Vivo Y22 स्मार्टफोन साल 2022 मध्ये भारतात लाँच झाला होता ज्यात 50MP Camera आणि 5,000mAh Battery सारखे स्पेसिफिकेशन्स होते. ह्या फोनचे दोन मेमरी व्हेरिएंट्स बाजारात आले होते ज्यात 4जीबी रॅम आणि 6जीबी रॅमचा समावेश आहे. आता कंपनीनं फोनच्या मोठ्या मॉडेलच्या किंमतीत कपात केली आहे आणि आजपासून हा व्हेरिएंट कमी किंमतीत विकत घेता येईल.
Vivo Y22 ची किंमत
- नवीन किंमत = ₹15,499
- जुनी किंमत = ₹16,499
- प्राइस कट = ₹1,000
विवो वाय22 स्मार्टफोनचा 6GB RAM + 12GB Storage व्हेरिएंट कंपनीनं 16,499 रुपयांमध्ये लाँच केला होता. आता ह्या मॉडेलवर 1,000 रुपयांचा प्राइस कट जारी करण्यात आला आहे ज्यामुळे 6जीबी+128जीबी व्हेरिएंटची किंमत कमी होऊन 15,499 रुपये झाली आहे. हा नवीन किंमत आज 11 जुलैपासूनच लागू झाली आहे तसेच Vivo Y22 नवीन रेटसह ऑनलाइन व ऑफलाइन मार्केटमधून विकत घेता येईल.
Vivo Y22 स्पेसिफिकेशन्स
- 6.55″ 90Hz Display
- 6GB RAM + 128GB Storage
- MediaTek Helio G70
- 50MP Dual Rear Camera
- 18W 5,000mAh Battery
- स्क्रीन : विवो वाय22 स्मार्टफोन 1612 × 720 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.55 इंचाच्या एचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. फोनची स्क्रीन एलसीडी पॅनलवर बनली आहे जी 90हर्ट्झ रिफ्रेश रेटवर चालते. Vivo Y22 चे डायमेंशन 164.3 x 76.1 x 8.38एमएम आणि वजन 180ग्राम आहे.
- प्रोसेसर : Vivo Y22 अँड्रॉइड 11 सह लाँच झाला आहे जो फनटचओएस 12 सह चालतो. प्रोसेसिंगसाठी ह्या स्मार्टफोनमध्ये ऑक्टाकोर प्रोसेसरसह मीडियाटेक हीलियो एमटी6769 चिपसेट देण्यात आला आहे. हा विवो मोबाइल एक्सटेंडेड रॅम टेक्नॉलॉजीसह येतो ज्यात रॅम 2 जीबी एक्स्ट्रा वाढवता येईल.
- कॅमेरा : फोटोग्राफीसाठी हा स्मार्टफोन ड्युअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जो 2 मेगापिक्सलच्या मॅक्रो लेन्ससह चालतो. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी Vivo Y22 मोबाइल 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.
- बॅटरी : पावर बॅकअपसाठी विवो वाय22 4जी फोनमध्ये 5,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. ही मोठी बॅटरी वेगानं चार्ज करण्यासाठी कंपनीनं आपला मोबाइल 18वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह सादर केला आहे.
- अन्य फीचर्स : हा IPX4/X5 rated फोन आहे ज्यामुळे काही प्रमाणात पाण्यापासून सुरक्षित राहतो. Vivo Y22 ड्युअल सिम फोन आहे जो 4जी एलटीईला सपोर्ट करतो. सिक्योरिटीसाठी फोनच्या साइड पॅनलवर फिंगरप्रिंट सेन्सर इम्बेडेड पावर बटन आहे तसेच ह्यात फेस अनलॉक फीचर देखील आहे.
