ओप्पोनं आज आपल्या होम मार्केट चीनमध्ये नवीन स्मार्टफोन OPPO K11x लाँच केला आहे. हा एक मिडबजेट 5जी फोन आहे जो Qualcomm Snapdragon 695 प्रोसेसरवर चालतो. पुढे तुम्ही ओप्पो के11एक्सच्या किंमतीसह फोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स देखील वाचू शकता.
ओप्पो के11एक्स ची किंमत
- OPPO K11x 8GB + 128GB = CNY 1499 (जवळपास 17,500 रुपये)
- OPPO K11x 8GB + 256GB = CNY 1699 (जवळपास 19,900 रुपये)
- OPPO K11x 12GB + 128GB = CNY 1899 (जवळपास 22,000 रुपये)
ओप्पो के11एक्स तीन मेमरी व्हेरिएंट्स मार्केटमध्ये आला आहे. बेस व्हेरिएंटमध्ये 8जीबी रॅमसह 128जीबी स्टोरेज देण्यात आली आहे ज्याची किंमत CNY 1499 (जवळपास 17,500 रुपये) आहे. तसेच 8जीबी रॅम + 256जीबी स्टोरेज व्हेरिएंट CNY 1699 (जवळपास 19,900 रुपये) तर 12जीबी रॅम + 256जीबी व्हेरिएंट CNY 1899 (जवळपास 22,000 रुपये) मध्ये लाँच झाला आहे. हा फोन Jade Black आणि Pearl कलरमध्ये विकत घेता येईल.
ओप्पो के11एक्स चे स्पेसिफिकेशन्स
- 6.72″ FHD+ Display
- Android 13
- Snapdragon 695
- 108MP Triple Rear Camera
- 5000mAh Battery
- 67W Fast Charging
डिस्प्ले : ओप्पो के11एक्स स्मार्टफोनमध्ये 2400 × 1080 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.72 इंचाची फुलएचडी+ स्क्रीन देण्यात आली आहे. ह्या डिस्प्लेवर 120हर्ट्झ रिफ्रेश रेट तसेच 240हर्ट्झ टच सॅम्पलिंग रेट मिळतो.
प्रोसेसर : OPPO K11x अँड्रॉइड 13 आधारित कलरओएस 13.1 वर सादर करण्यात आला आहे. फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 695 ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे जो 2.2गीगाहर्ट्झ क्लॉक स्पीडवर चालतो.
कॅमेरा : फोनच्या बॅक पॅनलवर ड्युअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे ज्यात एफ/1.7 अपर्चर असलेला 108 मेगापिक्सलची प्रायमरी लेन्स आणि एफ/2.4 अपर्चर असलेला 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आहे. हा ओप्पो मोबाइल एफ/2.4 अपर्चर असलेल्या 16 मेगापिक्सलच्या सेल्फी सेन्सरला सपोर्ट करतो.
बॅटरी : ओप्पो के11एक्स मध्ये पावर बॅकअपसाठी 5,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. हा स्मार्टफोन 67वॉट सुपरफ्लॅश चार्ज टेक्नॉलॉजीसह येतो.
सिक्योरिटी : ओप्पोनं आपल्या नवीन मोबाइल फोनमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. तसेच हा फोन फेस अनलॉक फीचरला देखील सपोर्ट करतो.
ओप्पो के11एक्स येणार का भारतात
भारतीय बाजारात ओप्पो ‘के’ सीरीज अंतगर्त आतापर्यंत फक्त दोन स्मार्टफोन OPPO K10 4G आणि OPPO K10 5G लाँच करण्यात आले आहेत. कंपनी चीनमध्ये लाँच झाला OPPO K11x 5G फोन भारतात घेऊन येईल की नाही हे स्पष्ट झालं नाही. ह्यासाठी कंपनीच्या घोषणेची वाट पाहावी लागेल.
