OnePlus नं आज आपल्या होम मार्केट चीनमध्ये ‘एस’ सीरीजचा विस्तार करत नवीन स्मार्टफोन OnePlus Ace Pro लाँच केला आहे. OnePlus Ace नंतर हा या सीरीजचा दुसरा मोबाइल फोन आहे. विशेष म्हणजे वनप्लस एस भारतात लाँच झालेल्या OnePlus 10R चा दुसरा व्हर्जन होतात तर लेटेस्ट वनप्लस एस प्रो अलीकडेच भारतात आलेल्या OnePlus 10T चा चिनी व्हर्जन आहे.
OnePlus Ace Pro Price
]वनप्लस एस प्रो ची किंमत पाहता हा मोबाइल फोन चीनमध्ये तीन व्हेरिएंट्समध्ये लाँच झाला आहे. बेस व्हेरिएंटमध्ये 12 जीबी सह 256 जीबी स्टोरेज देण्यात आली आहे. तर अन्य दोन्ही व्हेरिएंट 16 जीबीच्या पावरफुल रॅमला सपोर्ट करतात जे 256 जीबी स्टोरेज व 512 जीबी स्टोरेजसह विकत घेता येतील. चीनमध्ये OnePlus Ace Pro स्मार्टफोन black आणि green कलरमध्ये लाँच करण्यात आला आहे. हे देखील वाचा: आता नाही मिळणार OPPO आणि OnePlus चे स्मार्टफोन्स; ‘या’ देशात पूर्णपणे बॅन झाले हे दोन्ही चीनी ब्रँड
- OnePlus Ace Pro 12GB + 256GB – ¥3,499 (जवळपास 41,200 रुपये)
- OnePlus Ace Pro 16GB + 256GB – ¥3,799 (जवळपास 44,800 रुपये)
- OnePlus Ace Pro 16GB + 512GB – ¥4,299 (जवळपास 50,700 रुपये)
OnePlus Ace Pro चे स्पेसिफिकेशन्स
फोनचे फीचर्स व स्पेसिफिकेशन्स पाहता, वनप्लस एस प्रो मध्ये 6.7 इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे जो अॅमोलेड पॅनलवर बनला आहे तसेच 120हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. ही स्क्रीन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर टेक्नॉलॉजीसह येते. तसेच फोनच्या सुरक्षेसाठी कोर्निंग गोरिल्ला 5 ग्लास देण्यात आली आहे.
OnePlus Ace Pro अँड्रॉइड 12 आधारित कलरओएस 12.1 वर चालतो. फोनमध्ये ऑक्टाकोर प्रोसेसरसह क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8+ जेन 1 चिपसेटची ताकद देण्यात आली आहे. हा फोन LPDDR5 RAM आणि UFS 3.1 storage ला सपोर्ट करतो. तसेच 3D Liquid cooling 2.0 सह 4,800एमएएच बॅटरी देण्यात आली आहे जी 150वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीवर चालते. हे देखील वाचा: फक्त 18,249 रुपयांमध्ये मिळतोय OnePlus चा दमदार स्मार्टफोन; स्वस्तात 6GB RAM, 5000mAh ची बॅटरी
फोटोग्राफीसाठी OnePlus Ace Pro मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा मिळतो. बॅक पॅनलवर 50 मेगापिक्सलचा सोनी आयएमएक्स766 प्रायमरी सेन्सर आहे सोबतीला 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स तथा 2 मेगापिक्सलचा मॅक्रो सेन्सर देण्यात आला आहे. फोनच्या फ्रंट पॅनलवर 16एमपी सेल्फी कॅमेरा आहे. त्याचबरोबर वनप्लस एस प्रो मध्ये एनएफसी, ड्युअल बँड वायफाय व ब्लूटूथ 5.3 सारखे फीचर मिळतात.
