4जीबी रॅम सह लॉन्च झाला शाओमीचा पहिला वॉटरड्रॉप नॉच असलेला फोन ‘मी प्ले’

शाओमी ने कमी किंमत आणि ताकदवान स्पेसिफिकेशन्स सह वेगाने स्मार्टफोन मार्केटवर कब्जा केला आहे. भारतासोबतच जगातील इतर बाजारांत पण शाओमी फोन यूजर्सची संख्या सतत वाढत आहे. शाओमी आपल्या स्मार्टफोन्स मध्ये प्रत्येक टेक्नॉलॉजी आणि डिजाईन देत असते. आपल्या फॅन्सना अजून एक भेट देत शाओमी ने आज टेक मंचावर नवीन डिवाईस सादर केला आहे. शाओमीने ‘मी प्ले’ लॉन्च केला आहे. मी प्ले सोबतच शाओमी ने वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले सेग्मेंट मध्ये एंट्री केली आहे.

शाओमीने आपला लेटेस्ट स्मार्टफोन ‘मी प्ले’ आज चीनी बाजारात लॉन्च केला आहे. मी प्ले शाओमी ब्रॅण्डचा पहिला असा स्मार्टफोन आहे ज्यात ‘वी’ शेप असलेली नॉच देण्यात आली आहे. हा फोन खूपच आर्कषक लुक व डिजाईन तसेच दमदार स्पेसिफिकेशन्स सह येतो. शाओमी ने आपला हा फोन 19:9 आस्पेक्ट रेशियो असलेल्या वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले सह सादर केला आहे जो 1080 x 2246 पिक्सल रेज्ल्यूशन वाली 5.84-इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. डिस्प्लेचे तिन्ही किनारे बेजल लेस आहेत तर खालच्या बाजूला थोडासा बॉडी पार्ट देण्यात आला आहे.

मी प्ले चे स्पेसि​फिकेशन्स पाहता हा फोन एंडरॉयड 8.1 ओरियो आधारित मीयूआई 9.6 वर सादर केला गेला आहे जो 2.3गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या ऑक्टा-कोर प्रोसेसर सह मीडियाटेकच्या लेटेस्ट चिपसेट एमटीके पी35 वर चालेल. शाओमीने आपला हा फोन 4जीबी रॅम मेमरी सह सादर केला आहे. मी प्ले 64जीबी च्या इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो जी माइक्रोएसडी कार्डच्या मदतीने वाढवता येते.

शाओमी मी प्ले मध्ये ग्राफिक्स साठी एड्रेनो 630 जीपीयू आहे.फोटोग्राफी साठी मी प्ले डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर डुअल एलईडी फ्लॅश सह 12-मेगापिक्सलचा प्राइमरी आणि 2-मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच फोनच्या फ्रंट पॅनल वर एलईडी फ्लॅश सह 8-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. शाओमी मी प्ले डुअल सिम सह 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो.

सिक्योरिटी साठी फोनच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच हा फोन फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. तसेच पावर बॅकअप साठी मी प्ले मध्ये यूएसबी टाइप-सी पोर्ट सोबत टर्बो चार्ज टेक्नॉलॉजी असलेली 3,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. चीन मध्ये हा फोन ब्लॅक, ड्रीम ब्लू आणि डॉन गोल्ड कलर मध्ये सेलसाठी उपलब्ध होईल. किंमत पाहता शाओमी मी प्ले 1099 युआन मध्ये लॉन्च केला गेला आहे. हि किंमत भारतीय करंसीनुसार 11,200 रुपयांच्या आसपास आहे.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here