रिअलमीने आपला NARZO 70 Turbo 5G स्मार्टफोन काही दिवसांपूर्वीच लाँच केला आहे. ज्याची विक्री आज 16 सप्टेंबरपासून सुरू झाली आहे. खास गोष्ट म्हणजे ऑफरसोबत हा मोबाईल फक्त 14,999 रुपयांना विकला जात आहे. हा शक्तिशाली मीडियाटेक डायमेंसिटी 7300 एनर्जी चिपसेट, 26 जीबी पर्यंत रॅम, 50 मेगापिक्सेलचा कॅमेरा आणि 5000एमएएच ची बॅटरी असलेला 5G फोन आहे. चला, पुढे किंमत, सर्व ऑफर्स आणि स्पेसिफिकेशन यांच्या विषयी तपशीलवार जाणून घेऊया.
Realme NARZO 70 Turbo 5G ची किंमत आणि ऑफर तपशील
- नवीन Realme NARZO 70 Turbo 5G तीन स्टोरेज मध्ये सादर करण्यात आला आहे.
- फोनच्या 6जीबी रॅम + 128जीबी स्टोरेजची किंमत 16,999 रुपये ठेवण्यात आली आहे. ज्याला 2,000 रुपयांच्या झटपट कूपन डिस्काऊंट ऑफरसह फक्त 14,999 रुपयांमध्ये खरेदी केले जाऊ शकते.
- मिड मॉडेल 8जीबी रॅम + 128जीबी व्हेरिएंटची किंमत 17,999 रुपये आहे ज्याला झटपट कूपन डिस्काऊंटसह 15,999 मध्ये खरेदी केले जाऊ शकते.
- फोनचा टॉप ऑप्शन 12जीबी रॅम + 256जीबी 20,999 रुपयांमध्ये येत आहे. जे ऑफरसह केवळ 18,999 रुपयांमध्ये मिळेल.
Realme NARZO 70 Turbo 5G कोठून खरेदी करायचा
- Realme Narzo 70 Turbo 5G ची विक्री ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म ॲमेझॉन, realme.com आणि इतर रिटेल आऊटलेट्स वर आजपासून सुरू झाली आहे.
- हा मोबाईल टर्बो यलो, टर्बो पर्पल, टर्बो ग्रीन अशा तीन रंगात उपलब्ध आहे.
Realme NARZO 70 Turbo 5G चे स्पेसिफिकेशन
डिस्प्ले: Realme Narzo 70 Turbo 5G मध्ये 6.67 इंचाचा सॅमसंग E4 ओएलईडी डिस्प्ले आहे. त्यावर 120Hz रिफ्रेश रेट, 92.65% स्क्रीन-टू-बॉडी रेशो, 180Hz टच सॅम्पलिंग रेट, 600 निट्स सामान्य आणि 1200 निट्स पर्यंतचा उच्च ब्राईटनेस मिळत आहे. सोबतच स्क्रीनच्या संरक्षणासाठी AG DT Star 2 ग्लास प्रोटेक्शन दिले आहे.
चिपसेट: Narzo 70 Turbo 5G मध्ये मीडियाटेक डायमेंसिटी 7300 चिपसेट लावण्यात आला आहे. वापरकर्त्यांना अधिक चांगल्या ग्राफिक्ससाठी माली जी615 जीपीयू मिळत आहे. यात जीटी मोड, जीटी गेमिंग फिचर्ससह स्टेनलेस स्टील व्हीसी कुलिंग सिस्टीम देखील आहे.
स्टोरेज आणि रॅम: स्मार्टफोनमध्ये 12 जीबी पर्यंत रॅम आणि 256 जीबी पर्यंत इंटरनल स्टोरेज आहे. एवढेच नाही तर 14 जीबी पर्यंत डायनॅमिक रॅम देण्यात आली आहे. ज्यामुळे एकूण 26 जीबी पर्यंत रॅम वापरता येईल.
कॅमेरा: Realme NARZO 70 Turbo 5G मध्ये एलईडी फ्लॅशसह ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप दिला गेला आहे. ज्यामध्ये एफ/1.8 अपर्चर असलेली 50 मेगापिक्सेलची प्रायमरी आणि 2 मेगापिक्सेलची एफ/2.4 अपर्चर लेन्स उपलब्ध आहे. तर, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी वापरकर्त्यांकडे F/2.4 अपर्चर असलेला 16 मेगापिक्सेलचा कॅमेरा आहे.
बॅटरी आणि चार्जिंग: Realme Narzo 70 Turbo 5G फोनमध्ये 5000एमएएच ची बॅटरी दिली गेली आहे. तिला चार्ज करण्यासाठी 45 वॉट अल्ट्रा फास्ट चार्जिंग तंत्रज्ञान मिळत आहे.
इतर: डिव्हाईसमध्ये वाय-फाय 6, ब्लूटूथ 5.4, पाणी आणि धूळ-प्रतिरोधक IP65 रेटिंग, रेनवॉटर टच फिचर, ड्युअल स्टीरिओ स्पीकर आणि अनेक एआय फिचर्स मिळत आहेत.
ऑपरेटिंग सिस्टम: हा नवीन फोन अँड्रॉईड 14 आधारित रिअलमी यूआय 5.0 वर बेस्ड आहे. यामध्ये 3 वर्षांचे सिक्युरिटी अपडेट्स आणि 2 वर्षांचे ऑपरेटिंग सिस्टीम अपडेट्स दिले जातील.
