Home बातम्या 300W Fast Charging टेक्नॉलॉजीची Redmi नं केली अधिकृत घोषणा

300W Fast Charging टेक्नॉलॉजीची Redmi नं केली अधिकृत घोषणा

Highlights
  • रेडमी ने 300W ultra-fast charging टेक्नॉलॉजी सादर केली आहे.
  • या टेक्नॉलॉजीनं 5 मिनिटांत फोन फुल चार्ज होऊ शकतो.
  • Redmi Note 12 Discovery फोनच्या माध्यमातून टेक्नॉलॉजी प्रदर्शित करण्यात आली.

Redmi नं आपल्या 300W ultra-fast charging टेक्नॉलॉजीची अधिकृत घोषणा केली आहे. ही कोणत्याही मोबाइल कंपनीद्वारे बाजारात आलेली सर्वात फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी आहे. 28 फेब्रुवारीला रियलमी ब्रँडनं 240W fast charging असलेला Realme GT3 स्मार्टफोन ग्लोबली लाँच केला. परंतु त्याआधीच Xiaomi सबब्रँड रेडमीनं आपली टेक्नॉलॉजी टेक विश्वासमोर ठेवली आहे.

300वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीची घोषणा रेडमीनं मायक्रोब्लागिंग साइट वेईबोच्या माध्यमातून केली आहे. कंपनीनं व्हिडीओ शेयर करून दाखवलं आहे की ही चार्जिंग किती वेळात फोन किती टक्के चार्ज करते. चिनी भाषेतील या पोस्टवरील कॅप्शनच्या इंग्रजी भाषांतरानुसार ‘300W Immortal Second Charger’ चा उल्लेख करण्यात आला आहे. हे देखील वाचा: फक्त 8 मिनिटांत बॅटरी फुल! 240W चार्जिंगसह Realme GT3 240W आला भारतात

5 मिनिटांत बॅटरी फुल चार्ज

रेडमीनं शेयर केलेल्या व्हिडीओमध्ये या चार्जिंग टेक्नॉलॉजीच्या मदतीनं Redmi Note 12 Discovery (Explorer Edition) स्मार्टफोन चार्ज करण्यात आल्याचं दाखवण्यात आलं आहे. या मोबाइल फोनमध्ये 4,100एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे जी पूर्णपणे ड्रेन केल्यानंतर चार्ज करण्यात आली आहे.

300W charging शी कनेक्ट केल्यावर या फोनची बॅटरी 0 वरून 50 टक्के होण्यास 2 मिनिट 11 सेकंदाचा वेळ लागला. तर 5 मिनिटांच्या आतच हा मोबाइल फोन फुल म्हणजे 100 टक्के चार्ज झाला होता. आतापर्यंत संपूर्ण स्मार्टफोन मार्केटमध्ये इतक्या वेगानं कोणताही डिवायस चार्ज करण्यात आलेला नाही.

कधी येणार बाजारात

Redmi नं 300W ultra-fast charging solution सादर तर केलं आहे, परंतु ही स्मार्टफोन्समध्ये कधी पर्यंत पाहायला मिळेल हे मात्र स्पष्ट झालं नाही. ही टेक्नॉलॉजी मोबाइल फोनमध्ये इनबिल्ट असेल की या टेक्नॉलॉजीचा वापर करण्यासाठी दुसरा अडॅप्टर चार्जरचा वापर करावा लागेल, हे देखील चिनी ब्रँड शाओमीनं सांगितलं नाही. हे देखील वाचा: WhatsApp वापरायचं असेल तर नवीन फोन घ्या! Apple, Samsung, LG आणि SONY च्या 49 मोबाइल्सवर नाही चालणार लोकप्रिय मेसेंजर

आशा आहे की रेडमी लवकरच 300वॉट चार्जिंगची आणखी माहिती देईल. तसेच ही टेक्नॉलॉजी रेडमी ब्रँडनं सादर केल्यामुळे हीचा वापर रेडमी नोट सीरिजमध्ये केला जाण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे मिडरेंज मधील स्मार्टफोन ग्राहकांना जगातील सर्वात वेगवान फास्ट चार्जिंग लवकरच अनुभवता येईल ही अपेक्षा आहे.