शाओमीच्या सब ब्रँड रेडमीची नोट सीरिज ग्राहकांना परवडणाऱ्या किंमतीत दर्जेदार फीचर्स देण्यासाठी ओळखली जाते. आपली ही ओळख कायम ठेवत कंपनीनं आज भारतात आपली नवी Redmi Note 12 Series सादर केली आहे. या सीरीजमध्ये कंपनीनं Redmi Note 12 5G, Redmi Note 12 Pro आणि Redmi Note 12 Pro+ phones सादर केले आहेत. परंतु यातील प्रो प्लस मॉडेलमध्ये जगातील सर्वात मोठं रिजोल्यूशन म्हणजे 200MP चा कॅमेरा देण्यात आला आहे. या आर्टिकलमध्ये रेडमी नोट 12 प्रो आणि रेडमी नोट 12 प्रो प्लस फोनची किंमत आणि स्पेसिफिकेशन्सची माहिती घेऊया.
Redmi Note 12 Pro+ चे स्पेसिफिकेशन्स
- 6.67-इंचाचा एफएचडी+ अॅमोलेड डिस्प्ले
- मीडियाटेक डाइमेंसिटी 1080 SoC
- 200MP + 8MP + 2MP कॅमेरा सेटअप
- 4980mAh बॅटरी, 120W फास्ट चार्जिंग
- Android 12 बेस्ड MIUI 13
Redmi Note 12 Pro+ स्मार्टफोन्समध्ये 6.67-इंचाचा FHD+ अॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. जो 2400 X 1080 पिक्सल रिजोल्यूशन, 20:9 आस्पेक्ट रेशियो, 120Hz रिफ्रेश रेट, 240Hz टच सॅम्पलिंग रेट, डॉल्बी व्हिजन, HDR10+ आणि 900nits ब्राइटनेसला सपोर्ट करतो. या डिस्प्लेला कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 ची सुरक्षा देण्यात आली आहे.
परफॉर्मन्ससाठी कंपनीनं फोनमध्ये 6nm फॅब्रिकेशन प्रोसेसवर बनलेला मीडियाटेकच्या Dimensity 1080 चिपसेटची ताकद देण्यात आली आहे, जोडीला Mali-G68 GPU आहे. हा फोन LPDDR4X रॅम आणि UFS 2.2 स्टोरेज टेक्नॉलॉजीसह बाजारात आला आहे. Redmi Note 12 Pro+ स्मार्टफोन Android 12 आधारित MIUI 13 वर चालतो. हेव्ही प्रोसेसिंगमध्ये फोन थंड ठेवण्यासाठी व्हेपर चेंबर कुलिंग टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे.
Redmi Note 12 Pro+ मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. यातील मुख्य कॅमेरा एफ/1.65 अपर्चर असलेला 200MP Samsung HPX सेन्सर आहे, जो 7P लेन्स, ALD कोटिंग आणि OIS ला सपोर्ट करतो. जोडीला एफ/2.2 अपर्चर आणि 120 डिग्री FoV असलेला 8MP चा अल्ट्रा वाइड कॅमेरा आणि एफ/2.4 अपर्चर असलेला 2MP मॅक्रो कॅमेरा मिळतो. या फोनमध्ये देखील 16MP चा सेल्फी सेन्सर मिळतो.
कनेक्टिव्हिटीसाठी स्मार्टफोनमध्ये 5G, 4G LTE, Wi-Fi 6, Bluetooth 5.0, NFC, GPS आणि USB Type-C पोर्ट चार्जिंग व डेटा ट्रान्सफरसाठी देण्यात आला आहे. Redmi Note 12 Pro+ स्मार्टफोनमधील 4980mAh ची 120W फास्ट चार्जिंग स्पीडला सपोर्ट करते. सिक्योरिटीसाठी साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर मिळतो, तसेच IP53 सर्टिफाइड वॉटर रेजिस्टन्स फोन आहे जो स्टिरियो स्पिकर्स आणि एक्स अॅक्सिस लिनियर मोटारला सपोर्ट करतो.
Redmi Note 12 Pro चे स्पेसिफिकेशन्स
- 6.67-इंच एफएचडी+ OLED डिस्प्ले
- मीडियाटेक डाइमेंसिटी 1080 SoC
- 50MP + 8MP + 2MP कॅमेरा सेटअप
- 5000mAh बॅटरी, 67Wफास्ट चार्जिंग
- Android 12 बेस्ड MIUI 13
Redmi Note 12 Pro मध्ये 6.67-इंचाचा FHD+ OLED डिस्प्ले देण्यात आला आहे. जो 2400 X 1080 पिक्सल रिजोल्यूशन, 20:9 आस्पेक्ट रेशीओ, 120Hz रिफ्रेश रेट, 240Hz टच सॅम्पलिंग रेट, डॉल्बी व्हिजन, HDR10+ आणि 900nits ब्राइटनेसला सपोर्ट करतो. या फोनमध्ये मीडियाटेकच्या Dimensity 1080 चिपसेटची ताकद देण्यात आली आहे, जोडीला Mali-G68 GPU आहे. दोन्ही फोन्स Android 12 आधारित MIUI 13 वर चालतात.
Redmi Note 12 Pro स्मार्टफोनमध्ये मागे ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. ज्यात एफ/1.88 अपर्चर असलेला 50MP Sony IMX766 सेन्सर मुख्य कॅमेऱ्याचे काम करतो, जो 6P लेन्स, OIS ला सपोर्ट करतो. सोबत एफ/2.2 अपर्चर असलेला 8MP ची 120 डिग्री FoV असलेली अल्ट्रा वाइड लेन्स आणि एफ/2.45 अपर्चर असलेला 2MP चा मॅक्रो कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 16MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
कनेक्टिव्हिटीसाठी हा फोन 5G, 4G LTE, Wi-Fi 6, Bluetooth 5.0, NFC, GPS आणि USB Type-C पोर्टसह येतो. Redmi Note 12 Pro स्मार्टफोनमधील 5000mAh बॅटरी 67W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. IP53 सर्टिफाईड हा फोन सिक्योरिटीसाठी साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सरला सपोर्ट करतो. तसेच फोन्स स्टिरियो स्पिकर्स आणि एक्स अॅक्सिस लिनियर मोटार मिळते.
Redmi Note 12 Pro आणि Note 12 Pro+ ची किंमत
Redmi Note 12 Pro+ 5G चे दोनच व्हेरिएंट भारतीय बाजारात दाखल झाले आहेत. यातील बेस मॉडेलची किंमत शाओमीनं 29,999 रुपये ठेवली आहे, ज्यात 8GB रॅम व 256GB स्टोरेज मिळते. तर टॉप मॉडेलसाठी 32,999 रुपये मोजावे लागतील ज्यात 12GB रॅम व 256GB स्टोरेज मिळते. हा नवीन रेडमी डिवाइस 11 जानेवारीला दुपारी 12 वाजल्यापासून खरेदी करता येईल.
Redmi Note 12 Pro 5G स्मार्टफोनच्या 6GB रॅम व 128GB स्टोरेज असलेल्या बेस मॉडेलची किंमत 24,999 रुपये आहे. तर 8GB रॅम व 128GB स्टोरेज मॉडेल 26,999 रुपये आणि 8GB रॅम व 256GB व्हेरिएंट 27,999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. या स्मार्टफोनवर आयसीआयसीआय बँकेच्या ग्राहकांना 3,000 रुपयांचा इन्स्टंट डिस्काउंट दिला जाईल. याची विक्री येत्या 11 जानेवारीला दुपारी 12 वाजता सुरु होईल.
