Categories: बातम्या

वोडाफोन देत आहे त्याच किंमतीत दुप्पट 4जी डाटा, अपडेट केले प्लान्स, मिळेल 4,498 रुपयांपर्यंतचा फायदा

टेलीकॉम बाजारातून सतत बातम्या येत आहेत की कंपन्या आपले प्लान्स अपडेट करत आहे. रिलायंस जियो, एयरटेल भारती आणि भारत संचार निगम लिमिटेड ने आपल्या जुन्या प्लान्स मध्ये बदल करून त्यांना अपडेट केले आहे ज्यामुळे त्याच किंमतीत जास्त फायदा मिळत आहे. या रेस मध्ये उशिरा का होईना पण पूर्ण तयारी सह वोडाफोन ने पण एंट्री घेतली आहे. वोडाफोन जुन्या प्लान्स मध्ये दुप्पट इंटरनेट डाटा सह अनलिमिटेड कॉलिंग आणि अमेजॉन प्राइम सारखे फायदे देत आहे.

वोडाफोन ने आपल्या पोस्टपेड रेड प्लान्स मध्ये बदल केले आहेत. कंपनी च्या 399 रुपयांच्या रेड प्लान मध्ये आधी यूजर्सना एक महिन्यासाठी एकूण 20जीबी 4जी डाटा दिला जात होता, त्याजागी आता त्याच किंमतीत ग्राहकांना 40जीबी 4जी डाटा मिळेल. हा इंटरनेट डाटा रोलओवर होत राहील. म्हणजे जर यूजर एका महिन्यात 40जीबी डाटा यूज करू शकला नाही तर उरलेला डाटा आपोआप पुढील महिन्याच्या 40जीबी डाटा मध्ये जोडला जाईल.

त्याचप्रमाणे वोडाफोन च्या 499 रुपयांच्या प्लान मध्ये आधी एक महिन्यासाठी 40जीबी 4जी डाटा मिळत होता पण अपडेट नंतर कंपनी आपल्या या प्लान मध्ये आता 75जीबी इंटरनेट डाटा देत आहे. हा डाटा पण रोलओवर होईल तसेच नवीन बिलिंग सायकल मध्ये जोडला जाईल. पण या दोन्ही प्लान्स मध्ये रोलओवर होणार्‍या डाटा ची अधिकतम लिमिट 200जीबी इतकीच आहे. म्हणजे उरलेला डाटा 200जीबी पर्यंतच जोडला जाईल.

भरपूर इंटरनेट डाटा सह वोडाफोन च्या या प्लान्स मध्ये संपूर्ण देशात अनलिमिटेड वॉयस कॉल पूर्णपणे फ्री मिळत आहेत. वोडाफोन 399 रुपयांच्या रेड प्लान मध्ये 1,498 रुपयांचे तसेच 499 रुपयांच्या प्लान मध्ये 4,498 रुपयांपर्यंतचे बेनिफिट देत आहे. यात 999 रूपयांच्या 1 वर्षाच्या फ्री अमेजन प्राइम मेंबरशिप आणि 499 रुपयांच्या वोडाफोन प्ले च्या फ्री सर्विसचा समावेश आहे. यात शॉपिग कूपन्स सोबत 499 रेड प्लान मध्ये 3,000 रुपयांचे डिवाइस प्रोटेक्शन पण मिळत आहे.

Published by
Siddhesh Jadhav