Xioami Mi 10i 5G - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Mon, 04 Jan 2021 12:43:14 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Xiaomi Mi 10i 5G उद्या होईल भारतात लॉन्च, जाणून कशाप्रकारे बघता येईल लाईव आणि कसे असतील स्पेसिफिकेशन्स https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-10i-5g-india-launch-how-to-watch-live-know-specs-feature-price-sale/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-10i-5g-india-launch-how-to-watch-live-know-specs-feature-price-sale/#respond Mon, 04 Jan 2021 12:43:14 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9521 Xiaomi Mi 10i कंपनी ऑनलाईन पद्धतीने लॉन्च करणार आहे. हा ईवेंट उद्या म्हणजे 5 जानेवारीला दुपारी 12 वाजता सुरु होईल.

The post Xiaomi Mi 10i 5G उद्या होईल भारतात लॉन्च, जाणून कशाप्रकारे बघता येईल लाईव आणि कसे असतील स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Xiaomi उद्या भारतीय बाजारात आपला प्रोडक्ट पोर्टफोलियो वाढवत नवीन स्मार्टफोन Mi 10i लॉन्च करणार आहे. ‘मी सीरीज’ कंपनीने सप्टेंबर मध्ये टेक मंचावर सादर केली होती ज्यात Xiaomi Mi 10T, Xiaomi Mi 10T Pro आणि Xiaomi Mi 10T Lite लॉन्च झाले होते. शाओमी मी 10आय सह कंपनी भारतात पण हि सीरीज वाढवत आहे. फोन लॉन्चच्या आधीच शाओमीने Mi 10i च्या अनेक महत्वाच्या स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्सची माहिती दिली आहे, त्यावरून वाटत आहे कि शाओमी मी 10आय एक पावरफुल फोन असेल.

सर्वप्रथम तुम्हाला सांगू इच्छितो कि Xiaomi Mi 10i कंपनी ऑनलाईन पद्धतीने लॉन्च करणार आहे. हा ईवेंट उद्या म्हणजे 5 जानेवारीला दुपारी 12 वाजता सुरु होईल. या लॉन्च ईवेंटचे थेट प्रक्षेपण केले जाईल जे शाओमी इंडियाच्या अधिकृत वेबसाइट सोबतच कंपनीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर बघता येईल. शॉपिंग साइट अमेझॉन वर पण शाओमी मी 10आय चे प्रोडक्ट पेज बनवण्यात आले आहे आणि शाओमी फॅन्स या पेज वर पण लॉन्च ईवेंट लाईव बघू शकतात.

Xiaomi Mi 10i

शाओमी मी 10आय ची माहिती पाहता कंपनीने फोनच्या रियर पॅनलचे फोटोज इंटरनेट वर शेयर केले आहेत पण आतापर्यंत फोनचा फ्रंट पॅनल दाखवण्यात आला नाही. त्यामुळे फोन डिस्प्ले बद्दल काही ठोस माहिती मिळाली नाही पण लेटेस्ट ट्रेंड आणि बजेट सेग्मेंट पाहता आशा व्यक्त केली जात आहे कि हा फोन पंच-होल डिस्प्ले वर लॉन्च केला जाईल जो फुलएचडी+ रेज्ल्यूशन सह येऊ शकतो. हा फोन Atlantic blue आणि Pacific Sunrise रंगात समोर आला आहे.

हे देखील वाचा : 7 जानेवारीला लॉन्च होईल 64 मेगापिक्सल कॅमेरा असलेला पावरफुल स्मार्टफोन Realme V15

मी 10आय च्या बॅक पॅनल वर क्वॉड रियर कॅमेरा देण्यात आला आहे जो पॅनलच्या मध्यवरील रिंग मध्ये आहे. या सेटअप मध्ये दोन सेंसर वर आणि दोन सेंसर खाली आहेत. तसेच सेटअपच्या बाहेर डावीकडे फ्लॅश लाईट देण्यात आली आहे. फोनच्या बॅक पॅनल वरून फिंगरप्रिंट सेंसर गायब आहे तसेच खालच्या बाजूला Mi लोगो आणि 5G लिहिण्यात आले आहे. फोनच्या उजव्या पॅनल वर वॉल्यूम रॉकर आणि फिंगरप्रिंट सेंसर इम्बेडेड पावर बटन देण्यात आला आहे.

Xiaomi Mi 10i बद्दल कंपनीने सांगितले आहे कि हा स्मार्टफोन क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 750जी चिपसेट वर लॉन्च केला जाईल जो र्कोटेक्स ए-77 सीपीयू वर चालतो. हा चिपसेट 5जी कनेक्टिविटी सह येतो, म्हणजे शाओमी मी 10आय एक 5जी फोन असेल. शाओमीने याची अधिकृत घोषणा केली आहे कि मी 10आय 108 मेगापिक्सलच्या कॅमेरा सेंसरला सपोर्ट करेल. Xiaomi Mi 10i च्या इतर सर्व स्पेसिफिकेशन्स आणि किंमतीची माहिती उद्या फोन लॉच झाल्यानंतर त्वरित दिली जाईल.

The post Xiaomi Mi 10i 5G उद्या होईल भारतात लॉन्च, जाणून कशाप्रकारे बघता येईल लाईव आणि कसे असतील स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-10i-5g-india-launch-how-to-watch-live-know-specs-feature-price-sale/feed/ 0