Redmi K30 चे काम सुरु, 5G सपोर्ट सह होईल लॉन्च : Lu Weibing

Xiaomi ने जुलै मध्ये भारतात आपली Redmi सीरीज वाढवत दोन नवीन स्मार्टफोन Redmi K20 Pro आणि Redmi K20 लॉन्च केले होते. हे दोन्ही स्मार्टफोन Redmi सीरीजचे पहिले पॉप-अप सेल्फी कॅमेरा असलेले स्मार्टफोन आहेत. दमदार स्पेसिफिकेशन्स असलेले हे स्मार्टफोन्स भारतीय यूजर्सने खूप आवडले. Redmi K20 मॉडेल्सचे यश Xiaomi आता अजून वाढवू पाहत आहे. कंपनीने अधिकृतपणे घोषणा केली आहे कि शाओमी रेडमी के सीरीजच्या आगामी स्मार्टफोन Redmi K30 वर काम सुरु केले आहे आणि हा 5G सपोर्ट सह बाजारात येईल.

Redmi K30 संबंधित हि महत्वाची माहिती स्वतः रेडमीचे जनरल मॅनेजर Lu Weibing यांनी दिली आहे. वेइबिंग ने माइक्रोब्लागिंग साइट वेईबो वर एक पोस्ट करत लिहिले आहे कि, “5G has arrived. Don’t worry, Redmi K30 is already on the road”. या पोस्टच्या माध्यमातून रेडमी जीएम ने म्हणले आहेत कि 5G आला आहे आणि Redmi K30 पण येत आहे. आपल्या पोस्ट मध्ये वेइबिंग ने स्पष्ट केले आहे कि कंपनीने Redmi K30 ची निर्मती सुरु केली आहे आणि लवकरच हा फोन टेक मंचावर सादर केला जाईल.

फोन मध्ये असेल 5G सपोर्ट

एकीकडे Weibing ने Redmi K30 बद्दल सांगतिले आहे तर दुसरीकडे आपल्या पोस्ट द्वारे रेडमी जीएम ने हे पण स्पष्ट केले आहे कि रेडमी के सीरीजचा हा आगामी स्मार्टफोन Redmi K30 5G सपोर्ट सह लॉन्च केला जाईल. विशेष म्हणजे क्वालकॉम ने नुकतेच आपल्या स्नॅपड्रॅगॉन 700 सीरीजच्या चिपसेट मध्ये 5G सपोर्ट देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे असे बोलले जात आहे कि Redmi K30 क्वालकॉमच्या याच चिपसेट सह लॉन्च केला जाईल.

अशी असू शकते किंमत

किंमतीबद्दल बोलायचे तर Redmi K30 ची किंमत 20,000 रुपयांपेक्षा जास्त असेल. वेइबिंगच्या एका पोस्ट वर एका यूजरने Redmi K30 ची अंदाजे किंमत 2000 युआन म्हणजे जवळपास 20,000 रुपये आहे का असे विचारले होते त्याचे उत्तर देताना रेडमी जीएम म्हणाले होते कि 5G चिपसेट अजूनही महागच आहे. म्हणजे Redmi K30 20,000 रुपयांपेक्षा जास्तीच्या बजेट मध्ये लॉन्च केला जाईल. विशेष म्हणजे इंडियन स्मार्टफोन मार्केट मध्ये Redmi K20 Pro आणि Redmi K20 पण जास्त किंमतीत आल्यामुळे लोकांनी नाराजी दर्शवली होती.

इंडियन मार्केट मध्ये रेडमी के20 सीरीजचे दोन्ही मॉडेल 2 वेरिएंट मध्ये सेल साठी उपलब्ध आहेत. Redmi K20 Pro पाहता हा फोन 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज वेरिएंट 27,999 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला होता तसेच फोनचा 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज वेरिएंट 30,999 रुपयांमध्ये बाजारात आला होता. तर Redmi K20 चा 6GB रॅम आणि 64GB स्टोरेज वेरिएंट 21,999 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला होता तर 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज वाले वेरिएंटने 23,999 रुपयांमध्ये बाजारात एंट्री घेतली होती.

शाओमी रेडमी के20 प्रो वीडियो

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here