Home बातम्या 137KM ची जबरदस्त रेंज असलेली इलेक्ट्रिक स्कूटर लाँच, मिळणार 2 वर्षांची वॉरंटी

137KM ची जबरदस्त रेंज असलेली इलेक्ट्रिक स्कूटर लाँच, मिळणार 2 वर्षांची वॉरंटी

Electric Scooter ची वाढती मागणी पाहून अनेक कंपन्या आपल्या नवीन बॅटरी असलेल्या स्कूटर बाजारात सादर करत आहेत. यात आता Silence नावाच्या ऑटो मेकर कंपनीचा समावेश झाला आहे. कंपनीनं यूकेमध्ये आपली नवीन इलेक्ट्रिक स्कूटर लाँच केली आहे, जी Silence S01 Plus नावानं लाँच करण्यात आली आहे. त्यामुळे कंपनीच्या इलेक्ट्रिक स्कूटरच्या ताफ्यात आता एकूण 6 इलेक्ट्रिक स्कूटर झाले आहेत, ज्यात S01 Plus, S01 Urban, S01 Connected, S02 Urban, S02 Business आणि S02 Business Plus चा समावेश आहे. नवीन स्कूटर कंपनीच्या लोकप्रिय S01 ई-स्कूटरचा अपडेट व्हर्जन आहे. पुढे आम्ही तुम्हाला Silence च्या या नवीन Silence S01 Plus Electric Scooter च्या टॉप स्पीड, फीचर्स आणि रेंजची माहिती दिली आहे.

Electric Scooter S01 Plus ची प्राईस

ही इलेक्ट्रिक स्कूटर यूकेमध्ये £6,795 मध्ये सादर करण्यात आली आहे. भारतीय चलनात ही किंमत रूपांतरित करायची झाली तर सुमारे 6.50 लाख रुपये होतात. कंपनीनं ही स्कूटर विकत घेण्यासाठी ईएमआयचा पर्याय देखील देत आहे. ही ई-स्कूटर 47 महिन्यांच्या मासिक हप्त्यावर घेऊ शकते ईएमआय सुमारे £124.26 म्हणजे की जवळपास 12 हजार रुपयांचा आहे. हे देखील वाचा: खिशाला परवडणाऱ्या किंमतीत 6GB रॅम असलेला Redmi चा स्वस्त स्मार्टफोन लाँच; जाणून घ्या फीचर्स

Silence S01 Plus ची डिजाइन

Silence S01 Plus मध्ये राउंड हेडलॅम्प, स्कल्प्टेड फ्रंट फेशिया, टिंटेड विंडस्क्रीन, ट्रेंडी रियर व्यू मिरर, सिंगल पीस सीट आणि लॉन्ग टेल सेक्शन आहे. तसेच S01+ ब्रँडिंग एलिमेंट टेल सेक्शन आणि व्हील्सवर दिसतात. व्हील आणि बॉडी पॅनलवर रेड हाइलाईट ग्रे-ब्लॅक थीम दिसत आहे.

Silence S01 Plus चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचं झालं तर यात एक पुश टू पास मोड देण्यात आला आहे, ज्यात युजर्स जवळपास 109 किमी प्रति तास टॉप स्पीड मिळवू शकतात. तसेच WMTC स्टॅंडर्डनुसार हिची रेंज जवळपास 137 किमी पर्यंत आहे. म्हणजे सिंगल चार्जमध्ये ही इलेक्ट्रिक स्कूटर 137KM पर्यंतचा प्रवास करू शकते. कंपनीनं माहिती दिली आहे की स्टँडर्ड 240V सॉकेटसह स्कूटर फक्त 6-8 तासांमध्ये फुलचार्ज होईल. हे देखील वाचा: Aashram 4: यावेळी होणार बाबा निरालाचा पर्दाफाश! अशी असेल आश्रम 4 ची गोष्ट

2 वर्षांची वॉरंटी

कंपनी स्कूटरसह 2 वर्षांची वॉरंटी आणि बॅटरीवर 3 वर्षांची वॉरंटी देत आहे. तसेच यात सस्पेंशन सिस्टम देखील अ‍ॅडजस्टेबिलिटी ऑप्शनसह अपडेट करण्यात आली आहे. तसेच सायलेन्स S01 प्लस इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये 7.5 kW ची मोठी कपॅसिटी मोटर आहे, जी मॅक्सिमम 12.23 PS ची पावर जनरेट करते. तसेच स्कूटरमध्ये 4 राईड मोड इको, सिटी, स्पोर्ट आणि रिवर्स गियर आहेत.