Home बातम्या Vivo Y200 Pro 5G भारतातील लाँचच्या तारखेची झाली घोषणा, या तारखेला येईल हा Curved डिस्प्ले असलेला फोन

Vivo Y200 Pro 5G भारतातील लाँचच्या तारखेची झाली घोषणा, या तारखेला येईल हा Curved डिस्प्ले असलेला फोन

91 मोबाईलने मागच्या आठवड्यात एक्सक्लूसिव्ह बातमी पब्लिश करत सांगितले होते की विवो भारतात आपला नवीन मोबाईल फोन Vivo Y200 Pro 5G सादर करणार आहे. तसेच आज या वृत्ताला दुजोरा देत कंपनीने या फोनच्या लॉन्चची तारीख जाहीर केली आहे. ब्रँडकडून घोषणा करण्यात आली आहे की Vivo Y200 Pro 5G 21 मे ला भारतात लाँच होईल.

Vivo Y200 Pro 5G भारतातील लाँचची माहिती

विवो वाय 200 प्रो 5 जी फोन 21 मे ला भारतात लाँच होईल. आज कंपनीने अधिकृत घोषणा करत सांगितले आहे की ते पुढच्या आठवड्यात एका मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करणार आहे आणि या मंचावरून ब्रँडच्या ‘वाय’ सीरिजचा नवीन मोबाईल Vivo Y200 Pro 5G भारतीय बाजारात येईल. या फोनची किंमत तसेच याची स्पेसिफिकेशनची माहिती 21 मे ला सार्वजनिक केली जाईल.

Vivo Y200 Pro 5G चे परफॉर्मन्स

वाय 200 प्रो च्या लाँचची घोषणा करत कंपनीकडून सांगण्यात आले आहे की हा मोबाईल Qualcomm Snapdragon 695 5G चिपसेटला सपोर्ट करेल. हा 6nm फॅब्रिकेशन तसेच 64-bit आर्किटेक्चरवर बनलेला ऑक्टाकोर प्रोसेसर आहे जो 2.2GHz क्लॉक स्पीडवर चालतो.​ चिपसेटला पाहत अंदाज आहे की Vivo Y200 Pro 5G ची किंमत 20 हजार रुपयांच्या आसपास असू शकते.

Vivo Y200 Pro 5G ची डिझाईन

कंपनीनुसार विवो वाय 200 प्रो 5 जी फोन एलिगेंट silk glass design वर सादर केला जाईल. या फोनमध्ये Curved डिस्प्ले दिला जाईल जो पंच-होल स्टाईल असणार आहे. यात AMOLED पॅनलचा वापर केला जाऊ शकतो. तसेच फोनच्या बॅक पॅनलवर ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप असेल.

Vivo Y200 Pro 5G स्पेसिफिकेशन (लीक)

स्क्रीन: Vivo Y200 Pro 5G फोनमध्ये 6.78 इंचाचा फुलएचडी पंच-होल ​डिस्प्ले दिला जाऊ शकतो. लीकनुसार ही AMOLED पॅनलवर बनलेली 3D Curved स्क्रीन असेल, जी 120Hz रिफ्रेश रेट सोबतच 1300nits ब्राईटनेसला सपोर्ट करेल.

प्रोसेसर: समोर आलेल्या मार्केटिंग मटेरियलवरून समजले आहे की हा विवो फोन 8GB RAM वर लाँच केला जाऊ शकतो, ज्याच्यासोबत 8 जीबी एक्सपांडेबल रॅम पण दिली जाऊ शकते. या टेक्नॉलॉजी फिजिकल रॅममध्ये वचुर्अल रॅमला जोडून वाय 200 प्रो ला 16 जीबी रॅमची ताकद प्रदान करेल. तसेच मोबाईलला 128GB Storage सह मार्केटमध्ये आणले जाईल.

कॅमेरा: फोटोग्राफीसाठी Vivo Y200 Pro ड्युअल रिअर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल. याच्या बॅक पॅनलवर 64MP OIS कॅमेरा तसेच 2MP Bokeh लेन्स पाहायला मिळू शकते. तसेच लीकनुसार फोनच्या फ्रंट पॅनलवर 16MP Selfie Camera दिला जाईल.

बॅटरी: पावर बॅकअपसाठी​ विवो वाय200 प्रो 5जी फोन 5,000 एमएएच बॅटरीसह बाजारात आणला जाईल. तसेच लीकनुसार या फोनमध्ये 44 वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी मिळेल.

इतर: लीकमध्ये समजले आहे की विवो वाय 200 5 जी फोन भारतीय बाजारात Silk Black आणि Silk Green कलरमध्ये सेलसाठी उपलब्ध होईल. या मोबाईलच्या ब्लॅक मॉडेलची जाडी 7.49mm तसेच ग्रीन कलर व्हेरिएंटची जाडी 7.57mm सांगितली आहे.