Home बातम्या Realme Narzo 70 Pro 5G भारतात 19 मार्चला होईल लाँच, मिळेल अ‍ॅडव्हान्स Air Gesture फिचर

Realme Narzo 70 Pro 5G भारतात 19 मार्चला होईल लाँच, मिळेल अ‍ॅडव्हान्स Air Gesture फिचर

Realme कंपनी आपल्या ‘नारजो’ सीरीजमध्ये नवीन स्मार्टफोन जोडणार आहे. ब्रँडचा लेटेस्ट आणि अ‍ॅडव्हान्स मोबाईल फोन Narzo 70 Pro 5G 19 मार्चला भारतात लाँच होईल. फोनच्या लाँचची तारिख तसेच यासोबतच कंपनीने याचे फोटो व काही फिचर्स पण ऑफिशियल केले आहेत, ज्याची माहिती तुम्ही पुढे वाचू शकता. तसेच या फोनमध्ये Sony IMX890 OIS Camera मिळेल.

Realme Narzo 70 Pro 5G च्या भारतातील लाँचची माहिती

कंपनीने अधिकृत घोषणा करत सांगितले आहे की येत्या 19 मार्चला भारतात लाँच इव्हेंट आयोजन करणार आहे ज्या मंचावरून नवीन नारजो स्मार्टफोन Narzo 70 Pro 5G भारतीय बाजारात एंट्री घेणार आहे. हा लाँच 19 मार्चला दुपारी 12 वाजता सुरु होईल ज्याला ब्रँड ऑफिशियल सोशल मीडिया प्लॅटफॉर्म सोबतच शॉपिंग साईट Amazon वर पण लाईव्ह पाहायला मिळू शकतो.

Air Gestures फिचर

हेडलाईनमध्ये आम्ही Air Gesture फिचरचा उल्लेख केला आहे, हाच या मोबाईलचा मोठा यूएसपी असेल. तसेच एअर जेस्चर एक अशी टेक्नोलॉजी आहे ज्यामुळे तुम्ही फोनला हात न लावता त्याच्या स्क्रीन व अ‍ॅप्सला नेविगेट करू शकता. जर तुमचे हाथ ओले असतील किंवा खराब असतील तर यावेळी फक्त बोट किंवा हात हालवून फोनला कमांड दिली जाऊ शकते. अ‍ॅप्स खोलणे-बंद करणे, स्क्रीन स्क्रॉलिंग, स्क्रीनशॉट, होम पेज अ‍ॅक्सेस सारखे काम फक्त ईशारा देऊन केले जातील.

Realme Narzo 60 Pro 5G भारतातील लाँचची माहिती