Categories: बातम्या

Vi नं 129 आणि 298 रुपयांच्या दोन स्वस्त प्लॅनमध्ये केले बदल; पूर्वीपेक्षा जास्त मिळतील बेनिफिट्स

Highlights
  • Vi ने आपले दोन प्रीपेड रिचार्ज प्लॅन्स रिवाइज केले आहेत.
  • रिवाइज केलेल्या प्लॅन्समध्ये Rs 129 आणि Rs 298 चा समावेश आहे.
  • रिवाइज केल्यानंतर आता विआय युजर्सना आधीपेक्षा जास्त बेनिफिट्स मिळत आहेत.

Vi नं आपल्या ग्राहकांना खुश करत दोन रिचार्ज प्लॅन जास्त बेनिफिट्ससह रिवाइज केले आहेत. कंपनीनं अनुक्रमे 129 रुपये आणि 298 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये बदल केले आहेत. हा अपडेट कंपनीनं 181 रुपयांचा एक नवीन प्रीपेड प्लॅन लाँच केल्यानंतर काही दिवसांनी केला आहे. पुढे आम्ही तुम्हाला माहिती या प्लॅनमधील बदलांची सविस्तर माहिती दिली आहे.

Vi च्या 129 रुपयांच्या प्लॅनची माहिती

  • 4 दिवस जास्त वैधता
  • आधी 14 दिवसांचा होता प्लॅन

इंटरनेट वापरण्यासाठी या विआय प्लॅनमध्ये आता जास्त डेटा मिळतो. तसेच, 129 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये 18 दिवसांच्या वैधतेसह अनलिमिटेड कॉलिंग आणि 200MB डेटा दिला जात आहे. याआधी प्लॅनमध्ये फक्त 14 दिवसांची वैधता दिली जात होती. परंतु यात फ्री एसएमएसचा फायदा मिळत नाही. ग्राहकांना लोकल SMS साठी 1 रुपये, एसटीडी एसएमएससाठी 1.5 रुपये आणि आयएसडी मेसेजसाठी 5 रुपये मोजावे लागतील. हा रिचार्ज प्लॅन त्या लोकांसाठी बेस्ट आहे जे कॉलिंगसाठी फोनचा जास्त वापर करतात.

Vi च्या 298 रुपयांच्या प्लॅनची माहिती

  • अ‍ॅप्सचा मिळेल अ‍ॅक्सेस

Vi नं 298 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये बदल केले आहेत, ज्यामुळे आता तुम्हाला विआय मुव्हीज आणि टीव्ही, प्रीमियम मुव्हीज, ओरिजिनल, न्यूज आणि लाइव्ह टीव्हीच्या मोफत अ‍ॅक्सेससह 50GB 4G डेटा मिळतो. Vi Rs 298 प्रीपेड प्लॅन 28 दिवसांची वैधता देखील देतो. प्लॅनमध्ये आधी या अ‍ॅप्सचा अ‍ॅक्सेस मिळत नव्हता.

तसेच कंपनीनं अलीकडेच नवीन 181 रुपयांचा प्रीपेड प्लॅन देखील लाँच केला होता जो 30 दिवसांच्या वैधतेसह 30GB डेटा देतो. हा प्रीपेड प्लॅन प्रति दिन 1GB डेटा ऑफर करतो. यात फ्री कॉलिंगचा लाभ मिळत नाही कारण हा एक बूस्टर पॅक आहे, त्यामुळे तुम्ही जुन्या प्रीपेड प्लॅनसह याचा वापर करू शकता.

Published by
Siddhesh Jadhav