Home बातम्या 50MP Camera असलेला Infinix Note 12i 2022 स्मार्टफोन 25 जानेवारीला होईल भारतात लाँच

50MP Camera असलेला Infinix Note 12i 2022 स्मार्टफोन 25 जानेवारीला होईल भारतात लाँच

Highlights
  • Infinix Note 12i 2022 भारतात 25 जानेवारीला लाँच होईल.
  • हा फोन शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वरून विकत घेता येईल.
  • या फोनमध्ये 50MP Triple Rear Camera दिला जाईल.

इनफिनिक्स भारतीय स्मार्टफोन इंडस्ट्रीच्या लो बजेट सेग्मेंटमध्ये आपला नवा डिवाइस घेऊन येत आहे. कंपनी भारतात Infinix Note 12i 2022 स्मार्टफोन सादर करणार आहे जो 25 जानेवारीला लाँच होईल. या फोनचे प्रोेडक्ट पेज शॉपिंग साइट फ्लिपकार्टवर लाइव्ह करण्यात आलं आहे ज्यात खुलासा झाला आहे की इनफिनिक्स नोट 12आय अ‍ॅमोलेड डिस्प्ले, 50 मेगापिक्सल ट्रिपल रियर कॅमेरा, 33वॉट फास्ट चार्जिंग आणि 5,000एमएएच बॅटरी सारख्या स्पेसिफिकेशन्ससह येईल.

Infinix Note 12i 2022 Specifications

25 जानेवारीला भारतात लाँच होणारा इनफिनिक्स नोट 12आय 2022 स्मार्टफोनचे जवळपास सर्व स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स फ्लिपकार्टच्या माध्यमातून समजले आहेत. हा मोबाइल फोन मीडियाटेक हीलियो जी85 चिपसेटसह लाँच होईल. या फोनमध्ये 4जीबी रॅम दिली जाईल जोडीला 128जीबी इंटरनल स्टोरेज मिळेल. तसेच मार्केटमध्ये हा मोबाइल फोन अजून एका 6जीबी रॅम मॉडेलसह येईल. हे देखील वाचा: भारीच! 4 हजारांच्या रेंजमध्ये लाँच झाला स्वस्त 4G Smartphone; फीचर्स देखील आहेत कमाल

Infinix Note 12i 2022 स्मार्टफोन 3जीबी व्हर्च्युअल रॅम टेक्नॉलॉजीला सपोर्ट करेल, ज्यामुळे मोबाइलचा बेस व्हेरिएंट 4जीबीच्या ऐवजी 7जीबी रॅमवर परफॉर्म करेल. हा स्मार्टफोन एक्सओएस 10.6 वर सादर केला जाईल जो अँड्रॉइड 12 आधारित असेल. पावर बॅकअपसाठी या स्मार्टफोनमध्ये 5,000एमएएच बॅटरी दिली जाईल जी 33वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह येईल.

अन्य फीचर्स व स्पेसिफिकेशन्स पाहता इनफिनिक्स नोट 12आय 2022 स्मार्टफोनमध्ये 6.7 इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले दिली जाईल. फोनची स्क्रीन अ‍ॅमोलेड पॅनलवर बनली असेल जी 90हर्ट्ज रिफ्रेश रेटवर चालेल. ही स्क्रीन वाइडवाइन एल1 सर्टिफिकेशन्ससह येईल, तसेच 1000निट्स ब्राइटनेस देखील मिळेल. हे देखील वाचा: Vivo घेऊन येत आहे सर्वात शक्तिशाली X90 Series; लाँच पूर्वीच समोर आला रिटेल बॉक्स

फोटोग्राफीसाठी Infinix Note 12i 2022 ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर दिला जाईल. तसेच 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आणि एक क्यूवीजीए लेन्सचा समावेश असेल. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या इनफिनिक्स फोनमध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळेल.