Xiaomi Redmi K20 Pro - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 24 Jan 2020 13:26:15 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Xiaomi चा मास्टर स्ट्रोक : Redmi K20, Redmi K20 Pro आणि Mi A3 स्मार्टफोनच्या किंमती झाल्या कमी https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-k20-pro-mi-a3-price-cut-in-india-sale-availability/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-k20-pro-mi-a3-price-cut-in-india-sale-availability/#respond Fri, 24 Jan 2020 13:26:15 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6381 Xiaomi Mi A3 चा 6 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वेरिएंट बाजारात 15,999 रुपयांमध्ये उपलब्ध होता पण आता हा वेरिएंट 14,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

The post Xiaomi चा मास्टर स्ट्रोक : Redmi K20, Redmi K20 Pro आणि Mi A3 स्मार्टफोनच्या किंमती झाल्या कमी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Xiaomi बद्दल चर्चा आहे कि कंपनी लवकरच टेक मंचावर आपल्या ‘रेडमी सीरीज’ चा विस्तार करणार आहे आणि या सीरीज अंतर्गत Redmi K30 तसेच Redmi K30 Pro स्मार्टफोन लॉन्च केले जातील. हे फोन इंडियन मार्केट मध्ये कधी येतील हे समजले नाही. पण Redmi K30 सीरीजच्या लॉन्चच्या आधी शाओमीने भारतात आपल्या हिट स्मार्टफोन्स Redmi K20 आणि Redmi K20 Pro च्या किंमती कमी केल्या आहेत. Xiaomi ने रेडमी के20 सीरीज सोबतच Xiaomi Mi A3 स्मार्टफोन्सच्या किंमती पण कमी केल्या आहेत त्यामुळे आता हे फोन कंपनीच्या वेबसाइट सोबतच शॉपिंग साइट्स वर पण कमी किंमतीत सेलसाठी उपलब्ध झाले आहेत.

सर्वात आधी रेडमी के20 सीरीज बद्दल बोलायचे तर कंपनीने Redmi K20 स्मार्टफोनचा 6 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज वेरिएंट 21,999 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला होता, पण आता प्राइस कट नंतर हा स्मार्टफोन वेरिएंट 19,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. त्याचप्रमाणे आतापर्यंत 23,999 रुपयांमध्ये विकला जाणारा Redmi K20 चा 6 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वेरिएंट आता प्राइस कट नंतर 21,999 रुपयांमध्ये सेलसाठी उपलब्ध झाला आहे.

Redmi K20 Pro बद्दल बोलायचे तर फोनचा बेस वेरिएंट 6 जीबी रॅम सह 128 जीबी स्टोरेजला सपोर्ट करतो. हा स्मार्टफोन वेरिएंट कंपनीने 27,999 रुपयांमध्ये लॉन्च केला होता पण आता प्राइस कट नंतर हा 24,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. त्याचप्रमाणे Redmi K20 Pro चा मोठा वेरिएंट 8 जीबी रॅम सह 256 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. हा वेरिएंट 30,999 रुपयांमध्ये लॉन्च झाला होता जो आता 27,999 रुपयांमध्ये सेलसाठी उपलब्ध झाला आहे.

Xiaomi Mi A3 स्मार्टफोनची किंमत पण कपंनीने 1,000 रुपयांनी कमी केली आहे. मी ए3 चा 4 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज वेरिएंट 12,999 रुपयांमध्ये सेलसाठी उपलब्ध होता पण आता प्राइस कट नंतर हा फोन 11,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. त्याचप्रमाणे Xiaomi Mi A3 चा 6 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वेरिएंट बाजारात 15,999 रुपयांमध्ये उपलब्ध होता पण आता हा वेरिएंट 14,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

Xiaomi पुन्हा बनला भारतातील नंबर वन ब्रँड

अलीकडेच समोर आलेल्या IDC च्या रिपोर्टनुसार Xiaomi चा ऑनलाईन मार्केट शेयर 42.09 टक्के होता. सप्टेंबर मध्ये फेस्टिवल सीजन मध्ये इतर ब्रँड्सचा चांगला सेल झाला त्यामुळे शाओमीला आपला मार्केट शेयर गमवावा लागला. सप्टेंबर मध्ये शाओमीचा ऑनलाईन मार्केट शेयर कमी होऊन 38.02 टक्के झाला. पण ऑक्टोबर आणि नोव्हेंबर मध्ये शाओमीने चांगली परफॉर्मंस दिली आणि ऑनलाईन बाजारात Xiaomi ची हिस्सेदारी 43.82 टक्क्यांवरून 47.76 टक्के झाली. ओवरऑल मार्केट शेयर पाहता जुलै मध्ये Xiaomi चा मार्केट शेयर 28.36 टक्के होता जो नोव्हेंबर मध्ये 30.42 टक्के झाला.

The post Xiaomi चा मास्टर स्ट्रोक : Redmi K20, Redmi K20 Pro आणि Mi A3 स्मार्टफोनच्या किंमती झाल्या कमी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-k20-pro-mi-a3-price-cut-in-india-sale-availability/feed/ 0
Redmi K30 चे काम सुरु, 5G सपोर्ट सह होईल लॉन्च : Lu Weibing https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-lu-weibing-redmi-k30-is-on-the-road-with-5g-support/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-lu-weibing-redmi-k30-is-on-the-road-with-5g-support/#respond Mon, 09 Sep 2019 12:18:17 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5259 Redmi K30 20,000 रुपयांपेक्षा जास्तीच्या बजेट मध्ये लॉन्च केला जाईल

The post Redmi K30 चे काम सुरु, 5G सपोर्ट सह होईल लॉन्च : Lu Weibing first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Xiaomi ने जुलै मध्ये भारतात आपली Redmi सीरीज वाढवत दोन नवीन स्मार्टफोन Redmi K20 Pro आणि Redmi K20 लॉन्च केले होते. हे दोन्ही स्मार्टफोन Redmi सीरीजचे पहिले पॉप-अप सेल्फी कॅमेरा असलेले स्मार्टफोन आहेत. दमदार स्पेसिफिकेशन्स असलेले हे स्मार्टफोन्स भारतीय यूजर्सने खूप आवडले. Redmi K20 मॉडेल्सचे यश Xiaomi आता अजून वाढवू पाहत आहे. कंपनीने अधिकृतपणे घोषणा केली आहे कि शाओमी रेडमी के सीरीजच्या आगामी स्मार्टफोन Redmi K30 वर काम सुरु केले आहे आणि हा 5G सपोर्ट सह बाजारात येईल.

Redmi K30 संबंधित हि महत्वाची माहिती स्वतः रेडमीचे जनरल मॅनेजर Lu Weibing यांनी दिली आहे. वेइबिंग ने माइक्रोब्लागिंग साइट वेईबो वर एक पोस्ट करत लिहिले आहे कि, “5G has arrived. Don’t worry, Redmi K30 is already on the road”. या पोस्टच्या माध्यमातून रेडमी जीएम ने म्हणले आहेत कि 5G आला आहे आणि Redmi K30 पण येत आहे. आपल्या पोस्ट मध्ये वेइबिंग ने स्पष्ट केले आहे कि कंपनीने Redmi K30 ची निर्मती सुरु केली आहे आणि लवकरच हा फोन टेक मंचावर सादर केला जाईल.

फोन मध्ये असेल 5G सपोर्ट

एकीकडे Weibing ने Redmi K30 बद्दल सांगतिले आहे तर दुसरीकडे आपल्या पोस्ट द्वारे रेडमी जीएम ने हे पण स्पष्ट केले आहे कि रेडमी के सीरीजचा हा आगामी स्मार्टफोन Redmi K30 5G सपोर्ट सह लॉन्च केला जाईल. विशेष म्हणजे क्वालकॉम ने नुकतेच आपल्या स्नॅपड्रॅगॉन 700 सीरीजच्या चिपसेट मध्ये 5G सपोर्ट देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे असे बोलले जात आहे कि Redmi K30 क्वालकॉमच्या याच चिपसेट सह लॉन्च केला जाईल.

अशी असू शकते किंमत

किंमतीबद्दल बोलायचे तर Redmi K30 ची किंमत 20,000 रुपयांपेक्षा जास्त असेल. वेइबिंगच्या एका पोस्ट वर एका यूजरने Redmi K30 ची अंदाजे किंमत 2000 युआन म्हणजे जवळपास 20,000 रुपये आहे का असे विचारले होते त्याचे उत्तर देताना रेडमी जीएम म्हणाले होते कि 5G चिपसेट अजूनही महागच आहे. म्हणजे Redmi K30 20,000 रुपयांपेक्षा जास्तीच्या बजेट मध्ये लॉन्च केला जाईल. विशेष म्हणजे इंडियन स्मार्टफोन मार्केट मध्ये Redmi K20 Pro आणि Redmi K20 पण जास्त किंमतीत आल्यामुळे लोकांनी नाराजी दर्शवली होती.

इंडियन मार्केट मध्ये रेडमी के20 सीरीजचे दोन्ही मॉडेल 2 वेरिएंट मध्ये सेल साठी उपलब्ध आहेत. Redmi K20 Pro पाहता हा फोन 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज वेरिएंट 27,999 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला होता तसेच फोनचा 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज वेरिएंट 30,999 रुपयांमध्ये बाजारात आला होता. तर Redmi K20 चा 6GB रॅम आणि 64GB स्टोरेज वेरिएंट 21,999 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला होता तर 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज वाले वेरिएंटने 23,999 रुपयांमध्ये बाजारात एंट्री घेतली होती.

शाओमी रेडमी के20 प्रो वीडियो

The post Redmi K30 चे काम सुरु, 5G सपोर्ट सह होईल लॉन्च : Lu Weibing first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-lu-weibing-redmi-k30-is-on-the-road-with-5g-support/feed/ 0