Honor येत्या काही आठवड्यांमध्ये आपली X7C सीरीज लाँच करू शकते. यासोबत Honor X7c 4G आणि 5G मॉडेल्स येण्याची अपेक्षा आहे. या मोबाईलने याच्या आधीच काही सर्टिफिकेशन साईट्सवर आपली उपस्थिती नोंदवली आहे. तथापि, ब्रँडने अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी केलेली नाही, परंतु 91मोबाईल्स ला डिव्हाईसच्या 4G पर्यायाची वैशिष्ट्ये, रंग पर्याय आणि डिझाईन बद्दलची माहिती मिळाली आहे. चला, पुढे त्याचे तपशील जाणून घेऊया.
Honor X7c 4G चे रंग, डिझाईन आणि लाँच टाईमलाईन (अपेक्षित)
- आमच्याकडे उद्योग जगतातील सूत्रांकडून Honor X7c 4G च्या जागतिक मॉडेलबद्दलची माहिती समोर आली आहे.
- Honor X7c 4G तीन रंगांच्या पर्यायांमध्ये येऊ शकतो. ज्यामध्ये काळा, पांढरा आणि हिरवा यांचा समावेश असू शकतो. पांढऱ्या आणि हिरव्या रंगात टेक्सचर बॅक पॅनल मिळू शकते. डिव्हाईस मध्ये फ्लॅट एज आणि मागील बाजूस एक चौकोनी कॅमेरा मॉड्यूल पहायला मिळू शकते. तर, समोर एक पंच-होल डिस्प्ले आहे.
- Honor X7c 4G फोन लवकरच लाँच होण्याची शक्यता आहे. आठवण करून देतो की मागील मॉडेल Honor X7b 4G डिसेंबर 2023 मध्ये रिलीज झाले होते आणि 5G मॉडेल या वर्षी एप्रिलमध्ये आले होते.
Honor X7c 4G चे स्पेसिफिकेशन
डिस्प्ले: Honor X7c 4G मध्ये 6.77 इंचाचा आयपीएस डिस्प्ले मिळण्याची अपेक्षा आहे. त्यावर 1610×720 चे पिक्सेल रिझोल्यूशन, 120 हर्ट्स रिफ्रेश रेट, 261पीपीआय आणि 20.1:9 आस्पेक्ट रेशो यांचा सपोर्ट दिला जाऊ शकतो.
प्रोसेसर: आगामी ऑनर स्मार्टफोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 685 चिपसेट लावण्यात येणार असल्याची माहिती सांगण्यात आली आहे.
स्टोरेज आणि रॅम: स्पीडसाठी डिव्हाईसमध्ये 8 जीबी रॅम आणि स्पेससाठी 256 जीबी इंटरनल स्टोरेज असू शकते.
कॅमेरा: कॅमेऱ्याच्या बाबतीत Honor X7c 4G च्या रिअर पॅनेलवर 108 मेगापिक्सेलचा प्रायमरी सेन्सर आणि 2 मेगापिक्सेलचा सेकंडरी सेन्सर मिळू शकतात. तर, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 8 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा दिला जाऊ शकतो.
बॅटरी आणि चार्जिंग: मोबाईलमध्ये पॉवर बॅकअपसाठी ब्रँडकडून 35 वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5,200 एमएएच ची मोठी बॅटरी दिली जाऊ शकते.
ओएस: हा फोन मॅझिकओएस 8.0 सह अँड्राईड 14 वर आधारित असू शकतो.
इतर: Honor X7c 4G मध्ये साईड-माऊंटेड फिंगरप्रिंट सेन्सर, ड्युअल नॅनो सिम सपोर्ट, मायक्रोएसडी कार्ड स्लॉट, एनएफसी, ब्लूटूथ 5.0, वाय-फाय 5, युएसबी टाईप-सी आणि 3.5एमएम ऑडिओ जॅक सारखे फिचर्स मिळू शकतात. तर पाणी आणि धुळीपासून संरक्षणासाठी IP64 रेटिंग दिले जाऊ शकते.
वजन आणि डायमेंशन: लीकनुसार हा डिव्हाईस 166.9 x 76.8 x 8.1 मिमी आणि 191 ग्रॅम असल्याचे म्हटले आहे.