्सलचा वाइड एंगल कॅमेरा, 12 मेगापिक्सलची शॉर्ट टेलीफोटो लेंस, सेकेंडरी 5 मेगापिक्सलची टेलीफोटो लेंस आणि 2 मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा आहे. तर वीडियो कॉलिंग आणि सेल्फी साठी फोनच्या फ्रंट पॅनल वर एफ/ 2.0 अपर्चर असलेला 32 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे.

शाओमी ने 100W सुपर चार्ज टर्बो चार्जिंग टेक्नोलॉजी सादर करत दावा केला आहे कि या टेक्नॉलॉजी द्वारे 4,000एमएएच बॅटरी असलेला स्मार्टफोन फक्त 17 मिनिटांत फुल चार्ज करता येईल. Vivo ची 120W charging technology पाहता शाओमीच्या पुढे आहे आणि 4000एमएएच बॅटरी असलेला स्मार्टफोन फक्त 13 मिनिटांत फुल चार्ज करते.

The post Xiaomi घेऊन येत आहे 5 रियर कॅमेरे आणि 5260एमएएच बॅटरी असलेला Mi Note 10 Lite, स्पेसिफिकेशन्स झाले लीक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-note-10-lite-specs-leaked-with-penta-rear-camera-5260mah-battery/feed/ 0