Infinix GT 20 Pro लाँच झाला आहे. जागतिक मार्केटमध्ये सादर झालेल्या या मोबाईलला MediaTek Dimensity 8200 Ultimate प्रोसेसरसह आणले गेले आहे जो 32MP Selfie Camera तसेच 108MP Rear Camera ला सपोर्ट करतो. आशा करू शकता की येत्या काही दिवसांमध्ये हा स्मार्टफोन भारतीय बाजारात पण एंट्री घेईल. इनफिनिक्स जीटी 20 प्रो चे फिचर्स, स्पेसिफिकेशन तसेच किंमतीची माहिती तुम्ही पुढे वाचू शकता.
स्क्रीन : इनफिनिक्स जीटी 20 प्रो ला 6.78 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेवर लाँच करण्यात आले आहे. ही स्क्रीन अॅमोलेड पॅनलवर बनली आहे जी 144 हर्ट्झ रिफ्रेश रेटवर चालते. यात 2340 हर्ट्झ पीडब्ल्यूएम डिमिंग, 1300निट्स ब्राइटनेस तसेच इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर सारखे फिचर्स पण देण्यात आले आहेत.
परफॉर्मन्स : Infinix GT 20 Pro अँड्रॉईड 14 ओएसवर लाँच झाला आहे जो ब्रँडच्या एक्सओएस 14 सह मिलून चालतो. तसेच प्रोसेसिंगसाठी या मोबाईलमध्ये मीडियाटेक डाइमेंसिटी 8200 अल्टीमेट ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे जो 3.1 गीगाहर्ट्झ पर्यंतच्या क्लॉक स्पीडवर चालतो.
मेमरी : इनफिनिक्सच्या या फोनमध्ये 8 जीबी रॅम तसेच 12 जीबी रॅम देण्यात आली आहे. हा मोबाईल 12 जीबी वचुर्अल रॅमला सपोर्ट करतो जो फिजिकल रॅमसह मिळून 24 जीबी रॅम पर्यंतची पावर प्रदान करण्याची क्षमता ठेवतो. तसेच फोनमध्ये 256 जीबी इंटरनल स्टोरेज मिळते.
बॅक कॅमेरा : फोटोग्राफीसाठी इनफिनिक्स जीटी 20 प्रो ट्रिपल रिअर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. याच्या बॅक पॅनलवर 108 मेगापिक्सल प्रायमरी सेन्सर आहे ज्यासोबत 2 मेगापिक्सलचे दोन इतर सेन्सर पण देण्यात आले आहेत.
फ्रंट कॅमेरा : सेल्फी काढणे तसेच रिल्स बनविण्यासाठी Infinix GT 20 Pro 32 मेगापिक्सल फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.
बॅटरी : पावर बॅकअपसाठी इनफिनिक्स जीटी 20 प्रो स्मार्टफोनमध्ये 5,000 एमएएच बॅटरी देण्यात आली आहे. तसेच ही मोठी बॅटरी फास्ट चार्ज करण्यासाठी इनफिनिक्सने आपल्या मोबाईलला 45 वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह आणले आहे. या फोनमध्ये पीडी 3.0 तसेच हायपर चार्ज मोड सारखे फिचर्स पण मिळतात.
इतर फिचर्स : इनफिनिक्स जीटी 20 प्रो स्मार्टफोनमध्ये JBL ड्युअल स्पिकर्स देण्यात आले आहेत. गेमिंगसाठी फोनमध्ये इन-गेम वाइब्रेशन तसेच एक्स-अॅक्सिस लाईन मोटर सारखे पर्याय आहेत. हा फोन वाय-फाय 6, एनएफसी तसेच आयआर ब्लास्टला पण सपोर्ट करतो. Infinix GT 20 Pro आयपी 54 रेटिंगसह आला आहे.