स्मार्टफोन मार्केटमध्ये खळबळ माजवणारा टेक ब्रँड वनप्लसने आज आपला नवीन टॅबलेट डिव्हाईस OnePlus Pad 2 लाँच केला आहे. हायएन्ड स्पेसिफिकेशन असलेला हा टॅब फ्लॅगशिप सेग्मेंटमध्ये आणला गेला आहे जो 12GB RAM आणि Snapdragon 8 Gen 3 च्या पावरसह आहे. OnePlus Summer Launch Event च्या मंचावरून सादर केलेल्या नवीन वनप्लस पॅड 2 ची किंमत तसेच स्पेसिफिकेशनची माहिती पुढे वाचू शकता.
OnePlus Pad 2 ची किंमत
- 8GB RAM + 128GB Storage – ₹39,999
- 12GB RAM + 256GB Storage – ₹42,999
वनप्लस पॅड 2 भारतात दोन व्हेरिएंट्समध्ये लाँच झाला आहे. या टॅबलेटच्या 8 जीबी रॅम व 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 39,999 रुपये आहे. तसेच टॅबलेटच्या मोठ्या 12 जीबी रॅम व 256 जीबी मेमरी मॉडेल 42,999 रुपयांमध्ये भारतात लाँच करण्यात आला आहे. वनप्लस टॅबलेटची सेल 1 ऑगस्टपासून सुरु होईल तसेच बँक कार्डवर 2 हजार रुपयांचा डिस्काऊंट पण मिळेल.
OnePlus Pad 2 चे स्पेसिफिकेशन
- 12.1-इंचाची 144 हर्ट्झ एलसीडी स्क्रीन
- क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन 3 प्रोसेसर
- 12 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेज
- 13 मेगापिक्सल बॅक कॅमेरा
- 8 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा
- 9,510 एमएएच बॅटरी
- 67 वॉट फास्ट चार्जिंग
डिस्प्ले : OnePlus Pad 2 मध्ये 3000 × 2120 पिक्सल रेजोल्यूशन असणारी 12.1-इंचाची मोठी 3K स्क्रीन देण्यात आली आहे. हा डिस्प्ले एलसीडी पॅनलवर बनलेला आहे जो 144Hz रिफ्रेश रेट, 900nits पिक ब्राईटनेस तसेच 303PPI ला सपोर्ट करतो. नवीन वनप्लस पॅड 2 चे स्क्रीन-टू-बॉडी रेश्यो 88.40% चा आहे.
प्रोसेसर : वनप्लस पॅड 2 अँड्रॉईड 14 वर सादर झाला आहे जो OxygenOS 14 सह मिळून चालतो. प्रोसेसिंगसाठी या मोबाईलमध्ये 4 नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेला Qualcomm Snapdragon 8 Gen 3 ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे जो 3.3GHz पर्यंतच्या क्लॉक स्पीडवर रन करण्याची क्षमता ठेवतो.
मेमरी : OnePlus Pad 2 8GB RAM आणि 12GB RAM वर भारतात लाँच करण्यात आला आहे. फोनमध्ये 8 जीबी रॅमसह 128GB स्टोरेज तसेच 12 जीबी रॅमसह 256GB स्टोरेज मिळते.
कॅमेरा : फोटोग्राफीसाठी वनप्लस पॅड 2 च्या बॅक पॅनलवर 13 मेगापिक्सलचा कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी हा टॅबलेट डिव्हाईस 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.
बॅटरी : पावर बॅकअपसाठी OnePlus Pad 2 टॅबलेटला 9,510mAh बॅटरीसह बाजारात आणले गेले आहे. तसेच ही मोठी बॅटरी फास्ट चार्ज करण्यासाठी यात 67W SUPERVOOC फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे.
OnePlus Stylo 2
वनप्लस पॅड 2 सह स्मार्टपेनला सादर करत कंपनीने OnePlus Stylo 2 लाँच केला आहे. याची किंमत 5499 रुपये आहे. या स्टायलो 2 वर टच कंट्रोल पॅड लावली आहे ज्यावर फिंगर स्क्रोल केल्याने टॅबलेट स्क्रीनला नेव्हिगेट केले जाईल. OnePlus Stylo 2 लेजर पॉईंटरचे पण काम करू शकते, तसेच टेक्स्ट लिहिल्यावर त्यामध्ये कलर हायलाईट सारखे फिचर पण यात मिळतात. वनप्लसचा दावा आहे की यात 16,000 प्रेशर सेन्सेटिव्हिटी लेव्हल आहे जी 0 मिलीसेकंडचा डिले देत आहे तसेच फास्ट काम करण्याची ताकद प्रदान करतो.
OnePlus Smart Keyboard
वनप्लस पॅड 2 सह कंपनी वनप्लस स्मार्ट किबोर्ड पण घेऊन आली आहे, ज्याची किंमत 8,499 रुपये आहे. हा किबोर्ड सहज टॅबलेटसह पेअर होतो. यात लावलेले मॅग्नेटिक होल्डर टॅबला 110° ते 165° पर्यंत वाकवले जाऊ शकते. याला ब्लूटूथच्या माध्यमातून पण कनेक्ट केले जाऊ शकते तसेच टचपॅडमध्ये लावलेली 205mAh बॅटरी याला बॅकअप प्रदान करते. किबोर्डमध्ये दिलेली मोठे 8640mm touchpad याचा वापर आरामात करू शकते.
