Home बातम्या Vivo T3 ची भारतातील लाँचच्या तारखेची घोषणा, या तारखेला मिळेल स्वस्तात 5G ची मजा

Vivo T3 ची भारतातील लाँचच्या तारखेची घोषणा, या तारखेला मिळेल स्वस्तात 5G ची मजा

Vivo T3 5G ची भारतातील लाँच कंफर्म झाली आहे. कंपनीने आज अधिकृत घोषणा केली आहे की हा स्मार्टफोन 21 मार्चला भारतीय बाजारात आणला जाईल. शॉपिंग साईट फ्लिपकार्टवर पण विवो टी3 5जी चे ‘प्रोडक्ट पेज‘ लाईव्ह करण्यात आले आहे जिथे लाँचच्या माहिती सोबत या स्मार्टफोनचा फोटो व डिझाईन पण दाखविण्यात आली आहे.

Vivo T3 5G भारतातील लाँचची माहिती

विवो टी3 5जी फोन 21 मार्चला भारतात लाँच होईल. या तारखेला दुपारी वाजता 12 कंपनी कार्यक्रमाचे आयोजन करेल ज्याला ब्रँडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसोबत विवोच्या भारतीय वेबसाईटवर लाईव्ह दाखविले जाणार आहे. तसेच ई-कॉमर्स साईट फ्लिपकार्टवर पण Vivo T3 5G लाँच लाईव्ह पाहिले जाऊ शकते. मोबाईलची किंमत, ऑफर तसेच सेलची माहिती 21 मार्चला सार्वजनिक केली जाईल.

Vivo T3 5G Price (लीक)

विवो टी3 5जी एक मिड बजेट फोन असेल ज्याची किंमत 20 हजार रुपयांपेक्षा कमी असणार आहे. आमचा अंदाज आहे की Vivo T3 5G सुरूवातीची किंमत 18,999 रुपये असू शकते. तसेच लीकमध्ये सांगण्यात आले आहे की हा मोबाईल Crystal Flake आणि Cosmic Blue कलरमध्ये लाँच केला जाईल. तसेच फोनची किंमत व सर्व माहितीसाठी 21 मार्चची वाट पहावी लागणार आहे.

Vivo T3 5G Specifications (लीक)

डिस्प्ले : विवो टी3 5जी फोन 6.67 इंचाच्या पंच-होल स्क्रीनवर लाँच केला जाईल. लीकनुसार हा ​फुलएचडी+ रिजोल्यूशन डिस्प्ले असणार आहे, जो अ‍ॅमोलेड पॅनलवर बनलेला आहे. तसेच स्क्रीनवर 120हर्ट्झ रिफ्रेश रेट तसेच 1800निट्स ब्राइटनेस सारखे फिचर पण मिळू शकतात.

प्रोसेसर : Vivo T3 5G फोनला मीडियाटेक डाइमेंसिटी 7200 ऑक्टाकोर प्रोसेसरवर लाँच केले जाऊ शकते. तसेच ही चिपसेट 4 नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनली आहे तसेच Nothing Phone 2a पण या चिपसेटवर लाँच झाली आहे. विवो टी3 ला अँड्रॉइड 14 वर लाँच केले जाऊ शकते.

मेमरी : लीकनुसार सांगण्यात आले आहे की विवो टी3 5जी फोन 8जीबी विस्तारित रॅम फिचरसह असेल. या मोबाईलमध्ये 8जीबी फिजिकल रॅम पण असणार आहे तसेच वचुर्अल रॅम त्याचबरोबर मिळून फोनला 16जीबी रॅमची ताकद मिळेल. हा विवो 5जी फोन 128जीबी व 256जीबी स्टोरेजवर लाँच होऊ शकतो

कॅमेरा : फोटोग्राफीसाठी विवो टी3 5जी फोनमध्ये ड्युअल रिअर कॅमेरा दिला जाईल. लीकमध्ये समोर आले आहे की याच्या बॅक पॅनलवर ओआयएस फिचरसह एफ/1.79 अपर्चर असलेला 50 मेगापिक्सल आयएमएक्स882 मेन सेन्सर तसेच 2 मेगापिक्सल बोका लेन्स दिली जाईल. तसेच सेल्फी व व्हिडिओ कॉलिंगसाठी 16 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा मिळेल.

बॅटरी : पावर बॅकअपसाठी Vivo T3 5जी फोनला 5,000 एमएएच बॅटरीसह बाजारात आणले जाऊ शकते. तसेच मोठी बॅटरी फास्ट चार्ज करण्यासाठी स्मार्टफोनमध्ये 44वॉट फास्ट चार्जिंग टेक्नोलॉजी दिली जाणार असल्याची गोष्ट लीकमध्ये समोर आली आहे.

इतर फिचर्स : लीकमध्ये समोर आले आहे की विवो टी3 5जी फोन IP54 रेटेड असणार आहे. तसेच यात 10 5G band, 1TB microSD card ला सपोर्ट तसेच 7.95mm ची जाडी मिळेल.