Xiaomi Mi Play - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Mon, 24 Dec 2018 14:31:23 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 हि आहेत शाओमी मी प्ले मधील 5 वैशिष्ट्ये आणि 5 कमजोऱ्या https://www.91mobiles.com/marathi/top-5-feature-and-5-disappointment-of-xiaomi-mi-play-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/top-5-feature-and-5-disappointment-of-xiaomi-mi-play-in-marathi/#respond Mon, 24 Dec 2018 14:30:51 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3216 या फोन मध्ये अनेक वैशिष्ट्ये आहेत पण यात काही कमजोऱ्या पण आहेत आणि खाली आम्ही त्यांचाच उल्लेख केला आहे.

The post हि आहेत शाओमी मी प्ले मधील 5 वैशिष्ट्ये आणि 5 कमजोऱ्या first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
अचानकपणे बातमी आली की शाओमी लवकरच प्ले सीरीजचे फोन लॉन्च करू शकते आणि हि पोको फोनची रिप्लेसमेंट असेल. याबद्दल कंपनीने काहीच सांगिलते नाही पण प्ले फोन आज चीन मध्ये लॉन्च केला आहे. आतापर्यंत कंपनी रेडमी, मी आणि ​मीक्स सहित काही सीरीज मध्ये आपले फोन लॉन्च करत होती पण प्ले च्या स्वरूपात आता नवीन सीरीज आली आहे. या फोन मध्ये अनेक वैशिष्ट्ये आहेत पण यात काही कमजोऱ्या पण आहेत आणि खाली आम्ही त्यांचाच उल्लेख केला आहे.

वैशिष्ट्ये

1. वाटर ड्रॉप नॉच: शओमी मी प्ले कंपनीचा पहिला फोन आहे ज्यात वाटर ड्रॉप नॉच देण्यात आली आहे. फोन मध्ये 5.84-इंचाची स्क्रीन आहे जी 19:9 आस्पेक्ट रेशियो सह उपलब्ध आहे. कंपनी ने 1080 x 2246 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या फुलएचडी+ स्क्रीनचा वापर केला आहे.

2. शानदार प्रोसेसर: शाओमी मी प्ले कंपनी ने मीडियाटेकच्या नवीन हेलियो पी35 चिपसेट वर सादर केला गेला आहे. फोन मध्ये तुम्हाला 3.5गीगाहट्र्ज चा ऑक्टाकोर प्रोसेसर मिळेल. तसेच ग्राफिक्स साठी आईएमजी जीई8320 जीपीयू आहे. हा प्रोसेसर खूप ताकदवान आहे आणि फोन मध्ये गेमिंग साठी खास डुअल टर्बो स्मार्ट एक्सलेरेशन देण्यात आला आहे जो गेमिंग चांगली करतो. सोबत 4जीबी रॅम आणि 64जीबी इंटरनल स्टोरेज आहे.

3. डुअल रियर कॅमेरा: कमी किंमत असूनही फोनचे स्पेसिफिकेशन खूप चांगले आहेत. कंपनीने हा डुअल रियर कॅमेऱ्यासह सादर केला आहे. फोन मध्ये एक सेंसर 12-मेगापिक्सलचा आहे तर दुसरा 2-मेगापिक्सलचा देण्यात आला आहे. रियर कॅमेऱ्यासह तुम्हाला पोर्टेमोड आणि ब्लर बॅकग्राउंड सह एचडीआर आणि इआईएस सपोर्ट मिळेल.

4. डुअल वोएलटीई: शाओमी मी प्ले फोन मध्ये डुअल सिम सपोर्ट आहे. चांगली बाब अशी की दोन्ही सिम वर तुम्ही 4जी वोएलटीई वापर शकता. कंपनीने हा डुअल 4जी सपोर्ट सह सादर केला आहे.

5. यूएसबी टाइप सी: कमी रेंजच्या फोन मध्ये बऱ्याचदा तुम्हाला माइक्रोयूसबी पोर्ट मिळतो पण कंपनी ने शाओमी मी प्ले यूएसबी टाइम—सी पोर्ट सह सादर केला आहे जो फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो. तसेच फोन मध्ये फिंगरप्रिंट स्कॅनर आणि फेस अनलॉक सारखे फीचर्स पण देण्यात आले आहेत.

कमजोऱ्या

1. कमजोर बॅटरी: कंपनी ने शाओमी मी प्ले गेमिंग फोन म्हणून सादर केला आहे पण या फोनची सर्वात मोठी कमजोरी म्हणजे फोन मध्ये फक्त 3,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

2. छोटी स्क्रीन: छोट्या बॅटरी सोबतच छोटी स्क्रीन पण हेवी मल्टीमीडिया यूजर्ससाठी अडचण ठरू शकते. यात एयरड्रॉप नॉच असूनही यात कंपनी ने 5.84—इंचाची स्क्रीन दिली आहे. 6—इंच किंवा त्यापेक्षा मोठी स्क्रीन असती तर चांगले वाटले असते.

3. स्क्रीन प्रोटेक्शन नाही: कंपनी ने मी प्ले साठी स्क्रीन प्रोटेक्शनची माहिती दिली नाही.

4. जुना ओएस: हा फोन एंडरॉयड ऑपरेटिंग सिस्टम 8.1 ओरियो वर चालतो. जास्तीत जास्त फोन आता या एंडरॉयड ऑपरे​टिंग सिस्टम वर लॉन्च होत आहेत. असे असूनही हा जुनाच म्हणता येईल. एंडरॉयड 9 पाई सह आला असता तर बरे झाले असते. हा ओएस लॉन्च होऊन खूप वेळ झाला आहे.

5. साधारण सेल्फी: सेल्फी साठी शाओमी प्ले मध्ये फक्त 8—मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. एका चांगल्या मल्टीमीडिया फोन मध्ये अजून जास्त चांगल्या कॅमेऱ्याची अपेक्षा असते.

The post हि आहेत शाओमी मी प्ले मधील 5 वैशिष्ट्ये आणि 5 कमजोऱ्या first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/top-5-feature-and-5-disappointment-of-xiaomi-mi-play-in-marathi/feed/ 0
4जीबी रॅम सह लॉन्च झाला शाओमीचा पहिला वॉटरड्रॉप नॉच असलेला फोन ‘मी प्ले’ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-play-launched-price-feature-specifications-waterdrop-notch-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-play-launched-price-feature-specifications-waterdrop-notch-in-marathi/#respond Mon, 24 Dec 2018 12:13:46 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3207 किंमत भारतीय करंसीनुसार 11,200 रुपयांच्या आसपास आहे.

The post 4जीबी रॅम सह लॉन्च झाला शाओमीचा पहिला वॉटरड्रॉप नॉच असलेला फोन ‘मी प्ले’ first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
शाओमी ने कमी किंमत आणि ताकदवान स्पेसिफिकेशन्स सह वेगाने स्मार्टफोन मार्केटवर कब्जा केला आहे. भारतासोबतच जगातील इतर बाजारांत पण शाओमी फोन यूजर्सची संख्या सतत वाढत आहे. शाओमी आपल्या स्मार्टफोन्स मध्ये प्रत्येक टेक्नॉलॉजी आणि डिजाईन देत असते. आपल्या फॅन्सना अजून एक भेट देत शाओमी ने आज टेक मंचावर नवीन डिवाईस सादर केला आहे. शाओमीने ‘मी प्ले’ लॉन्च केला आहे. मी प्ले सोबतच शाओमी ने वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले सेग्मेंट मध्ये एंट्री केली आहे.

शाओमीने आपला लेटेस्ट स्मार्टफोन ‘मी प्ले’ आज चीनी बाजारात लॉन्च केला आहे. मी प्ले शाओमी ब्रॅण्डचा पहिला असा स्मार्टफोन आहे ज्यात ‘वी’ शेप असलेली नॉच देण्यात आली आहे. हा फोन खूपच आर्कषक लुक व डिजाईन तसेच दमदार स्पेसिफिकेशन्स सह येतो. शाओमी ने आपला हा फोन 19:9 आस्पेक्ट रेशियो असलेल्या वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले सह सादर केला आहे जो 1080 x 2246 पिक्सल रेज्ल्यूशन वाली 5.84-इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. डिस्प्लेचे तिन्ही किनारे बेजल लेस आहेत तर खालच्या बाजूला थोडासा बॉडी पार्ट देण्यात आला आहे.

मी प्ले चे स्पेसि​फिकेशन्स पाहता हा फोन एंडरॉयड 8.1 ओरियो आधारित मीयूआई 9.6 वर सादर केला गेला आहे जो 2.3गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या ऑक्टा-कोर प्रोसेसर सह मीडियाटेकच्या लेटेस्ट चिपसेट एमटीके पी35 वर चालेल. शाओमीने आपला हा फोन 4जीबी रॅम मेमरी सह सादर केला आहे. मी प्ले 64जीबी च्या इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो जी माइक्रोएसडी कार्डच्या मदतीने वाढवता येते.

शाओमी मी प्ले मध्ये ग्राफिक्स साठी एड्रेनो 630 जीपीयू आहे.फोटोग्राफी साठी मी प्ले डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर डुअल एलईडी फ्लॅश सह 12-मेगापिक्सलचा प्राइमरी आणि 2-मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच फोनच्या फ्रंट पॅनल वर एलईडी फ्लॅश सह 8-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. शाओमी मी प्ले डुअल सिम सह 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो.

सिक्योरिटी साठी फोनच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच हा फोन फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. तसेच पावर बॅकअप साठी मी प्ले मध्ये यूएसबी टाइप-सी पोर्ट सोबत टर्बो चार्ज टेक्नॉलॉजी असलेली 3,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. चीन मध्ये हा फोन ब्लॅक, ड्रीम ब्लू आणि डॉन गोल्ड कलर मध्ये सेलसाठी उपलब्ध होईल. किंमत पाहता शाओमी मी प्ले 1099 युआन मध्ये लॉन्च केला गेला आहे. हि किंमत भारतीय करंसीनुसार 11,200 रुपयांच्या आसपास आहे.

The post 4जीबी रॅम सह लॉन्च झाला शाओमीचा पहिला वॉटरड्रॉप नॉच असलेला फोन ‘मी प्ले’ first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-play-launched-price-feature-specifications-waterdrop-notch-in-marathi/feed/ 0