Xiaomi Redmi 9A - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Wed, 02 Sep 2020 10:33:56 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 फक्त 6,799 रुपयांमध्ये लॉन्च झाला Xiaomi चा 5,000एमएएच बॅटरी असलेला स्वस्त स्मार्टफोन Redmi 9A https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-9a-launched-in-india-know-full-specification-features-price-sale-offer/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-9a-launched-in-india-know-full-specification-features-price-sale-offer/#respond Wed, 02 Sep 2020 10:33:56 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=7945 Redmi 9A कंपनीने वॉटरड्रॉप नॉच डिजाईन वर सादर केला गेला आहे, जो ऑरा 360 डिजाईन वर बनला आहे तसेच पी2आई कोटेड आहे.

The post फक्त 6,799 रुपयांमध्ये लॉन्च झाला Xiaomi चा 5,000एमएएच बॅटरी असलेला स्वस्त स्मार्टफोन Redmi 9A first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Xiaomi ने गेल्या आठवड्यात इंडियन मार्केट मध्ये ‘रेडमी सीरीज’ अंतर्गत नवीन स्मार्टफोन Redmi 9 लॉन्च केला होता. हा फोन दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च झाला होता ज्यात 4 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 8,999 रुपये तसेच 4 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 9,999 रुपये आहे. रेडमी 9 ची विक्री सुरु झाल्यानंतर आता शाओमीने या सीरीज मध्ये अजून एक नवीन फोन Redmi 9A पण लॉन्च केला आहे. शाओमी रेडमी 9ए पण लो बजेट मध्ये आला आहे जो 6,799 रुपयांच्या बेस किंमतीत येत्या 4 सप्टेंबर पासून विक्रीसाठी उपलब्ध होईल.

लुक व डिजाईन

Redmi 9A कंपनीने वॉटरड्रॉप नॉच डिजाईन वर सादर केला गेला आहे, जो ऑरा 360 डिजाईन वर बनला आहे तसेच पी2आई कोटेड आहे. फ्रंट पॅनल वर स्क्रीनच्या तीन कडा बेजल लेस आहेत तर खालच्या बाजूला रुंद चिन पार्ट आहे. फोनच्या बॅक पॅनल वर रियर कॅमेरा सेटअप वरच्या बाजूला डावीकडे वर्टिकल शेप मध्ये आहे. या सेटअप मध्ये एक कॅमेरा लेंस आणि एक फ्लॅश लाईट देण्यात आली आहे. फोनच्या रियर पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर नाही. उजव्या पॅनल वर वॉल्यूम रॉकर आणि पावर बटन देण्यात आला आहे तसेच डाव्या पॅनल वर सिम स्लॉट आहे. फोनच्या लोवर पॅनल वर यूएसबी पोर्ट आणि वरच्या पॅनल वर 3.5एमएम जॅक आहे.

फीचर्स व स्पेसिफिकेशन्स

Xiaomi Redmi 9A 20:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला गेला आहे जो 1600 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.53 इंचाच्या एचडी+ एलसीडी डिस्प्लेला सपोर्ट करतो. रेडमी 9ए एंडरॉयड 10 वर लॉन्च केला गेला आहे जो मीयूआई 12 सह चालतो. तसेच प्रोसेसिंगसाठी या फोन मध्ये 2गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसर सह मीडियाटेक चा 12एनएम टेक्नॉलॉजी वर बनलेला हीलियो जी25 चिपसेट आहे. तसेच ग्राफिक्ससाठी हा फोन पावरवीआर जीई8329 जीपीयू ला सपोर्ट करतो.

इंडियन मार्केट मध्ये हा फोन दोन रॅम वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला गेला आहे. फोनचा बेस वेरिएंट 2 जीबी रॅमला सपोर्ट करतो तर दुसऱ्या वेरिएंट मध्ये 3 जीबी रॅम देण्यात आला आहे. हे दोन्ही मॉडेल 32 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतात जी माइक्रोएसडी कार्डने 512 जीबी पर्यंत वाढवता येते. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता शाओमी रेडमी 9ए एलईडी फ्लॅश सह एफ/2.2 अपर्चर असलेल्या 13 मेगापिक्सलच्या प्राइमरी कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. त्याचप्रमाणे सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी या फोन मध्ये एफ/2.2 अपर्चर असलेला 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

Redmi 9A एक रियल डुअल सिम फोन आहे ज्यात दोन सिम कार्ड आणि एक मेमरी कार्ड एक साथ वापरता येतात. बेसिक कनेक्टिविटी फीचर्सला सपोर्ट करणारा हा फोन 4जी वोएलटीई सह येतो. सिक्योरिटीसाठी शाओमीने रेडमी 9ए स्मार्टफोन मध्ये फेस अनलॉक फीचर दिला तसेच पावर बॅकअपसाठी हा फोन 10वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेल्या 5,000एमएएच च्या बॅटरीला सपोर्ट करतो.

किंमत व सेल

Xiaomi Redmi 9A चा 2 जीबी रॅम + 32 जीबी स्टोरेज वेरिएंट 6,799 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे तसेच फोनच्या 3 जीबी रॅम + 32 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 7,499 रुपये आहे. कंपनीने हा फोन Green, Black आणि Blue कलर मध्ये लॉन्च केला आहे. शाओमी रेडमी 9ए येत्या 4 सप्टेंबर पासून शॉपिंग साइट अमॅझॉन व शाओमी स्टोर्स वर विक्रीसाठी उपलब्ध होईल.

The post फक्त 6,799 रुपयांमध्ये लॉन्च झाला Xiaomi चा 5,000एमएएच बॅटरी असलेला स्वस्त स्मार्टफोन Redmi 9A first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-9a-launched-in-india-know-full-specification-features-price-sale-offer/feed/ 0
मोठी बॅटरी आणि मोठ्या डिस्प्ले सह उद्या लॉन्च होतील Redmi 9A आणि 9C, जाणून घ्या स्पेसिफिकेशन्स https://www.91mobiles.com/marathi/redmi-9a-listed-on-official-site-with-5000mah-battery-launch-soon/ https://www.91mobiles.com/marathi/redmi-9a-listed-on-official-site-with-5000mah-battery-launch-soon/#respond Mon, 29 Jun 2020 10:26:52 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=7570 Redmi 9A मध्ये 6.53-इंचाचा एचडी+ डिस्प्ले वॉटरड्रॉप नॉच सह दिला जाईल.

The post मोठी बॅटरी आणि मोठ्या डिस्प्ले सह उद्या लॉन्च होतील Redmi 9A आणि 9C, जाणून घ्या स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Xiaomi ने या महिन्यात 10 जूनला स्पेन मध्ये आपला नवीन स्मार्टफोन Redmi 9 लॉन्च केला होता. तसेच आता कंपनीने रेडमी 9 सीरीज अंतर्गत Redmi 9C आणि Redmi 9A लॉन्च करण्याची तयारी केली आहे. कंपनी मलेशिया मध्ये 30 जूनला रेडमी 9ए आणि रेडमी 9सी लॉन्च करेल. याची माहिती Xiaomi Malaysia फेसबुक पेजच्या माध्यमातून समोर आली आहे. याच दिवशी शाओमीची प्रतिस्पर्धी कंपनी रियलमी आपला C11 पण लॉन्च करेल.

तसेच अधिकृत लॉन्चच्या आधी कंपनीच्या साइट वर या सीरीजचा Redmi 9A दिसला होता. या सीरीज मध्ये उद्या लॉन्च होणाऱ्या रेडमी 9ए बद्दल बोलले जात आहे कि हा फोन रेडमी 8ए चा सक्सेसर असेल. फिलीपींस मार्केट मध्ये शाओमीच्या कथित कॅटलॉग मध्ये हा स्मार्टफोन दिसला आहे. या कॅटलॉग मध्ये या स्मार्टफोनचे अनेक स्पेसिफिकेशन्स पण समोर आले आहेत.

Big battery, big display! Redmi 9A & 9C is coming to Malaysia on 30th June 2020!#Redmi9A #Redmi9C #BigBatteryBigDisplay #Xiaomi

Xiaomi Malaysia यांनी वर पोस्ट केले रविवार, २८ जून, २०२०

Redmi 9A की स्पेसिफिकेशन्स

Redmi 9A मध्ये 6.53-इंचाचा एचडी+ डिस्प्ले वॉटरड्रॉप नॉच सह दिला जाईल. तसेच नॉच मध्ये 5MP सेल्फी कॅमेरा असेल. तसेच मागे 13MP प्राइमरी लेंस एलईडी फ्लॅश लाइट सह दिली जाईल. बॅटरी पाहता Redmi 9A मध्ये पावर बॅकअपसाठी 5,000mAh ची बॅटरी असेल. Redmi 9A बद्दल बोलले जात आहे कि हा फोन एंडरॉयड 10 बेस्ड एमआईयूआई वर चालेल. तसेच Redmi 9A मध्ये MediaTek Helio G25 प्रोसेसर असेल, जो अजून अधिकृतपणे लॉन्च झालेला नाही.

Xiaomi Redmi 9

स्पेन मध्ये लॉन्च झालेल्या शाओमी रेडमी 9 बद्दल बोलायचे तर हा फोन 19.5:5 आस्पेक्ट रेशियो वर लॉन्च केला गेला आहे जो 2340 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.53 इंचाच्या एफएचडी+ एलसीडी वॉटरड्रॉप नॉच डिस्प्लेला सपोर्ट करतो. फोनची स्क्रीन कोर्निंग गोरिल्ला ग्लास 3 ने प्रोटेक्ट केली गेली आहे. हा फोन एंडरॉयड 10 वर सादर केला गेला आहे जो आक्टा-कोर प्रोसेसर सह 12नॅनोमीटर टेक्नॉलॉजी वर बनलेल्या मीडियाटेक हीलियो जी80 चिपसेट वर चालतो.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Redmi 9 क्चॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह एफ/2.2 अपर्चर असलेला 13 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे. तसेच फोन मध्ये एफ/2.2 अपर्चर असलेली 8 मेगापिक्सलची वाइड अँगल लेंस, एफ/2.4 अपर्चर असलेली 5 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आणि 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आहे. तसेच सेल्फीसाठी शाओमी रेडमी 9 एफ/2.0 अपर्चर असलेल्या 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Xiaomi Redmi 9 डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबतच फोन सिक्योरिटीसाठी फोनच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच पावर बॅकअपसाठी हा डिवाईस Quick Charge 3.0 व 18वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेल्या 5,020एमएएच च्या बॅटरीला सपोर्ट करतो. स्पेन मध्ये फोनचे 3 जीबी रॅम + 32 जीबी स्टोरेज वेरिएंट 139 यूरो तर 4 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज वेरिएंट आले आहेत.

शाओमी रेडमी 9 वीडियो

The post मोठी बॅटरी आणि मोठ्या डिस्प्ले सह उद्या लॉन्च होतील Redmi 9A आणि 9C, जाणून घ्या स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/redmi-9a-listed-on-official-site-with-5000mah-battery-launch-soon/feed/ 0