Categories: बातम्या

Vivo X100 Ultra आणि X100s चा अधिकृत पोस्टर आला समोर, लवकर होऊ शकते लाँचिंग

विवोच्या एक्स 100 सीरिजचा विस्तार करण्याबाबत नवीन अपडेट समोर येत आहे. यानुसार Vivo X100 Ultra आणि Vivo X100s मोबाईल होम मार्केट चीनमध्ये लवकर एंट्री घेऊ शकतो. तसेच, लाँचच्या आधी दोन्ही डिव्हाईसचे नवीन टिझर पोस्टर चीनच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आले आहे. ज्यात डिझाईन आणि कलर दिसत आहे. चला, पुढे माहिती जाणून घेऊया.

Vivo X100 Ultra आणि Vivo X100s टिझर पोस्टर (लीक)

  • तुम्ही खाली दिलेल्या पोस्टर मध्ये पाहू शकता की यात Vivo X100 Ultra आणि Vivo X100s मॉडेलला दाखविण्यात आले आहे.
  • रिपोर्टनुसार डाव्या बाजूला असलेला मोबाईल Vivo X100 Ultra आहे. तर उजव्या बाजूला Vivo X100s आहे.
  • दोन्ही फोनच्या बॅक पॅनलवर एक मोठा सर्कुलर कॅमेरा माड्यूल दिसतो, ज्यात मध्ये Zeiss ब्रँडिंग पाहायला मिळत आहे.
  • सांगण्यात आले आहे की या कॅमेरा माड्यूल मध्ये युजर्सना ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळेल.
  • कलर ऑप्शन पाहता अल्ट्रा मॉडेल ग्रे आणि एस मॉडेल ग्रीन कलरमध्ये शेअर करण्यात आला आहे.
  • आशा आहे की हे अधिकृत दिसणारे पोस्टर आल्यानंतर लवकर ब्रँडकडून कोणतीही घोषणा केली जाऊ शकते.

Vivo X100s चे स्पेसिफिकेशन (संभाव्य)

  • डिस्प्ले: Vivo X100s ची डिस्प्ले साईजची माहिती मिळाली नाही, परंतु यात फ्लॅट OLED डिस्प्ले मिळण्याची शक्यता आहे. यावर फुल HD+ रिजॉल्यूशन दिला जाऊ शकतो.
  • प्रोसेसर: लिस्टिंग आणि इतर लीकनुसार Vivo X100s स्मार्टफोनमध्ये MediaTek Dimenity 9300+ चिपसेट लावला जाऊ शकतो.
  • कॅमेरा: रिपोर्ट्सनुसार विवो एक्स 100 एस मध्ये पूर्व मॉडेल एक्स 100 सारखा कॅमेरा मिळू शकतो. म्हणजे हा OIS सह 50 मेगापिक्सलचा प्रायमरी, 50 मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाईड आणि 3x ऑप्टिकल झूम असलेला OIS सक्षम 64-मेगापिक्सलचा पेरिस्कोप टेलीफोटो कॅमेऱ्याला सपोर्ट करू शकतो.
  • बॅटरी: Vivo X100s फोनमध्ये 5000mAh बॅटरी आणि 100W वायर्ड फास्ट चार्जिंग दिली जाऊ शकते.

Vivo X100 Ultra चे स्पेसिफिकेशन (संभाव्य)

  • डिस्प्ले: विवो एक्स 100 अल्ट्रा मोबाईलमध्ये 6.78 इंचाचा अ‍ॅमोलेड E7 2K रिजॉल्यूशन डिस्प्ले दिला जाऊ शकतो. यावर 120Hz रिफ्रेश रेट सादर केली जाऊ शकते.
  • चिपसेट: या नवीन आणि जबरदस्त मॉडेलमध्ये ब्रँड स्नॅपड्रॅगन 8 जेन 3 चिपसेट लावू शकतो.
  • कॅमेरा: Vivo X100 Ultra मध्ये OIS सह 50 मेगापिक्सलचा LYT-900 प्रायमरी, 50 मेगापिक्सलचा अल्ट्रावाईड आणि 200 मेगापिक्सलचा पेरिस्कोप, 4.3x ऑप्टिकल झूम लेन्स मिळू शकतो. तसेच, सेल्फीसाठी 32MP ची लेन्स दिली जाऊ शकते.
  • बॅटरी: Vivo X100 Ultra मध्ये 80W वायर्ड चार्जिंगची सुविधा असण्याची शक्यता आहे.
Published by
Kamal Kant