Categories: बातम्या

वोडाफोन 569 रुपयांमध्ये देत आहे 84 दिवसांसाठी 252जीबी डाटा सह अनलिमिटेड वॉयस कॉल फ्री, जियो-एयरटेल ला मिळणार टक्कर

भारतातील सर्वात मोठी टेलीकॉम कंपनी एयरटेल ने कालच 168 दिवस वॅलिडिटी वाला नवीन प्लान सादर केला आहे जो 10 जीबी डाटा सह अनलिमिटेड कॉलिंग ची सुविधा देतो. टेलीकॉम जगातील स्पर्धेत पुढे येत आता वोडाफोन ने पण दोन शानदार प्लान सादर करत आपले पारडे जड केले आहे. वोडाफोन ने रिलायंस जियो आणि एयरटेल ला टक्कर देत 569 रुपये आणि 511 रुपयांचे दोन प्लान सादर केले आहेत जे जास्त वैधते साठी चांगले बेनिफिट देत आहेत.

वोडाफोन 569 रुपयांचा प्लान
वोडाफोन ने सादर केलेला हा प्लान 84 दिवसांच्या वॅलिडिटी सह येतो. या प्लान अंतर्गत वोडाफोन आपल्या यूजर्सना रोज 3जीबी 4जी डाटा देत आहे. 84 दिवस 3जीबी डाटा या हिशोबाने प्लान च्या पूर्ण अवधी मध्ये यूजर्सना एकूण 252 जीबी डाटा मिळेल. रोज 3जीबी 4जी डाटा सह वोडाफोन या प्लान मध्ये यूजर्स लोकल व एसटीडी नंबर वर अनलिमिटेड कॉलिंग ची सुविधा पण देत आहे. सोबतच 84 दिवसांसाठी रोज 100एसएमएस पण मिळतील.

वोडाफोन 511 रुपयांचा प्लान
वोडाफोन ने आपला हा प्लान पण 84 दिवसांच्या वॅलिडिटी सह सादर केला आहे. वोडाफोन यूजर्सना या प्लान अंतर्गत रोज 2जीबी 4जी डाटा मिळेल. रोज 2जीबी डाटा या हिशोबाने ग्राहकांना संपूर्ण वॅलिडिटी साठी एकूण 168जीबी 4जी डाटा मिळेल. रोज 2जीबी 4जी डाटा सह वोडाफोन या प्लान मध्ये यूजर्सना रोज 100एसएमएस आणि लोकल व एसटीडी नंबर वर अनलिमिटेड कॉलिंग ची सुविधा पण देत आहे.

पण वोडाफोन चे हे दोन्ही प्लान अजूनतरी संपूर्ण देशात लागू करण्यात आले नाहीत. कंपनी ने हे दोन्ही प्लान्स निवडक सर्कल्स मध्ये जाहीर केले आहेत. तुमच्या सर्कल मध्ये या प्लान्स ची उपलब्धता वोडाफोन अॅप मधून बघता येईल.

Published by
Siddhesh Jadhav