Categories: बातम्या

वोडाफोनचा धमाका : 279 रुपयांमध्ये मिळेल 84 दिवस अनलिमिटेड कॉल आणि मिळेल 4जी इंटरनेट डेटा

वोडाफोन ने नुकतेच आपल्या यूजर्स साठी 99 रुपये तसेच 109 रुपयांचे दोन प्लान सादर केले आहेत. हे दोन्ही प्लान वॉयस प्लान म्हणून सादर करण्यात आले आहेत जे 28 दिवस ग्राहकांना बेनिफिट देतात. तसेच आता वोडाफोन ने अजून एक नवीन प्लान सादर केला आहे जो जास्त वैधते साठी फायदे देतो. या टेलीकॉम कंपनी ने 279 रुपयांचा नवीन प्लान सादर केला आहे जो 84 दिवस अनलिमिटेड कॉलिंग आणि इंटरनेट डेटाची सुविधा देतो.

वोडाफोन ने आणलेला 279 रु[रुपयांचा हा प्लान प्रीपेड ग्राहकांसाठी सादर करण्यात आला आहे जो 84 दिवसांच्या वैधते सह येतो. वोडाफोन ने हा प्लान वॉयस पॅक महान सादर केला आहे जो अनलिमिटेड वॉयस कॉलिंग सह येतो. वोडाफोन च्या या प्लान मध्ये 84 दिवसांसाठी अनलिमिटेड वॉयस कॉल मिळत आहेत ज्यांचा वापर लोकल व एसटीडी नंबर सोबत नॅशनल रोमिंग मध्ये पण केला जाऊ शकतो.

पण हे अनलिमिटेड वॉयस कॉल एफयूपी लिमिट सह मिळतील. म्हणजे यूजर्स एका दिवसात जास्तीत जास्त 250 मिनिटे बोलू शकतात. एफयूपी लिमिट अंतर्गत यूजर एका आठवड्यात जास्तीत जास्त 1000 मिनिटे बोलू शकतो. या वॉयस कॉलचा वापर संपूर्ण महिन्यात 100 वेगवेगळ्या नंबर्स वर करता येईल. विशेष म्हणजे 300 रुपयांपेक्षा कमी किंमतीती वोडाफोन व्यतिरिक्त कोणतीही कंपनी 84 दिवसांसाठी वॉयस कॉल देत नाही.

इंटरनेट डेटा पाहता या प्लान मध्ये वोडाफोन 84 दिवसांसाठी 4जीबी इंटरनेट डेटा देत आहे जो 4जी सोबतच 3जी स्पीड वर पण चालेल. वोडाफोन ने आपला हा प्लान सध्या काही निवडक सर्कल्स मध्ये लॉन्च केला आहे जो येत्या काही दिवसांत संपूर्ण देशात उपलब्ध होईल. जाता जाता वोडाफोन च्या 109 रुपयांच्या प्लान बद्दल पण सांगतो, यात तुम्हाला 28 दिवसांसाठी अनलिमिटेड वॉयस कॉलिंगची सुविधा मिळेल तसेच कंपनी संपूर्ण महिन्यासाठी 1जीबी 4जी इंटरनेट डेटा देत आहे.

Published by
Siddhesh Jadhav