भारतीय स्मार्टफोन मार्केटसाठी हा आठवडा खूप खास आहे. कारण, अनेक मोठे ब्रँड 17 जून ते 23 जून या कालावधीत आपापसात लढणार आहेत. यावेळची स्पर्धा स्वस्त मोबाईलची नसून, ती स्पर्धा महागड्या फ्लॅगशिप फोनमध्ये होणार आहे. OnePlus Nord CE 4 Lite, Motorola Edge 50 Ultra आणि realme GT 6 सारखे स्मार्टफोन या आठवड्यात भारतात लाँच होणार आहेत. त्याचवेळी Infinix आणि Vivo चे नवे फोन देखील बाजारपेठेत येऊ शकतात. हे आगामी मोबाईल फोन कधी लाँच केले जातील आणि त्यामध्ये काय खास असणार याविषयी तुम्ही पुढे अधिक माहिती वाचू शकता.
OnePlus Nord CE 4 Lite
लाँचची तारीख – 18 जून
अंदाजे किंमत – 18,999 रुपये
OnePlus Nord CE 4 Lite ची घोषणा 18 जून रोजी होणार आहे. या दिवशी, कंपनी केवळ आपल्या फोनची माहिती उघड करणार नाही तर Nord CE 4 Lite ची किंमत देखील जाहीर केली जाऊ शकते. याची किंमत सुमारे 20 हजार रुपये असण्याची शक्यता आहे. स्पेसिफिकेशनबद्दल बोलायचे झाले तर, यात क्वालकॉमचा Snapdragon 6 gen 1 चिपसेट, 8GB RAM, 80W SuperVOOC चार्जिंग आणि 5,500mAh बॅटरी असेल. याशिवाय, त्यात 120Hz रिफ्रेश रेट आणि 1200nits ब्राईटनेससह 6.67″ AMOLED डिस्प्ले, 50MP ड्युअल रिअर कॅमेरा आणि 16MP सेल्फी कॅमेरा देखील मिळण्याची शक्यता आहे.
Motorola Edge 50 Ultra
लाँचची तारीख – 18 जून
अंदाजे किंमत – 46,000 रुपये
Motorola Edge 50 Ultra हा फ्लॅगशिप स्मार्टफोन असेल ज्याची किंमत 50 हजार रुपयांपेक्षा अधिक असू शकते. या फोनमध्ये 16GB रॅम, 1TB स्टोरेज आणि क्वालकॉमचा Snapdragon 8s Gen 3 चिपसेटसह दिला जाऊ शकतो. तसेच फोटोग्राफीसाठी मागील आणि पुढील या दोन्ही पॅनलवर 50MP कॅमेरा दिसू शकतो. यात 144Hz रिफ्रेश रेटसह OLED स्क्रीनसह दिला जाण्याची शक्यता आहे. Edge 50 Ultra मध्ये पॉवर बॅकअपसाठी 4,500mAh बॅटरी आणि चार्जिंगसाठी 125W TurboPower वायर्ड चार्जिंग, 50W वायरलेस चार्जिंग आणि 5W रिव्हर्स चार्जिंग तंत्रज्ञान देखील पाहिले जाऊ शकते.
realme GT 6
लाँचची तारीख – 20 जून
अंदाजे किंमत – 39,999 रुपये
Realme GT6 बद्दल केवळ भारतीय बाजारपेठच नाही तर जागतिक टेक मार्केट देखील उत्साहित आहे. Qualcomm Snapdragon 8s Gen 3 च्या पॉवरने सुसज्ज हा मोबाईल एक फ्लॅगशिप स्मार्टफोन असेल ज्याची किंमत सुमारे 40 हजार रुपये असण्याची शक्यता आहे. त्याच्या मागील पॅनलवर फोटोग्राफीसाठी 50MP Sony LYT-808 OIS सेन्सर आणि पुढील पॅनलवर Sony IMX615 32MP सेल्फी सेन्सर मिळू शकतो. तसेच या फोनमध्ये 6000nits पीक ब्राईटनेस 8T LTPO AMOLED स्क्रीन आणि पॉवर बॅकअपसाठी 120W फास्ट चार्जिंगसह 5,500mAh बॅटरी असण्याची अपेक्षा आहे.
Infinix Note 40 5G
लाँचची तारीख – 21 जून
अंदाजे किंमत – 19,900 रुपये
जागतिक बाजारपेठेत प्रवेश केल्यानंतर हा Infinix स्मार्टफोन आता 21 जून रोजी भारतात लाँच होत आहे. या मिड-बजेट फोनचा मुख्य यूएसपी 108MP बॅक आणि 32MP फ्रंट कॅमेरा आहे. हा मोबाईल 12GB रॅमच्या पॉवरसह MediaTek Dimensity 7020 चिपसेटवर रन करतो. Infinix Note 40 5G फोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेट आणि 1300nits ब्राईटनेससह 6.78-इंचाचा फुलएचडी + एमोलेड डिस्प्ले आहे. या फोनमध्ये पॉवर बॅकअपसाठी 5,000mAh बॅटरीसह 33W वायर्ड आणि 15W वायरलेस चार्जिंगचा सपोर्ट मिळतो.
Vivo Y58 5G
लाँचची तारीख – ठरलेली नाही
अंदाजे किंमत – 16,999 रुपये
Vivo ने घोषणा केली नाही पण, Y58 5G फोन या आठवड्यात भारतीय बाजारात प्रवेश करेल अशी अपेक्षा आहे. हा मिड-रेंज मोबाईल फोन 8GB रॅम आणि Qualcomm Snapdragon 4 Gen 3 प्रोसेसरवर लाँच केला जाऊ शकतो. इतर स्पेसिफिकेशनबद्दल बोलायचे झाले तर, Vivo Y58 5G मध्ये 6.72 इंच 120Hz FHD+ डिस्प्ले सह 50 मेगापिक्सेल AI ड्युअल रिअर कॅमेरा आणि 8 मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरा मिळू शकतो. हा Vivo स्मार्टफोन मजबूत अशा 6,000mAh बॅटरीवर लाँच केला जाऊ शकतो, ज्यामध्ये 44W फास्ट चार्जिंग तंत्रज्ञान दिसू शकते.
