Home बातम्या स्वस्त realme Narzo 70 5G फोनची किंमत झाली कमी, कंपनी देत आहे 2000 रुपयांचा डिस्काऊंट

स्वस्त realme Narzo 70 5G फोनची किंमत झाली कमी, कंपनी देत आहे 2000 रुपयांचा डिस्काऊंट

रियलमीने एप्रिल महिन्यामध्ये आपल्या नारजो सीरीज अंतर्गत Narzo 70 5G फोन लाँच केला होता जो 16GB RAM (8GB+8GB) आणि 50MP Camera च्या ताकदीसह आला होता. हा मोबाईल 15,999 रुपयांमध्ये लाँच झाला होता ज्यावर आता 2000 रुपयांचा डिस्काऊंट मिळत आहे. रियलमी नारजो 70 5 जी फोनवर मिळत सूट व ऑफरची संपूर्ण माहिती तुम्ही पुढे वाचू शकता.

रियलमी नारजो 70 5 जी फोन दोन व्हेरिएंट्समध्ये सेलसाठी उपलब्ध आहे तसेच दोन्हीवर ही 2 हजार रुपयांची सूट मिळत आहे. 15,999 रुपयांच्या 6 जीबी रॅम मॉडेलला आता 13,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल तसेच 16,999 रुपयांच्या 8 जीबी रॅम मॉडेलला 14,999 रुपयांमध्ये विकत घेतले जाऊ शकते.

या स्कीमचा फायदा कंपनी वेबसाईट तसेच शॉपिंग साईट अ‍ॅमेझॉनवर उठविला जाऊ शकतो जो मर्यादित वेळेसाठी मिळेल. तसेच ऑफर अंतर्गत realme Narzo 70 5G 3 महिन्याच्या No Cost EMI वर पण विकत घेता येईल. तसेच हा रियलमी मोबाईल Ice Blue आणि Forest Green कलरमध्ये सेलसाठी उपलब्ध आहे.

realme Narzo 70 5G चे स्पेसिफिकेशन

स्क्रीन : रियलमी नारजो 70 5 जी फोन 2412 X 1080 पिक्सल रेजोल्यूशन असणाऱ्या 6.67 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो जी अ‍ॅमोलेड पॅनलवर बनली आहे. यावर 120 हर्ट्झ रिफ्रेश रेट, 240 हर्ट्झ टच सॅम्पलिंग रेट व 600 निट्स ब्राईटनेससह इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर पण मिळतो. हा डिव्हाईस Rainwater Smart Touch ला सपोर्ट करतो.

प्रोसेसिंग : Realme Narzo 70 5G मीडियाटेक डायमें​नसिटी 7050 ऑक्टाकोर प्रोसेसरवर लाँच झाला आहे. ही 6 नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेली मोबाईल चिपसेट आहे जी 2.6 गीगाहर्ट्झ पर्यंतच्या क्लॉक स्पीडवर रन करण्याची क्षमता ठेवते. तसेच ग्राफिक्ससाठी या फोनमध्ये माली-जी 68 जीपीयू आहे. गेमिंग व हेवी प्रोसेसिंग दरम्यान फोनला ठंड ठेवण्यासाठी यात 3D VC Cooling System पण देण्यात आली आहे.

कॅमेरा : फोटोग्राफीसाठी रियलमी ​नारजो 70 ड्युअल रिअर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. याच्या बॅक पॅनलवर एफ/1.8 अपर्चर असलेला 50 मेगापिक्सल सोनी एलवायटी 600 सेन्सर देण्यात आला आहे जो एफ/2.4 अपर्चर असणाऱ्या 2 मेगापिक्सल ब्लॅक अँड व्हाईट सेन्सरसह चालतो. तसेच सेल्फी काढणे आणि रिल्स बनविण्यासाठी या फोनमध्ये एफ/2.45 अपर्चर असलेला 16 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

बॅटरी : पावर बॅकअपसाठी Realme Narzo 70 5G फोनमध्ये 5,000 एमएएच बॅटरी देण्यात आली आहे. हा मोबाईल 45 वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करतो जो कंपनीच्या दाव्यानुसार फोनच्या बॅटरीला 10 मिनिटामध्ये 0 ते 21% चार्ज तसेच 27 मिनिटामध्ये 0 ते 50 टक्के चार्ज करू शकते. या फोनमध्ये OTG reverse charging पण मिळते.

ऑपरेटिंग सिस्टम : रियलमी नारजो 70 स्मार्टफोन अँड्रॉईड 14 वर लाँच झाला आहे जो रियलमी युआय 5.0 सह मिळून चालतो. हा मोबाईल 3 वर्षाच्या Android Software update सह आणला गेला आहे ज्यात 2 वर्षाचे security update मिळते.