Categories: बातम्या

मोबाईल नंबर पोर्टेबिलिटी झाली स्वस्त, आता द्यावे लागतील 6 रुपयांपेक्षा कमी पैसे

मोबाईल यूजर्स साठी टेलीकॉम रेगुलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया (TRAI) ने साल 2011 मध्ये मोबाईल नंबर पोर्टेबिलिटी (एमएनपी) ची सुरवात केली होती. तेव्हा यूजर्सना एक नेटवर्क वरून दुसऱ्या नेटवर्क मध्ये जाण्यासाठी 19 रुपये दयावे लागत होते. पण आता ते कमी करण्यात आले आहेत.

जरी याचा सब्सक्राइबर्सना काही खास फायदा होणार नसला तरी देशातील टेलीकॉम ऑपरेटर्स साठी हि चांगली बातमी आहे. ट्राई ने आता मोबाईल नंबर पोर्टेबिलिटीची नवीन किंमत 5.74 रुपये ठरवली आहे.

इकनॉमिक टाइम्स कडे बोलताना ट्राई चे चेयरमेन आर.एस. शर्मा यांनी सांगितले कि मोबाईल नंबर पोर्टेबिलिटीची नवीन किंमत 30 सप्टेंबर पासून लागू केली जाईल. यामुळे जिथे आधी 19 रुपये द्यावे लागत होते तेथे आता 5.74 रुपये द्यावे लागतील.

या नवीन किंमतीचा फायदा टेलिकॉम ऑपरेटर्सना होईल. प्रत्येक मोबाईल नंबर पोर्टेबिलिटी ट्रँजॅक्शन साठी ऑपरेटर्सने पैसे द्यावे लागतात. आता नंबर पोर्ट करणाऱ्या यूजर्समागे टेलीकॉम ऑपरेटर्सना प्रत्येक नवीन ग्राहकासाठी 5.74 रुपये दयावे लागतील.

नोट: मोबाईल नंबर पोर्ट करण्यासाठी यूजर्सना कोणतीही किंमत द्यावी लागत नाही.

Published by
Siddhesh Jadhav